१) काकड़ आरती

Submitted by भूत on 3 July, 2010 - 07:15

आज्जी पहाटे पहाटे उठायची ...
कार्तिक स्नान महापुण्यवान अस काही तरी म्हणायची ....
आम्ही साखर झोपेत असताना, ती थंडगार पाण्याने अंघोळ करायाची .....

अजुन ही आठवत आहेत ते अस्पष्टसे मन्त्र...अजुन ही आठवत आहे ती आजीची गड़बड़....
झोपेतून डोळे पुसत पुसत उठलेली आम्ही तिघ चौघ नातवंड .....ती आज्जीच्या हातातली फुलांची परडी ,त्यातल्या २-४ उदबत्या अन् पारिजातकाच्या फुलाचा तो मंद मंद सुगंध ......

मग

काळ्या रामाच्या मंदिराताल्या त्या तीन मूर्ति.... दही दूध तुपाने माखलेल्या ......टाळ मृदुन्गाचे स्वर.... एक सुंदरशी काकड़ आरती .

" काकड आरती परमात्मया रघुपती राजाराम रघुपती
जीवीजीवा प्रकाशली कैची निजात्म ज्योती|| धृ ||
.
त्रिगुण काकडा द्वैत घृते तिंबिला द्वैत घृते तिम्बिला
उजळली निजात्म ज्योती तेणे जळोनिया गेला || १ ||
.
काजळी ना मैस नाही जळमळ डळमळ नाही जळमळ डळमळ
अवनी ना अंबर प्रकाश निघोट निश्चळ || २ ||
.
उदयो ना अस्तु तया बोध प्रतःकाळी तया बोध प्रतः काळी
रामी रामदास सहजी सहज ओवाळी || ३ ||
.
|| जय जय रघुवीर समर्थ ||

......आणि इतर ५-६ आज्या ... भाव मग्न होउन ,तल्लीन होवून गाणारया

"ए आज्जी ,
दही दूध खायचं सोडून वाया का घालवत आहेत???
.
.
रामच अंग दहि दुधानं चिकट होत असेल ना त्याला आवडत का तस्???
.
.
इथला राम काला ..अन् तिथला गोरा अस का???
.
.
राम नक्की काला की गोरा ???
.
.
सांग ना"
.
.
असले हे आमचे बालिश प्रश्न ......
अन् सगळ्याना पुरून उरणार तिचं साध सोप्पा स उत्तर ....
...
...

'एक स्मित हास्य '....
....
....
एक समाधानाचा
धन्यतेचा भाव
उभे राहिलेले रोमांच ....आज्जी च्या डोळ्यात तरळणारे ते दोन अश्रुंचे मोती
मग

॥ कल्याण करी रामराया कल्याण करी देवराया ॥
॥ जनहित विवरी ,कल्याण करी राम राया ॥

.................................ते स्मित हास्य तेव्हाही उलगडलं नाही अजुन ही उलगडलं नाही...............
...
...
आत्ता आज्जी नाही...त्या ५-६ आज्या ही नाहीत
तो कार्तिक तसाच ...त्यातल ते थंड पाणी तसंच ...
आजी म्हणायची तेच मन्त्र
आमचा जागे वर मात्र दुसरं कोणी तरी साखर झोपेत...
ती काकड़ आरती ........ते स्वर ..........तो पारिजातकाचा सुगंध मात्र तसाच
काला राम ही तसाच ...इतकी वर्ष दुधातुपात नाहुनही अजुन ही तितकाच काला

पण
त्याच्या चहर्‍यावर ही एक तसंच स्मित हास्य
अगदी तसाच तो धन्यतेचा समाधानाचा भाव
...
...
...
हे स्मित हास्य कधी उलगडणार आहे की नाही रामच जाणे !!!

॥ कल्याण करी रामराया कल्याण करी देवराया ॥
॥ जनहित विवरी ,कल्याण करी राम राया ॥

Posted by पारिजातक - शनिवार ६ सप्टेंबर २००८ -

( हा अनुभव आधी मी माझ्या ब्लोग वर प्रकाशित केला होता , पारिजातक हे माझे अजुन एक टोपण नाव आहे Happy )

गुलमोहर: 

.

प्रसाद, सुंदरच रे.. गावच्या सावतामाळी मंदिरात मी अनुभवली आहे रे काकड आरती. हिवाळ्यात भल्या पहाटे देवाचे नामस्मरण, टाळा मृदुंगाचा गजर सारं काही वेगळचं वाटतं. शहरात सुद्धा अनुभवली आहे अशी काकड आरती विठ्ठल मंदिरात. पण जुन्या आरत्यांची सर अन तो feel शहरातल्या काकड आरत्यांना नाही Uhoh

प्रसाद, लहानपणीच्या आठवणी जाग्या केल्यात.

आमच्या जवळच्या विठोबाच्या देवळात असायची काकडारती. पहाटे ४ का पाचला सुरू व्हायची. आई रोज जायची. पहाटे खूप प्रसन्न वाटतं देवळात. मग एक दिवस आमच्या तर्फे जेंव्हा असायची तेंव्हा आम्ही जायचो पहटे उठून. खूप आवडायचं. दूधा तूपाने स्नान घातल्याचं आठवत नाही. एखादवेळेस आईचा खाक्या असेल असं दूध तूप फुकट न घालवण्याचा. सकाळी सकाळीच पुजारी इतके सुंदर तयार करायचे न विठोबाला. पहाटेच्यावेळी ताज्या फुलांचे हार, उदबत्तीचा सुगंध, आणि घंटेच्या नादात खड्या आवाजात म्हणलेल्या आरत्या. आमच्या त्या देवळाच्या पुजार्‍याचा आवाजही खूप छान होता. वहिनीला विचारलं पाहिजे ती जाते का म्हणून.

खूप छान लिहिलयस प्रसाद.. खूप तरल...
॥ कल्याण करी रामराया कल्याण करी देवराया ॥
॥ जनहित विवरी ,कल्याण करी राम राया ॥

मस्तयं, यांत वर्णन सातारच्या काळाराम व गोराराम मंदिराचय का?

>>> अरे नाही ते लिखाणात जमतयं म्हनून घेतलंय ...

मी माटे राम मंदिरात जायचो काकडाअरतीला आज्जी बरोबर ....अन गुजरांच्या इथल्या विठ्ठल मंदीरात !!!

सहीच रे!!! पु.ले.शु.

आम्ही दोस्तलोक खिंडीतल्या गणपतीला जायचो आरतीला, तसच नवरात्रात सिटीपोस्ट किंवा राजवाड्यावरच्या देविला, पण अर्थात हे रेग्युलर नसायच Wink