माझे मातीचे प्रयोग

Submitted by रूनी पॉटर on 12 April, 2008 - 18:47

आपली मायबोलीकर मिनोतीकडुन प्रेरणा घेवुन मी पण कुंभारकामाच्या (Pottery) क्लासला नाव घातले.

त्यातलाच हा एक प्रयोग :). या भांड्याबद्दल थोडेसे, हा फ्लॉवर पॉट coil technique वापरुन (म्हणजेच हाताने मातीच्या जाड जाड लांब शेवया करुन मग त्या एकावर एक रचुन) बनवलेला आहे.

flower_vase.jpg

अश्विनी, दिनेश, तुम्ही दिलेल्या suggestions नंतर हे स्पुन होल्डरचे चित्र टाकतेय. एक उदाहरण म्हणुन की या coils चे कसे डीजाईन बनवता येते. हे भांडे चुकीचे रंगवले गेले म्हणुन मला खुप आवडले नाही. खर म्हणजे मी हे भांडे ३-४ रंगात रंगवले (होते). पण मी सगळ्यात शेवटी काळा रंग वापरला फिक्या रंगावर. या चुकीमुळे एक महत्वाची गोष्ट शिकले ते म्हणजे काळा रंग पारदर्शक नसतो proud.gif.

Anyway यात (coil technique मध्ये) दोन्ही प्रकार करता येतील. एक म्हणजे प्लेन भांडे बनवुन मग त्यावर डीजाइन साठी अश्या वेगवेगळ्या आकाराच्या शेवया लावणे (जसे सुंभाचे किंवा लाटांचे डिजाइन)किंवा भांडे बनवत असतांनाच शेवयांना आकार देणे.

मी या क्षेत्रात फार म्हणजे फारच नवीन आहे त्यामुळे मातीचा अंदाज येत नाही. जोपर्यंत मातीचे गुणधर्म मला ओळखीचे होत नाहीत माझे प्रयोग खर्‍या अर्थाने यशस्वी होणार नाहीत. आम्हाला दिलेला गृहपाठ पण साधारण असाच असतो की ज्या मुळे आम्हाला मातीच्या वेगवेगळ्या गुणांची ओळख होईल. एवढ मात्र नक्की की मातीत खेळायला खुप मजा येते. हळु हळु डोक्यात कल्पना येत जातील तसे तसे प्रयोग करत जाईन त्याच वेळी तुम्ही दिलेल्या सुचना पण अमलात आणायचा प्रयत्न करेन.

spoon_holder.jpg

गुलमोहर: 

रुनि, छान गं ! एकदम वेगळा लुक आहे. आकारही बर्‍यापैकी छान जमलाय.. हात शिवशिवत आहेत.. पण येत तर काही नाही Sad
मातीच्या लांब शेवया केल्या तरी त्या एकमेकावर गोलात बसवताना तुटत नव्हत्या का गं सारख्या ? तयार झाल्यावर भाजून काढल असेल ना ? चमक कशी काय आली आणि भांड्याला ?

रुनी, छान दिसतोय हा पॉट.... पण मला एक सांग तु बेस पॉटवर ह्या कॉईल्स लावल्यास की डायरेक्ट कॉईल्सचाच पॉट बनवलास? तु दिलेला रंग पण छान परफेक्ट जमलाय. वॉर्निशची लकाकी आहे का ही?

mast

वा! छानच झालाय. तंत्र वेगळं आहे एकदम.
त्या शेवया वेगवेगळ्या रंगाच्या करता येतात का?

रुनी.......मस्तच झालाय गं पॉट...... असा प्रकार कधीच बघितला नव्हता. कसा केलास तेही लिही ना.

रुनी, मी कुठेतरी मडक्याभोवती सुंभाचे विणकाम केलेले बघितले, त्याची आठवण झाली. पुढच्यावेळी प्लेन शेवयांच्या जागी एखादी वीण करता येईल. शक्य होईल ते बहुतेक.

रुनी, मस्त आहे ग भांडे Happy
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

सोनचाफा, धन्स. तुला इतकी छान लेखणी चालवता येते, हात पण नक्कीच चालवता येतील मातीचे काम करायला. Happy
मातीच्या coil (शेवया) खुप लांब नाही करायच्या एक-दिड फुट लांब करायची एक एक coil (शेवयी) आणि मग एकावार एक रचत जायची. जिथे नविन coil जोडायची आहे तिथे ती दाबुन आधीच्या जुन्या रचलेल्या coil ला जोडायची. माती ओली असल्यामुळे कळणार नाही इतके छान सांधता येते.
मातीचे भांडे करुन झाल्यावर ते नैसर्गिक पद्धतीने वाळु देतात मग त्याला कुंभार जसे माठ भाजतो तसे भट्टीत (kiln) भाजतात, याला bisk firing म्हणतात.

मंजु, अग बेस पॉट वगैरे काही नाही, एक मातीची पुरी लाटुन मग त्याच्यावर या coils directly एकावर एक रचल्यात या भांड्याच्या आकारात. भांड्याचा आकार जसा हवाय तसा करण्यासाठी coil ठेवतांना ती बरोबर आधीच्या coil वर ठेवायची की थोडी बाहेर की थोडी आत ठेवायची हे ठरवावे लागते. घेर वाढवण्यासाठी आधीच्या coil वर न ठेवता ती (thicknesswise not length wise) अर्धी त्यावर आणि अर्धी बाहेर ठेवायची. तसेच घेर घटवण्यासाठी आधीच्या coil वर न ठेवता ती अर्धी त्यावर आणि अर्धी आत ठेवायची.
भांडे ज्या आकाराचे हवय त्या आकाराचा एक पुठ्ठा कापुन ठेवला होता. दर वेळी coil रचतांना तो लावुन बघत होते आपल्याला हवा तो आकार येतोय की नाही बघण्यासाठी.
मातीच्या भांड्यांना रंग देण्यासाठी वेगळे रंग वापरतात त्या पद्धतीला Glazing म्हणतात. भांडे एकदा भट्टीतुन भाजुन काढले की मग त्याला रंग (glaze) देतात. तो रंग वाळला की परत एकदा (एकुण दुसर्‍यांदा) रंगाच्या वेगळ्या भट्टीतुन (gas kiln) मधुन काढतात की झाले फायनल भांडे तयार. भांड्यांना जी चमक आलीये ती glaze मध्ये असलेल्या केमीकल्स मुळे आलीये (थोडक्यात, काचेची खुप बारीक पुड असते या रंगात मिसळलेली ज्यामुळे चमक यायला मदत होते).

लालु, हो या शेवया वेगवेगळ्या रंगात रंगवता येतील. इथे पण मी २ रंग वापरले होते. पण ते एकत्र झाले आणि वेगळाच (अनपेक्षीत) ब्राउन रंग तयार झालाय. proud.gif

जयावी, मी या प्रतिसादात वर लिहीलय कसे केले भांडे ते. बहुदा कळेल अश्या भाषेत लिहायचा प्रयत्न केलाय. नाही कळले तर नक्की परत एकदा सांगायचा प्रयत्न करेन.

दिनेशदा, तुम्ही जे पाहिलय त्याचा फोटो असेल तर टाका. त्यात कदाचीत मडके तयार करुन मग वरतुन सुंभाचे डिजाइन चिटकवल होते की काय केले होते ते कळु शकेल.
अशी coil ची ३ पेडाची वेणी घालुन मी एका कपाला हॅडंल केलय. पण तसे भांडे करण्याचा प्रयत्न नाही केला. प्रयत्न करायला हवा. हाताने वळायच्या असल्यामुळे अश्या प्लेन शेवया करणे सोपे जाते.
तसेच मी या coil नुसत्या एकावर एक न ठेवता त्यांचे डीजाईन तयार केली (चकली किंवा असे काही) आणि मग भांडे तयार केलय. ते भांडे जरा बिघडलय म्हणुन नाही टाकले इथे. ते पण टाकेन इथे, कल्पना यायला मदत होइल.

अरे वा रुनी, छान आहे हा छंद. चांगल जमलय.

सही आहे भांडे. ( मला नाव पण आवडल) Happy

अगं रुनी, आजच पाहिलं इथे म्हणून कळलं!! कुवेतवर सांगायचस ना?? Happy मस्तच बनवल आहेस!! सही!!
कृती लिहिणार का??

रूपाली
भां डं खूपच छान आहे. खूप नाविन्यपूर्ण आणि कलात्मक !! मी मायबोलीवर लिहायला लागल्यावर पहिला प्रतिसाद तुझाच होता. म्हणून विचारते, माझा -कृष्णा नदीवरचे पोहोणे - हा ललित लेख वाचलास का?

रूपाली
भां डं खूपच छान आहे. खूप नाविन्यपूर्ण आणि कलात्मक !! मी मायबोलीवर लिहायला लागल्यावर पहिला प्रतिसाद तुझाच होता. म्हणून विचारते, माझा -कृष्णा नदीवरचे पोहोणे - हा ललित लेख वाचलास का?

रुनी, मस्त आहे! आजच बघितलं तुझं मडकं Wink

तुला यात variations करता येतीलः-

१) तयार प्लेन मडक्यावर चटईच्या विणीत, लाटालाटांच्या design मध्ये शेवया चिकटवणे.

२) सुगरणीच्या घरट्याचा आकार देत शेवया रचणे. तीन पार्ट मधे सुकवासुकवी करावी लागेल. आधी खालचा नळी सारखा भाग बनवून सुकवणे, मग मधला फुगीर भाग रचून सुकवणे व शेवटी वरचा निमुळता भाग रचून सुकवणे. व्यवस्थित जमले तर मस्त शोपीस होईल!

३) तझा आहे तसाच pot करताना मधे मधे मातीचे प्लेन पट्टे रचायचे (म्हणजे cylindrical शेवया न करता) आणि त्यावर मस्त वारली पेंटींग करायचे.

काहिही सांगते ना मी? Happy (तू म्हणशील तुला नुसते सांगायला काय जाते!) Happy

रुनी, मला वाटते मी मस्कतमधे तसली वीण बघितली होती. तिथे कुंभांचा एक वेगळा आकार असतो. गळा खुपच निमुळता.
या मातीला बाहेरून सुंभाची बास्केट वीण केल्यासारखे असते. हा सुंभ जास्त वेळ ओला रहात असल्याने, माठातील पाणी थंड व्हायला आणि थंड रहायला मदत होते. शिवाय या सुंभाचेच हँडल असल्याने, अनेक कुंभ एका व्यक्तीला उचलता येतात वा उंटावर लादता येतात.
सुंभ सलग आणि मजबूत असल्याने विणणे सोपे जाते पण मातीकामात मात्र तश्या छोट्या छोट्या गाठी करुन चिकटवणे सोपे जाईल. या मूळ रंगात लाल मातीचा कुंभ आणि सोनेरी रंगाचा सुंभ हि रंगसंगती पण छान दिसते

http://www.pbase.com/nureen/image/68995337

एक फोटो आहे इथे.
अर्थात आम्हाला सांगायला काय जातं म्हणा ?

रुनीबेन, एकदम चोक्कस! Happy
तुझ्या प्रतिसादाची वाट पाहत होते. फोटो पाहुन प्रचंड कुतूहल होते. रंग आणि झळाळी छान जमली आहे. अजून काही कलाकृती असल्यास कृतीसह टाक इथे. हात खरोखरच शिवशिवत आहेत Happy
दिनेशदा फोटो सुंदर आहे. धन्यवाद.

दुसरा फोटोतली कलाकृती पण छाने गं रुपाली.

मला दिसलेच नाहीत फोटो. परत टाकता आले तर बघ ना प्लीज.

सायो, दिव्या परत एकदा दोन्ही फोटो टाकलेत, आता दिसताहेत का? मला आधी पण दिसत होते आणि आता पण दिसताहेत. तुम्हाला अजुनही दिसत नसतील तर मला मॉड ला विचारावे लागेल काय प्रॉब्लेम आहे ते.

दिसताहेत आता. परत एकदा टाकल्याबद्दल थॅन्क्स. पहिलाच प्रयत्न असूनही छान जमलाय. लगे रहो.

सगळ्यांचे आभार.
सोनचाफा, मंजु, अखी, गोबु, लालु,जयावि, दिनेशदा, मिनोती, दिव्या, केदार, शैलजा, केदार, श्यामली, mmm333, अश्विनी, चिन्नु, सायो आणि बाकीच्या सगळ्यांना पण धन्स. माझ्या सारख्या शिकावु उमेदवाराच्या कलाकृतीला आवर्जुन दिलेल्या प्रोहत्सानाबद्दल सर्वांचे आभार. लवकरच मी अजुन काही भांड्यांचे फोटो पोस्ट करीन. happy.gif

रुनी, मस्तच ग............... अजुन माहिती देत रहा.

रुनिताई मस्तच माहिती पण दिली त्यब्द्दलही आभार .. मी पण हात आजमवुन बघते आता..

आजच बघितलं. छान आहे. जस जसे प्रयोग अराल तसे तसे इथे येउद्या

रुनी, छानच आहे तुझे मातीकाम. अजुनही फोटो टाक ना!

छान हस्तकला व रंगकाम.

Pages