तो एक वृक्ष

Submitted by निंबुडा on 18 May, 2010 - 02:58

२८ फेब्रुवारी १९९८ या दिवशी (१० वी ची बोर्डाची परीक्षा येऊ घातली असताना) अस्मादिक काव्यलेखनात रममाण झालो होतो. त्याचा हा घ्या पुरावा. मुक्तछंदात्मक कविता आहे.

तो एक वृक्ष

दूर तिकडे त्या माळरानावर
आहे उभा एक वृक्ष वठलेला जीर्ण झालेला

पोखरलेला बुंधा जीर्ण पाने आणि
मोडक्या फांद्या एव्हढीच उरलीय त्याची शोभा

कधी एके काळी हाच होता पांथस्थांचा आसरा
पक्ष्यांचा निवारा अन खुरट्या वेलींचा सहारा

हिरव्यागार पानांनी, घरट्यांनी सदा बहरलेला
लाल तांबड्या फुलांच्या मोहराने सदा सजलेला

एके दिवशी परंतु, आकाशीची ती चपला
आली धरणीवर द्याया तरुला आलिंगन

भस्मसात झाली तरुची शोभा, तरुची छाया
नष्ट झाला पाखरांचा निवारा अकस्मात क्षणार्धात!

आजही एकाकी निष्पर्ण असा दूरवर उभा तो
पण याचा त्याला ना विषाद ना खंत

शांत अविचल स्थिर स्तब्ध उभा तो
अगदी चिरनिद्रा घेतलेल्या बुद्धासारखा!

गुलमोहर: 

एखाद्या अक्षराचा पाय मोडायचा असेल तर कसे लिहायचे?
उदा: "पक्ष्यांचा निवारा अन खुरट्या वेलींचा सहार" या ओळीमध्ये मला 'अन' या शब्दामध्ये 'न' या अक्षराचा पाय मोडायचा होता, पण जमेचना!
काठीने फटका मारून पाहिला, जोरात धडक मारून पाहिले तरी पान काही मोडला नाही 'न' चा Wink उपाय सांगा Happy

"अन" लिहायचा असेल तर, "न" ला कोणतही अक्षर जोडा ("न्ह") आता "ह" घालवण्यासाठी बॅकस्पेस मारून स्पेस द्या. बघा ट्राय करून. मी तरी तसच करतो. वाटल्यास लिहून दाखवतो.

अन्

आवडेश Happy