कुणी राधिका

Submitted by जया एम on 23 June, 2010 - 03:15

डोळ्यात दाटले प्रगल्भ पाणी
बासरी शोधते कृष्णाची गाणी
कुंवार रात्रीत चांदणे झरे
निळाई शोधत राधिका फिरे

वृन्दावनात सावळे सुख
एकदा प्राणात रुजून गेले
फुलत्या शपथा मिटून गेल्या
कातरवेळेने कपट केले

रुसले पैंजण, घुंगुर बोले
नाचऱ्या मनाला बांधून टाक
उसन्या श्वासात कृष्णाचे नाव
कंठात रुतली अस्फुट हाक

तरीही सोशिक चंद्राच्या संगे
झिजून विझून जाऊ दे काया
अखेर दाटेल जीवाच्या डोही
सख्याची जादुई काजळमाया

रात्रीचा गाभारा दु:खाने भरे
भांगामधले कुंकुम खिरे
कृष्णाची निर्मोही चाहूल यावी
म्हणून राधिका निष्फळ झुरे

गुलमोहर: 

>>>>डोळ्यात दाटले प्रगल्भ पाणी
बासरी शोधते कृष्णाची गाणी
कुंवार रात्रीत चांदणे झरे
निळाई शोधत राधिका फिरे

जया ....मस्त गं...

आभारी आहे, आरती, के. अन्जली, सुधीर, सूर्यकिरण,सुभाशचन्द्र. कॄष्ण हरवला आहे. चाहूल निर्मोही आहे म्हणजे दोघानीही बाकी कसलाही मोह न बाळगता फक्त त्याचे अस्तित्व जाणवून देणारी चाहूल त्याने द्यायला हवी आहे.

सुंदर! Happy

मनापासून धन्यवाद, मयुरेश, अमित जी.

आर्त, करुण. अगदी बरोबर. तसेच काहीसे घडले आहे. सावरेन. कविता सोबत आहे.

मस्त ... ब्राव्हो !!!
कृष्णाची निर्मोही चाहूल यावी
म्हणून राधिका निष्फळ झुरे------ क्या एक्सप्रेशन है.. !!! वॉव !!!
( पण मोहमयी असणं हे कृष्णाच मेन युएसपी न ... Happy ... )

तरीही सोशिक चंद्राच्या संगे
झिजून विझून जाऊ दे काया
अखेर दाटेल जीवाच्या डोही
सख्याची जादुई काजळमाया

वा!