Submitted by ट्यागो on 10 June, 2010 - 11:18
छे !!!
हे कसलं चुंबन?????
घिसाडघाई ओठ शिवले की झालं???
काय डब्बा ऐस पैस खेळतोय की
अप्पारप्पी ???
नाय नाय.. नाय...
ओठांनी ओठांना विलग करत
एक श्वास द्यायचा... उष्ण...
गच्च मिटालेल्या डोळ्यांनी
हृदयातलं सगळं म्हणनं हळूवार सोडत न्यायचं....
अन मग रस्सीखेच सुरू करायची
हाड नसलेल्या अवयवाची ...
तो काही फक्त उन्माद नसतो...
तीही एक भाषा आहे...प्रेम व्यक्त करण्याची...
संवादाचे परिमाण जेव्हा...
तोकडे पडू लागतात...
तेव्हाच उपसायचं हे म्यानबंद हत्यार..
अन मग बघ सगळ्याच गोष्टींची परिमाणे बदलू लागतात...
मयूरेश चव्हाण, मुंबई.
२२.०१.१०, ०२.४५
गुलमोहर:
शेअर करा
"अलिश्ल" "अलिश्ल" एकदम
"अलिश्ल" "अलिश्ल"
एकदम "जॉनर" बदलुन कविता की रे मयुरेश!
रुक्ष उन्हाळा मस्त पावसाळ्यात बदलल्याचा परिणाम
>>काय डब्बा ऐस पैस खेळतोय की
>>काय डब्बा ऐस पैस खेळतोय की
>>अन मग रस्सीखेच सुरू करायची
हाड नसलेल्या अवयवाची ...
हायला, हाड नसलेला आणखी एक अवयव आठवला

मयुरेश, मस्त टी.पी.
यात 'काहीच्या काही' काही
यात 'काहीच्या काही' काही नाहीये. अश्लीलमार्तंडांन घाबरून इथे दडवलीय का?
श्या... काहिच इंटरेस्टींग
श्या... काहिच इंटरेस्टींग नाही... नाव बघून किती आपेक्षेने उघडली होती.. !!!
:| :|
किती बळच कविता आहे. मी कविता वाचायच्या फंदात पडत नाही ते बरय..
>> काय डब्बा ऐस पैस खेळतोय
>> काय डब्बा ऐस पैस खेळतोय की
म्हणजे काय कोणी सांगाल काय ??????
दुनिया बदलली........कविता
दुनिया बदलली........कविता बदलली...............(हिंदी चित्रपटांचा प्रभाव का रे हा?)
म्यानबंध की
म्यानबंध की म्यानबंद?
'सगळ्याच गोष्टींचे परिमाण बदलू लागतात' हे 'सगळ्याच गोष्टींचे परिणाम बदलू लागतात' किंवा 'सगळ्याच गोष्टींची परिमाणे बदलू लागतात' असं पाहिजे का?
चु.भु.दे.घे.
(एवढ्या सुरस आणि चविष्ट विषयात उगीच दाताखाली खडा आल्यागत होते ना.)
इथे अश्लील कवीता लीहीली जाते
इथे अश्लील कवीता लीहीली जाते ही बाब ADMIN ला कळवायला हवी. एवढी हॉस असेल तर नवीन दुवा ऊघडा ना अश्लील कवीता नावाने. पण इथे नको.
अश्लीलतेची आधी क्लीअर
अश्लीलतेची आधी क्लीअर व्याख्या करा !!
.
हिंदी पिक्चर मधे नट नटीची येता जाता चुंबने घेत असतो ते चालते , मराठीत चुंबन घेतल की अश्लील होय ???
मयुरेश छान रे ...तु लिहित रहा , येथे बर्याच लोकां ना काव्यातल्या ९ रसां मधले शृंगार , बीभत्स , वगैरे रस मान्यच नाहीयेत !!! त्यांची पर्वा करायचे कारण नाही !!!
अरे वा चुंबन शीर्षक वाचून
अरे वा चुंबन शीर्षक वाचून कविता वाचायला यायचे आणि मग अश्लील म्हनायचे, बरे आहे की.
भरत
भरत
मस्त गोड....
मस्त गोड....
तीही एक भाषा आहे...प्रेम
तीही एक भाषा आहे...प्रेम व्यक्त करण्याची...
संवादाचे परिमाण जेव्हा...
तोकडे पडू लागतात...
भरत आला परत्........मस्त रे
भरत आला परत्........मस्त रे भाऊ.............!
अरे भरत, लोक बहुधा "भारतिय
अरे भरत, लोक बहुधा "भारतिय चुम्बन" समजुन वाचायला येतात आणि इथले "फ्रेन्च चुम्बन वर्णन" वाचुन काळेनिळे पडतात......
भ्रमर, हल्ली या दोन्ही
भ्रमर, हल्ली या दोन्ही देशांमधली संस्कृतीक देवाणघेवाण वाढली आहे त्याचा हा परिपाक म्हणायचा काय?
ओल्या मधात बुडवलेल्या, त्या
ओल्या मधात बुडवलेल्या,
त्या तुझ्या पाकळ्या मखमली,
चंद्रही ढगाआड लपला होता,
जेव्हा हळुवार खुडली मी ती अबोली...
आता हा सुद्धा एक किस आहे... अश्लिल आहे का ?
प्रसाद गोडबोले मनापासुन
प्रसाद गोडबोले मनापासुन आभार...आणि खूप खूप धन्यवाद.
भरत मयेकर ....!!
साजिरा, आपण म्हणताय ते योग्यच...
घाईघाईत लिहले होते, तपासुन न पहाता तसेच संपादीत केले...
असो चुक म्हणजे चुकच...
लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
avdhut जी, 'डब्बा ऐस पैस' नावाचा एक खेळ आहे...
थोड्क्यात लपछपी सारखा.
अमित जी, कविता बदलतात कि नाहि माहित नाहि,
पण हिंदी चित्रपटांचा प्रभाव नक्किच नाही,
कारण तितके सवंग असे हे नक्किच नाही.
thete_swati ह्यात अश्लील असे काय दिसते?
सांगाल तर बरे होइल....
बाकी सार्यांचे मनापासुन आभार.
धन्यवाद!!!
thete_swati ह्यात अश्लील असे
thete_swati ह्यात अश्लील असे काय दिसते?
सांगाल तर बरे होइल....>>>> अश्लील नाही दीसत तर काय चुंबन
ह्या वीषयाची शीकवणी घेताय का???
उत्तम कल्पना
उत्तम कल्पना आहे...
धन्यवाद!!
पण कोणता विषय?
म्हणजे चुंबन कि संवाद?
कारण कवितेत खरा विषय संवाद आहे...
चुंबन हे माध्यम...
मग कशाला किंमत द्यावी?
आपले आपण ठरवा!!
धन्यवाद ( तारे तोडल्याबद्दल)
द॑डवत बरका गुर्जी !! ( तारे
द॑डवत बरका गुर्जी !! ( तारे जोडल्या बद्दल ! )
तारे होठोन्पर.......!
तारे होठोन्पर.......!
तो काही फक्त उन्माद
तो काही फक्त उन्माद नसतो...
तीही एक भाषा आहे...प्रेम व्यक्त करण्याची...
संवादाचे परिमाण जेव्हा...
तोकडे पडू लागतात...
तेव्हाच उपसायचं हे म्यानबंध हत्यार.. ग्रेट
परि तु जागा चुकलासी
परि तु जागा चुकलासी मित्रा...
हे कै च्या कै मध्ये कशाला?
धन्यवाद.
धन्यवाद.
मला कविता आवडली.. अन येस्स
मला कविता आवडली.. अन येस्स विशाल इज राईट !!!
अन मग रस्सीखेच सुरू
अन मग रस्सीखेच सुरू करायची

हाड नसलेल्या अवयवाची .....
....आणि झोप आलेल्या डोळ्यांची ही !
मयुरेश तुझी कविता मस्तच
मयुरेश तुझी कविता मस्तच आहे.
यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही आणि असेल तर तो नजरेतला दोष समजावा.
धन्यवाद!!
धन्यवाद!!
चुंबन घेतलही असेल
चुंबन घेतलही असेल कधीकाळी...
आठवतही नाही आता..
कुणास ठाऊक?
कदाचित कैक अनादी
जन्म-मरणांच्या फेर्यांत!
एखादवेळेस..!
ती माध्यमं आहेत गं..
संवादाची, ऐलतीरी पसरलेली!
आपण अजुनही त्यांवरच जगायचं?
वाटलं पैलतीरी आलोय...
गुंतलीयेस का त्याच फेर्यांत अजूनही ?
पुन्हा मला गुंतवत?
अन् मलाही तेच हवय?
नाही... नक्कीच नाही!!!
मयुरेश चव्हाण, मुबंई.
१८.०८.१०, १३.५०.
Pages