बे एरीया, कॅलिफॉर्निया

Submitted by admin on 3 April, 2008 - 17:40
बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर बे एरियातील मायबोलीकर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणूनच 'भगवान परशुराम होते मार्शल आर्टचे जनक', 'लग्नाच्या सुहागराती घ्या ही काळजी', 'सत्यनारायण पूजेचे दहा फायदे', 'या कारणासाठी कंडोम वापरू नका' असल्या बातम्या दिव्य मराठी, लोकमत, झी न्यूज यांच्या संकेतस्थळांवर असतात
<<<<<<<<<<<<<
Lol Lol

>> अमेरिका, युर्प इथली वर्तमानपत्रं पैसे मागतात, किंवा महिन्याला पाच किंवा दहा लेखच फुकट वाचता येतील असे नियम करतात.

ठीक आहे पण मग ज्यांची पैसे भरायची अथवा लिमीटेड अ‍ॅक्सेस करता (महिन्याला ५-१० लेख फुकट) तयारी आहे त्यांच्याकरता तरी काही सोय करा म्हणावं! :|

वर्तमानपत्रातले लेख फुकट वाचता येतातच. प्रश्न असतो तो असल्या कचर्‍याचा किंवा 'ब्रेकिंग न्यूज'चा. हा कचरा किंवा फुटकळ बातम्या वाचणारेच आज बहुसंख्य आहेत.

Happy
"सोय करा" म्हणजे क्लीनर वेबसाईट अ‍ॅक्सेसिबल ठेवा.

जाऊ द्या, झालं! ओंस का प्याला शोधावा त्यापेक्षा! Wink

म्हणूनच 'भगवान परशुराम होते मार्शल आर्टचे जनक', 'लग्नाच्या सुहागराती घ्या ही काळजी', 'सत्यनारायण पूजेचे दहा फायदे', 'या कारणासाठी कंडोम वापरू नका' असल्या >>> Lol

कुबेरांच्या अग्रलेखांमुळे सध्या लोकसत्तेला पाण्यात पाहणारे अनेक आहेत >> हो त्यांच्या अग्रलेखांच्या खालच्या ट्रोलांच्या प्रतिक्रिया मस्त असतात Lol

सध्य फक्त लोकरंग आणि सप्तरंग वाचावे म्हणजे. तोंडी लावायला काही संपादकीय आणि लाल किल्ला आहेत.

(रच्याकने मास्तर येतील असे वाटलेच होते Wink )

लोकमतची मंथन ही रविवार पुरवणी देखिल वाचनीय असते. लोकसत्ताच्या पुरवण्या जरा शहरी, (अति) उच्चमध्यमवर्गीय मराठी समाजात अडकून पडल्या आहेत असं वाटतं. त्यापेक्षा लोकमत पुरवणीत बऱ्याच तात्कालिक आणि प्रादेशिक विषयांवरचे लेख असतात.

काय माहिती पण लोकमत कधी आवडलाच नाही. लहानपणापासून दररोज सकाळचे वाचन असे आणि रविवारी खास लोकसत्ता आणला जायचा. अजूनही तशीच सवय आहे. लोकमतने १ रुपयामध्ये पेपर देवून बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातले लेख इतके काही आवडले नाहीच. सप्तरंग मध्ये अजूनही तात्कालीक लेखांबरोबर उत्तम कांबळ्यांचे गावोगाव भटकून मिळालेले अनुभव वाचायला चांगले वाटतात. त्यातही लोकमत हे खास दर्डांनी एका पक्षाकरता काढलेले आहे असा एक समज माझ्या मनात झालेला आहे तो काही बदलता आलेला नाही.

>> शहरी, (अति) उच्चमध्यमवर्गीय मराठी समाजात अडकून पडल्या आहेत
हे वाचून ती जुनी "पुरणपोळी कशी खायला आवडते" चर्चा आठवली.
असंही जाणवलं मी आणि माझ्या माहितीतले लोक मॅजॉरिटी ने मटा किंवा लोकसत्ता वाचणारेच आहेत. मग एकदम "कूपमंडुक" फिलींग आलं.

अति) उच्चमध्यमवर्गीय मराठी समाजात अडकून पडल्या आहेत >>> हे चिकन्/एग असावे. नेहमीचे वर्गणीदार शहरी असतील, तर लेखही त्यांना टार्गेट केलेले, त्यामुळे ग्रामीण वाचकाला इण्टरेस्ट नाही अशी सायकल असेल.

त्यातही लोकमत हे खास दर्डांनी एका पक्षाकरता काढलेले आहे असा एक समज माझ्या मनात झालेला आहे तो काही बदलता आलेला नाही. >> बातम्या वाचून माझाही तसाच समज झालेला आहे.

>> हे चिकन्/एग असावे

फा ने त्याच्या स्वभावाला साजेसा स्वीट स्पॉट शोधला. Happy

*फ्रेण्ड्स आठवणीचा कढ*
काल रॉस चं एमिली शी लग्न तुटतं तो एपिसोड बघत होते. ते तुटायच्या आधी एमिली रॉस ला सांगते की जर ह्यापुढे तू रेचल शी सगळे संबंध तोडणार असशील तरच मी न्यु यॉर्क ला येईन. रॉस मान्य करतो आणि ते रेचल ला सांगण्याच्या प्रयत्नात असतो. रेचल अपार्टमेन्ट मध्ये येते तसे जोई, मॉनिका, चँडलर आणि फिबी (मॉनिका ची मॅट्रेस फ्लिप करायची आहे अशी खोटी सबब देऊन) मॉनिका च्या रूम मध्ये पळतात जेणेकरून रॉस ला एकट्या रेचल शी बोलता यावं. रॉस तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो आणि रेचल तिला आलेली मेल चाळत असते ज्यात ती वाचते की त्यांचा फॅमिली डॉग "लेपु" ( Lol ) स्वर्गवासी झाला आणि रडायला लागते. तिच्या सॉबिंग चा आवाज ऐकून बाकीच्यांनां वाटतं रॉस चं बोलून झालं आणि ते रेचल चं सांत्वन करायला बाहेर येतात; "oh, sweetie" वगैरे करत. रेचल नुसताच "लेपु" असा माइल्ड टाहो फोडते तर फिबी म्हणते "I know it feels like 'lepu' right now, but I am sure it will get better" Proud

लेपु Lol

पण माझा स्वीट स्पॉट कळाला नाही.

तो न्यू यॉर्क ला परत आल्यावर सॉरी म्हणून एमिलीला फुले पाठवेन म्हणतो, तर चॅण्डलर त्याला म्हणतो की त्यावर तरी नाव एमिली लिही Happy

तुझा स्वीट स्पॉट असं नाही वरच्या सिच्युएशन मधला स्वीट स्पॉट. जिज्ञासा ने म्हंटलं (आरोप केला) की लोकसत्ता च्या पुरवण्या शहरी, (अति)उच्च वर्गातल्या मराठी वाचकांनां टारगेट ऑडियन्स धरून काढलेल्या असतात. त्यानंतर मी मान्य केलं की माझ्या ओळखीत (मी मुंबई मध्ये रहाणारी वगैरे) कोणीच मटा, लोकसत्ता सोडून आणखी काही वाचत नाही. तर तू स्वीट स्पॉट शोधलास की मटा, लोकसत्ता तसे आहेत हा चिकन अ‍ॅण्ड एग प्रॉब्लेम आहे ; कोण्या एकाचा नाही (ना वाचक, ना वृत्तपत्र स्वतःहून).

हो, हा सिजन मजेदार चालू आहे. फिबी लेबर मध्ये जाते म्हणून हॉस्पिटल मध्ये अ‍ॅड्मिट होणार असते. तिकडची नर्स अ‍ॅड्मिट करून घेताना विचारते "हू इज द फादर"? फिबी म्हणते "फादर इज माय ब्रदर" Lol त्यावर रेचल म्हणते " I am going to miss you freaking people out like that" Happy

ती आधीही एक दोनदा एमिली च्या घरच्या लोकांनां फोन करते तेव्हा म्हणते "आय अ‍ॅम हॅविंग माय ब्रदर्स बेबीज् " Happy

ओह मेरी तारीफ मे कुछ अर्ज किया था! थॅंक्यू थँक्यू Happy

मी पुन्हा पहिल्यापासून सुरू करून एस-२ वर आहे. या सीझन मधे की पहिल्या, लक्षात नाही एक चँडलर चा भन्नाट डॉयलॉग आहे जोई वर वैतागल्यावरः
"You know the thing where you and I talk about things?"
"Yeah?"
"Let's not do that anymore"

त्याचे असे क्वर्की डायलॉग्ज् माझ्या लक्षात रहात नाहीत Happy

फिबीचाच अजून एक आठवतोय सध्या ह्या सीजन मधला. तिन्हीं बेबीज् डिलीव्हर होतात आणि फ्रँक ज्युनिअर फायनल अपडेट द्यायला बाहेर येतो. "चँडलर इज अ गर्ल"! Lol
मग नंतर चँडलर फिबी ला विचारतो की जर ती मुलगी आहे तर फ्रँक आणि अ‍ॅलिस ने दुसरं नाव शोधलं का (बेबी) चँडलर साठी. फिबी म्हणते, "नाही, त्यांनीं चँडलर हेच नाव ठेवायचं ठरवलंय". त्यावर चँडलर विचारतो, "पण मुलीकरता हे नाव मॅस्क्युलीन नाही का वाटत", तर फिबी म्हणते "इट वर्क्स ऑन यु"??!! Lol

(आता असामी येणार आहे "टाईम आऊट" द्यायला)

आम्ही आता फ्रेंडस पूर्णपणे बंद करून नेचर शोज वर हूक्ड आहोत. साऊथ पॅसिफिक पाहिला, आता मदागास्कर पहातो आहोत. हे बीबीसी चे शोज खूप भारी आहेत. नक्की पहा.