अबोल आई

Submitted by कमलेश पाटील on 29 May, 2010 - 01:58

तो आईला म्हणाला,तु समजूनच घेत नाहीस मला.
खरं तर आजकाल्,जातच नाही आपण एकमेकांच्या गावाला.

कदाचीत माझे शब्द अबोल झालेत,
किंवा त्यांचा अर्थच संपलाय.
कदाचीत तुझ्यामाझ्यात बोलण्यासारखा,
काही विषयच नाही उरलाय.

आई अगदी शांतच राहते,
आठवत तिच्या या तरुण मुलाच बालपण.
ज्याच्या प्रत्येक शब्द झेलण्यासाठी,
केली तिने आपल्या पदराची झोळी.

ज्या मुलाच्या तुटलेल्या शब्दांचं,
वाक्य बनवून अर्थ उमजून घेतला.
त्याच मुलाने 'आई तुला माझं म्हणणच कळत नाही'
म्हणत शब्दांनाच बांध घातला.

तिच्या जवळ शब्दांचा साठा असुन सुद्धा,
तिच्याच मुलाला ती निशब्द वाटणं.
अन् त्याचं लहानपण आठवुन,
कळतो का एखादया शब्दाचा अर्थ म्हणून तिचं धडपडणं.

गुलमोहर: 

ज्या मुलाच्या तुटलेल्या शब्दांचं,
वाक्य बनवून अर्थ उमजून घेतला.
त्याच मुलाने 'आई तुला माझं म्हणणच कळत नाही'
म्हणत शब्दांनाच बांध घातला.

व्वा!!!!!!!!!!