मायबोली Statistics

Submitted by HH on 28 April, 2010 - 16:24

मायबोलीवरील विषयवार यादी मधे कविता विषयावर केलेले हे (रिकामटेकडे) संशोधन

कविता या विभागाखाली आज २८-०४-२०१० दिवशी पर्यंत पोस्ट झालेल्या कविता : ४०००

यात सर्वात जास्त संख्येने कविता लिहीणारे टॉप ५ कवी खालील प्रमाणे आहेत.

Harish_dangat- २०७ कविता
अज्ञात - १९६ कविता
कौतुक शिरोड्कर -१८३ कविता
विशाल कुलकर्णी - १३७ कविता
बासुरी - ९९ कविता

यात आणखी एक नमूद करण्या सारखी गोष्ट ही की जवळ जवळ सर्व कवींना मायबोली वर सदस्यत्व घेऊन साधारणपणे सरासरी १ वर्ष ३० आठवडे ईतका काळ झाला आहे. (अपवाद कौतुक शिरोडकर यांचा त्यांचा सदस्यत्व कालावधी २ वर्ष + आहे.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अग हो तू कुठेही म्हणलच नाहीस. पण त्यावरुन सुचलं म्हणून लिहलं. क्वांटीटीचा क्वालिटीशी साहित्यात संबंध येईलच असे नाही इतकेच म्हणायचे होते.

एक statistic मात्र नक्कि आहे, HH तीच्या लेखनावर शेकडोनी प्रतिक्रीया मिळवते.
HH, तू फंडू आहेस!

पाचाना मध्ये घेवून छान महाभारताच दर्शन घडवलत .धन्य ,धन्य इ जगतातले इ महाव्यास .जय हो .

अरेरे...!!

जनमानसात कवी या "प्राण्याचे" काय स्थान आहे, हे यावरून सहज लक्षात यावे.

कवीराजेहो, हे खालील प्रतिसाद बघा.

१) मायबोलीवर छ्प्पर फाड कवी आहेत.
२) 'रेट ऑफ पोएम्स पर डे' असे अ‍ॅनॅलिसिस करायला हवे!
३) यातल्या किती कविता खरच वाचकांकडुन वाचल्या जातात याची पण नोंद करायला हवीये.
४) अशक्य शालजोडीतले !!
५) हायला शालजोडीतले.
६) धन्य! काय प्रजननदर आहे!
७) कविता लोकांनी वाचाव्या म्हणुन टाकल्या असतील तर लोकांच्या प्रतिक्रियांवरुन बोध घ्यायला हवा.
८) जे लोकं भरमसाठ कविता पाडतात त्यांची फक्त टिका करायची आहे.
९) पुलेशु लिहीलं तर हे त्यांच्या पोतडीतुन मण भर फुटाणे सांडावेत असे कविता/लेख सांडतील. कोणी सांगितलेत नसते लफडे!
१०) आता चांगली कलाकृती कुठली हे कलाकारास आतून नक्की कळते.
११) इथेच लफडं आहे. बरं आतुन नाही कळलं तर बाहेरुन लोकं सांगतायत तर त्यांचं ही ऐकत नाही. आता बोल?
१२) शेवटी लेखन कसं आहे हे त्याच्यावर दिलेल्या चांगल्या प्रतिक्रियांनी ठरतं (एखाध्या ठराविक गृपनी दिलेल्या प्रतिक्रियांनी आजिबात नाही).
//////////////////////////////////////////////////////////

अवांतर...१
माझ्या मते कवितांची क्वालीटी ही कवितांच्या क्वांटीटीवर अवलंबून असतेच असे नाही.
याउलट कवितांची क्वालीटी ही कवीवर अवलंबून असते.
जसा कवी तशी त्याची कविता.
माझ्या सारख्या 'फालतू' माणसाने १० वर्षात १ याप्रमाणात कविता रचल्या तर त्या काय कुसुमाग्रज, गोविंदाग्रजाच्या तोडीच्या होतील?
मेंढकीने कीतीही खुराक खाऊन व्यायाम केलेत तर ती काय म्हैशीची बरोबरी करेल?
/////////////////////////////////////////////////////////
अवांतर...२
कविता वाचणार्‍यांनी, चांगल्या कवितांचा गुणगौरव/रसग्रहण करणार्‍यांनी, चुकीच्या कवितांवर सुधारणा सुचविणार्‍यांनी, जर कवींना सल्ला दिलात तर तो विचारकरण्यायोग्य असेल, असे मला वाटते.
///////////////////////////////////////////////////////

दुरूस्ती.

जे लोकं भरमसाठ कविता पाडतात त्यांची फक्त टिका करायची आहे.
हे वाक्य मी खालीलप्रमाणे वाचले.
जे लोकं भरमसाठ कविता मायबोलीवर पेस्ट करतात त्यांची फक्त टिका करायची आहे.
//////////////////////////////////////////////////////
या बाफवरील माझी ही एकमेव आणि शेवटची पोष्ट.

या विषयावर विस्तृत चर्चा करण्यासाठी स्वतंत्र बाफ हवा, असे वाटते.
त्यामुळे नवोदितांना बरेच काही शिकता येईल, असेही वाटते.

अरेरे..मलाही कविता वाचायला विशेष आवडत नाही कारण त्या कळत नाहीत.
पण म्हणून कुणाही कवी विषयी बाकीच्यांनी इतक्या खालच्या पातळीवर उद्गार काढावेत, हे किती वाईट Sad काही लोकं कविता लिहित नसले तरी त्यांचे गद्य लेखन ही फार वरच्या दर्जाचे असते असे नाही (वर्षातून १ टाकले तरी)..पण इथे असलेले मित्र्-मैत्रिणी आपापल्या मित्र्-मैत्रिणीच्या सुमार लेखनालाही "व्वा, किती छान", "पुलेशु" वगैरे लिहिताना दिसतात (आतापर्यंत मी काहीच न लिहिल्यामुळे, कुणाविषयी ही आकसाने हे विधान नाही, माझे निरिक्षण फक्त)..बहुधा TRP वाढवण्यासाठी Sad असल्या लेखांचे ही एक स्टॅट येणार का?

<<पण म्हणून कुणाही कवी विषयी बाकीच्यांनी इतक्या खालच्या पातळीवर उद्गार काढावेत, हे किती वाईट अरेरे>>
खरंच...

तुमच्या कवितांचा दर्जा (खरे तर पोस्टचा देखील) तुम्ही कोणत्या टोळीचे सदस्य आहात त्यावरही अवलम्बून असतो....

छान चाललेय....
किती श्रम घेतलेत तुम्ही ही माहिती जमा करण्यासाठी? आनंद वाटला. चालु द्या.... Wink

आता तुमच्याकडुन बाकीची माहिती ही मिळेल ही नम्र अपेक्षा आहे.. म्हणाजे बघा...
गेल्या वर्षभरात किंवा जो काही कालावधी तुम्ही गृहीत धरला आहे त्यात एकुण किती कवि /कवयित्रींनी माबोवर लिहीले, कुणी किती कविता लिहील्या? हे ही सांगा..

कारण वरची टोटल एकुण ८१२ होते. मग ४००० उणे ८१२ म्हणजे राहील्या ३,१८८ कविता! यात कोण कोण आघाडीवर आहे ते ही सांगा?

लगे हातो चांगल्या कवितेला चांगलं म्हणण्याची तसदी न घेणारे, पण नवीन कवी/कवयित्रींना शुद्धलेखन, लय, गेयता इ. गोष्टींवरून अतिशय खालच्या पातळीवर उतरून टोमणे मारून , लिखाण सुधारण्यात मदत करण्यापेक्षा , त्यांनी पुन्हा आयुष्यात काही लिहीण्याच्या वाटेलाच जावू नये अशी व्यवस्था करून ठेवण्यात इतिकर्तव्यता मानणारे किती आय.डी. आहेत, आणि कोण आघाडीवर आहेत याचेही थोडे स्टॅटिस्टिक्स काढा ना.

विशेष म्हणजे विशाल कुलकर्णी किंवा हरिश दांगट कवी नसतील कदाचीत...पण ज्यांच्या शब्दांचा मोह पं. शौनक अभिषेकींसारख्या कलंदरालाही पडला त्या अज्ञातांच्या कविता, केवळ क्वांटीटी वाढली म्हणुन त्यांची क्वालिटी कमी होत नाही. हेच विधान थोड्या फार फरकाने कौतुक शिरोडकरांच्या कवितांनाही लागू होते. कुजकटासारखे प्रतिसाद द्यायला हजर असणार्‍यांपैकी किती जण क्रांती सडेकर, प्राजू, गिरीश कुलकर्णी, जयंतदादा यांच्यासारख्या उत्कृष्ट कविंच्या कवितेला मनापासुन दाद देतात त्याचेही स्टॅटिस्टिक्स काढा एकदा.

अर्थात जोपर्यंत वाचणारे वाचताहेत, आवडलं म्हणुन सांगताहेत, चुकलं तर हक्काने कान धरताहेत तिथे रस्त्यावरच्या भटक्यांनी कितीही तंगड्या वर केल्या तरी त्याची पर्वा कुणी आणि का करावी?

चालु द्या तुमचं......!

है शाब्बास विशाल कुलकर्णी. अशा लेखांना आणि प्रतिसादांना किती किंमत द्यायची.
मला केदार यांच्याही सर्व पोस्ट्स आवडल्या, पटल्या.

>>त्याची पर्वा कुणी आणि का करावी?
विशाल - असं जर असतं तर तू इथे पोस्ट केलच नसतंस नाही का?

तरीपण एक विनंती आहे मायबोलिकरांविषयी काढलेला उल्लेख तुझ्या प्रतिक्रीयेतून तू उडव !

लोकहो, [जर लिहायचे असेल तर] सांसदीय भाषेत लिहा !

सहि विशाल,तुमच्याच प्रतिक्रियेची वाट बघत होते,
सहि जवाब. Happy
एक फुल,मस्त लिहिलय.

नंद्या, कुणीतरी हे सांगणं आवश्यक होतं... पर्वा करत नाही हे अज्ञात आणि कौतूकच्या पोष्टवरून आणि आजही त्या दोघांच्या कवितेवर येणार्‍या उदंड आणि सुज्ञ प्रतिसादांवरून लक्षात येतच आहे. माझ्या कवितांवर येणार्‍या प्रतिसादांबद्दल मी बोलणार नाही.
आणि माझा हा' शालजोडीतला' आहेर सरसकट माबोकरांसाठी नाही हे समजण्याइतके माबोकर नक्कीच सुज्ञ आहेत. तरीही कुणाला खटकले असेल तर मी त्या सर्वांची क्षमा मागतो, पण प्रतिसाद मी बदलणार नाही... Happy ज्याला जे पटेल त्याने ते घ्यावं, घ्यायलाच हवं असा आग्रह नाहीये. Happy आणि मस्करीच्या नावाखाली हे जे काही चाललेय ते वाचुन त्यावर तथाकथीत शालजोडीतले देतानाही याचा विचार व्हायला हवा. नाही Happy

बाकी योग, केदार , वंदना , रोहिणी आणि नानबा आभार Happy

पुन्हा तेच तेच तेच चालू झाले का इथे?

वाचले नसतील त्यांनी आधी 6214, 6382, 7593 वाचून या. एवढी चर्चा होऊनही कुठे काही फरक पडलेला नाही. त्यामुळे या आकडेवारीतून कोणी बोध घेतो म्हणणं आणि कोणी घ्यावा अशी अपेक्षा करणं याला काही अर्थ नाही. एवढी चर्चा होऊन जे झाले नाही ते आता काय होणार? Happy दोन्ही बाजूच्या लोकांना 'हे असंच चालणार' हे माहीत आहे. तर मग इन्टरेस्टिन्ग माहिती म्हणून सोडून द्या.

बासुरी, तेवढे शतक पूर्ण करा. पहिल्या पाचात स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन! Happy Light 1

बासुरी, तेवढे शतक पूर्ण करा. पहिल्या पाचात स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळवून दिल्याबद्दल अभिनंदन! >> Happy हिचा आपला सारखा संयुक्ता मोड ऑन असतो Proud

एखाद्या कवितेवर प्रामाणिक प्रतिक्रिया दिल्यावर अंगावर धावून येणारे, तू जातेसच कशाला असा किंवा (अतिशय तिखट आणि टोचर्‍या शब्दात) भाषेवरून फुकाचा उपदेश करणारे बरेचसे इथे खवचटपणे मजा घेतायत हे बघून खूपच गंमत वाटली.
थोडक्यात या लोकांच्या कुठल्याच म्हणण्याची पत्रास न बाळगता जेव्हा जसं वाटेल/ पटेल तसं आणि जिथे वाटेल तिथे स्पष्ट पण प्रामाणिक प्रतिक्रिया देत राह्यलं पाहिजे हे माझं माझ्यासाठी परत एकदा अधोरेखित झालं.
कुठल्याच कंपूचे सदस्यत्व नसल्याने आपण खूप सुखी आहोत हे अजून एकदा कळलं. सुखी उदाहरणार्थ...
कंपूची दडपणे आणि भिंतींशिवाय आपल्याला जे म्हणायचंय तेच म्हणता येणं. प्रत्येक कंपूतल्या काही चांगल्या लोकांशी 1 to 1 पातळीवर मैत्री असणं/ ठेवता येणं ... इत्यादी..

चला याबद्दल हह चे आभारच मानले पाहिजेत.

लालू तू काय एक स्प्रेडशीट वगैरे तयार करुन ठेवले आहेस की काय आकड्यांचे? वर्गवार यादी वगैरे Happy का बूकमार्क आहेत सगळे..

लालू तू काय एक स्प्रेडशीट वगैरे तयार करुन ठेवले आहेस की काय आकड्यांचे? वर्गवार यादी वगैरे का बूकमार्क आहेत सगळे.. >>> मी अगदी हेच विचारणार होतो. मायबोली बखरकार म्हणुन शोभेल. Happy

या पाचही कवींच्या जवळजवळ सगळ्या कविता मी वाचलेल्या आहेत. अस करतांना माझी अभिरुची संशयास्पद झालीय अस मला कधीही वाटलेल नाही. ज्याला कविता निर्मयपणे वाचायला आवडतात तो या सगळ्या कविता वाचत असेल असे मला वाटते. त्याला सगळ्याच आवडल्या असतील असेही नाही पण म्हणुन अशा प्रकारे त्यांच्या लेखनाची टवाळी निश्चीत उत्साहवर्धक नाही.
साहीरइतके आनंद बक्षी श्रेष्ठ नाहीत पण म्हणुन त्यांनी जे काही केलय ते कुचेष्टेचा विषयही नाही. मी स्वतःही इथे खोर्‍यानं कविता लिहील्या आहेत कारण मायबोली खुलं व्यासपीठ आहे अन इथे माझ्यासारखे अप्रकाशित लोक येऊन लिहीतात. जर मी गुलजा़र किंव्हा अगदी राजन खानही असतो तर मीही पुस्तके छापली अन विकली असती..पण तसे नाही म्हणुन ते इथे लिहीत नाहीत अन मी लिहीतो. मग त्या अननुभवातन काही आततायीपणा/चुका होणारच पण त्याकरता वरील चांगल्या लिहीणार्‍यांना अस टारगेट करणं बर नव्हे अस मला प्रामाणिकपणे वाटते.त्यांनी कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षेविना मायबोलीच्या वाचकांना काही काळतरी रीझवल आहे अन त्याची पावती त्यांना त्यांच्या फॅन्सकडुन वेळोवेळी मिळालेली आहेच.
क्वालीटी -क्वांटीटी हा कलेच्या प्रांतातला प्राचीन - अर्वाचिन मुद्दा आहे अन तो हवा तसा पेश केला जाऊ शकतो. असो.

वा.. शेवटी ज्यानी ही माहिती खिलाडू वृत्तीने घ्यायची होती त्यानी ती घेतलीच. इतरांचं जाऊ द्या!!!! त्यानी त्याची "लेव्हल" दाखवली असे मी म्हणेन. Happy

मुळात ही माहिती कवितांच्या संख्येबाबतच असताना त्यामधे "दर्जाचा" प्रश्न कसा काय निर्माण होउ शकतो हे मला अजून समजलेलं नाही. मायबोलीवर् सर्वात जास्त बीबी हे कविता विभागात आहेत, असे म्हणायला हरकत नाही!! तरीदेखील त्यामधे टॉप ५ अशी माहिती समोर आल्यावर त्याचा काही जणांना काय त्रास होतोय?? किंवा त्यावरून वरील ५ कविवरती टीकाच केली गेली आहे असा अर्थ कसा काय निघू शकतो??? तसा अर्थ काढणार्‍याना शि. सा. न.

हरीश दांगट यानी २०७ कविता मायबोलीवर प्रसिद्ध केल्या आहेत. यामधे या सर्व कविताचा दर्जा/प्रतिसाद/ (मग ते ठराविक कंपूमधले असोत वा हरीश दांगट यानी स्वतः २५ डु आयडी वापरून केलेले असोत वा मायबोलीवरच्या सर्वात "तथाकथित" काव्यरसिकानी दिलेले असोत) किंवा या कविनी इतर कविना दिलेले प्रतिसाद याचा संबंध असण्याची आवश्यकता काय??? ( वरील फक्त एक उदाहरण म्हणून दिलय.) हेच सरसकटपणे इतर टॉप ४ कविबद्दलही (आणि कविता विभागात लिहिणार्‍या प्रत्येक कविला) लागू पडते!!!

मुळात नविन लेखन वर क्लिक केल्यावर एकाच कविच्या पाच किंवा सहा कविता दिसत असताना किती कविता वाचणार आणि किती कविताना प्रतिसाद वाचक देणार??? हा विचार स्वतः कवि करत नाही म्हणजे त्याला प्रतिसादाची गरज नाही, असे म्हटले तर चूक काय? की फक्त कविता लिहायची म्हणून लिहायची. त्यामधे काही सुधारणा सुचवल्या तर लगेच "खालच्या पातळीवरचे टोमणे" म्हणून आगपाखड करायची??? की लगेच लोकाना "ज्ञानेश्वराच्या कविता कळत नाहीत तर माझ्या काय समजणार?" असे हास्यास्पद विधान करायचे????

हे म्हणजे "इथे फक्त चांगल्याच प्रतिसादांचे स्वागत केले जाइल. इतरानी इथे लिहिण्याचे कष्ट घेऊ नयेत" असे म्हटल्यासारखेच आहे की!!! आणि मग जेव्हा वाचक हळू हळू कविता विभागाकडे दुर्लक्षच करू लागतो तेव्हा "चांगल्या कविता तरी कोण वाचतं??" असं ओरडायचंच की!!! आणी जे खरंच चांगले लिहिणारे असतात ते प्रतिसाद येत नाहीत म्हणून मायबोलीवर कविता लिहिणंच बंद करतात. पण त्याबाबत कुणाला सोयर सुतक असतं???? इतर कवि नेमाने त्याच्या पाच सहा कविता प्रसिद्ध करत राहतातच!!!!

एखादा कौतुक शिरोडकर सुरूवातीला भारंभार कविता टाकतो. अगदी "गृहिणीच्या लावणी" सारखा वेगळा प्रयोग देखील प्रसिद्ध करतो, त्यावर आलेल्या प्रतिसादांना पॉझिटिव रीत्या घेतो. नंतर स्वतःच स्वतःचा एडिटर होतो आणि मग सीलेक्टिव्ह कविता प्रसिद्ध करतो, त्याबद्दल सर्वानी त्याला मानलेलंच आहे की!!!

वरचे टॉप ५ सोडून द्या हो.. त्यात काही फार् राम नाही. मूळ मुद्दा हा आहे की, ४००० कविता मायबोलीवर प्रसिद्ध झाल्यात. त्यापैकी कित्येक कविताना शून्य प्रतिसाद असतील हे निश्चित... का असतील शून्य प्रतिसाद???? त्या कविने तरी विचार केलाय का?? आणि एक तरी कविता असेल जिला सर्वात जास्त प्रतिसाद असतील... ती कविताच जर या टॉप ५ पैकी कुणाची असेल तर दर्जाची चिंता का लोकाना सतावतेय???? Proud

शेवटी लालू म्हणाली ते सर्वात जास्त महत्वाचं.. "त्यामुळे या आकडेवारीतून कोणी बोध घेतो म्हणणं आणि कोणी घ्यावा अशी अपेक्षा करणं याला काही अर्थ नाही. एवढी चर्चा होऊन जे झाले नाही ते आता काय होणार? दोन्ही बाजूच्या लोकांना 'हे असंच चालणार' हे माहीत आहे. तर मग इन्टरेस्टिन्ग माहिती म्हणून सोडून द्या."

आणि या बीबीला आता शिवराळ भाषेचं (जे ऑलरेडी सुरू झालय) वळण लागण्याआधीच हेमाशेपो.

तिथे रस्त्यावरच्या भटक्यांनी कितीही तंगड्या वर केल्या तरी त्याची पर्वा कुणी आणि का करावी?
>>
कुठे केल्या तंगड्या वर? तुझ्या कवितांवर? त्या १३७ कवितांवरच्या समजा (उदाहरणार्थ) एकूण तीनेक हजार प्रतिसादांपैकी कितींमध्ये टोमणे, टीका, वाईट शब्द, खालच्या पातळीवाले आहेत? २५? ५०? १००? अर्थातच उरलेल्या प्रतिसादांत आवडली, छान, सुंदर असे प्रतिसाद आहेत- बरोबर ना?

राहिला प्रश्न इथल्या, किंवा यासारख्या बीबींवरचे प्रतिसादांचा. तर, इथे तुला जसे आडून का होईना, त्यांना 'भटके कुत्रे' म्हणण्याचा अधिकार आहे; त्याचप्रमाणे त्यांनाही प्रजजनक्षमता आणि शालजोडी इत्यादी शब्द (तुझ्या कवितांच्या बीबींवर नाही, तर इथेच, आणि यासारख्याच बीबींवर) वापरण्याचा अधिकार आहे. अज्ञात, कौतुक किंवा तुझ्या कविता इथे लोकांना कळत नाहीत (तरीही का टाकाव्यात इथे, हाही एक प्रश्न आहेच) असं म्हणण्याचा तुला जसा अधिकार आहे; त्याचप्रमाणे अशी सांख्यिकी माहिती आणि त्यावरचे लोकांचे प्रतिसाद तुला / कवींना झेपत नाहीत आणि छान, सुंदर म्हटले की पुन्हापुन्हा आभार मानले जातात हेही म्हणण्याचा लोकांना अधिकार आहेच- तू कितीही नाकारलास तरी!

'भटके कुत्रे' सारखी शेलकी विशेषणे वेळोवेळी वापरून पुन्हापून्हा लोकांच्या मनात आपणच आपल्याबद्दल अढी तयार करत असतो, हे येतेय का लक्षात? या ८१२ किंवा एकूणच ४००० कविता म्हणजे सरसकट भंगार असण्याची अजिबातच शक्यता नाही. पण एखाद्या 'क्ष' मायबोलीकराने पुढल्या वेळी तुझी एखादी सुंदर कविता वाचल्यावर प्रतिसाद देताना कुठेतरी ही तुझी विशेषणे त्याच्या मनात असली, आणि त्याने हात आखडता घेतला, तर तो सारा दोष त्या 'क्ष'चा; असे म्हणतोस? Happy

पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा अरभाटाने लिहिलेले सांगतो- 'आता आहे त्यापेक्षा कमी, संयत वेगाने कवींनी कविता टाकल्या असत्या, तर आता घेतले आहे, त्याच्या कित्येक पटीने गांभीर्याने त्या कवींना घेतले असते'. (या वाक्यात कवींचा 'चांगला दर्जा' अध्याहृत आहे, मान्य केलेला आहे, हेही लक्षात आले, तर बघ! Happy )

वा.. शेवटी ज्यानी ही माहिती खिलाडू वृत्तीने घ्यायची होती त्यानी ती घेतलीच. इतरांचं जाऊ द्या!!!! त्यानी त्याची "लेव्हल" दाखवली असे मी म्हणेन.>>>>

कुणी कुणाची लेवल दाखवली म्हणून कुणाला काय टोचलं हा ही एक स्टॆटिस्टिक्सचा विषय होवू शकतो... Happy

<<<मुळात ही माहिती कवितांच्या संख्येबाबतच असताना त्यामधे "दर्जाचा" प्रश्न कसा काय निर्माण होउ शकतो हे मला अजून समजलेलं नाही. >>>
काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही नाकारलंत म्हणून जे काही चाललय ते कुणाला कळतच नाहीये का? शालजोडीतले मारल्याचे उल्लेख जेव्हा होतात तेव्हा त्यातून काय अर्थ काढायचा?

@ साजीरा...
मायबोलीवर नवीन आल्यावर एक नवीन जागा मिळालीय आपल्या कविता प्रकाशित करायला या उत्साहात पटापट एका मागून एक कविता टाकल्या जातात. माझेही तेच झाले. नंतर हळु हळू वेग कमी होत जातो. पण माझ्या पहिल्या सहा महिन्यात आलेल्या कविता आणि नंतरच्य सहा-सहा महिन्यात आलेल्या कविता यांची संख्या जर लक्षात घेतली तर वेग किती कमी झालेला आहे (अगदी हिच परिस्थिती हरिशच्या बाबतीतही आहे) हे सहज लक्षात येइल. पण ते न पाहता एकुण किती कविता टाकल्या गेल्या ( दिड वर्षात) यावर जर तूम्ही त्या कविची पात्रता ठरवणार असाल तर ते मात्र मान्य नाही. आणि एखाद्याने एका वर्षात २ कविता लिहील्या म्हणून तो चांगला कवि आणि एखाद्याने २०० लिहील्या म्हणून तो कविता पाडतो हेही मला मान्य नाही.

आणि त्याहिपेक्षा महत्वाचं म्हणजे जोपर्यंत मायबोली व्यवस्थापन मायबोलीला खुले व्यासपीठ म्हणतेय, कुणालाही कितीही लिहायला हरकत घेत नाहीये तोपर्यंत हे असंच चालणार. मी एकवेळ वेग कमी करेन (खरेतर केलाय.. गेल्या तीन चार महिन्यात मोजून ८-१० कविता आल्या असतील माझ्या, पण प्रत्येकाकडून ही अपेक्षा नाही करू शकत तूम्ही. तुम्हाला तो अधिकारच नाहीये Happy

कुठे केल्या तंगड्या वर? तुझ्या कवितांवर? त्या १३७ कवितांवरच्या समजा (उदाहरणार्थ) एकूण तीनेक हजार प्रतिसादांपैकी कितींमध्ये टोमणे, टीका, वाईट शब्द, खालच्या पातळीवाले आहेत? २५? ५०? १००?>>>>

हे विधान त्या २५-५० साठीच आहे. (जे टाकणारे आय.डी. सगळीकडे मग ती कविता माझी असो किंवा कुणाची असो ठराविकच असतात) आणि मी फ़क्त माझ्या कवितेबद्दल बोलत नाहीच आहे. मी मागेही म्हटलं होतं हा अनुभव इथे खुप जणांना आलेला आहे. विल्लप सारख्या कवयित्रीने तर त्यामुळे माबोवर कविता लिहीणेच सोडून दिले. आणि विरोध टीकेला, टोमण्यांना नाहीये फ़क्त.. पण जसे विरोध करता तसे त्या व्यक्तीच्या चुका सहज साध्या शब्दात सुचवता येवू शकतातच की. आणि एखाद्याला शिवी दिली तरच खालच्या पातळीवर उतरल्यासारखे होते असे थोडेच आहे. येता जाता एखाद्याची लायकी काढणे हाही खालच्या पातळीवर उतरण्याचाच प्रकार झाला. हा अधिकार या लोकांना दिला कुणी? तुम्हाला पटत नसेल नका वाचू.... वाचलेच टीका करायचीय जरूर करा, पण मग त्याबरोबर त्या व्यक्तीला त्याची चूक कशी सुधारायची तेही सांगा ना? पण ते इथे अगदी अपवादानेच होते.. एखाद्याला टार्गेट करण्याचाच प्रकार जास्त करून पाहायला मिळतो.

मायबोलीवर नवीन आल्यावर एक नवीन जागा मिळालीय आपल्या कविता प्रकाशित करायला या उत्साहात पटापट एका मागून एक कविता टाकल्या जातात. माझेही तेच झाले. नंतर हळु हळू वेग कमी होत जातो. पण माझ्या पहिल्या सहा महिन्यात आलेल्या कविता आणि नंतरच्य सहा-सहा महिन्यात आलेल्या कविता यांची संख्या जर लक्षात घेतली तर वेग किती कमी झालेला आहे >> बास की! हेच तर महत्त्वाचं आहे. ज्या जाणीवेतून तुमचा वेग कमी झाला असं तुम्हाला वाटतं त्याच जाणीवेविषयी इथे बोललं जातंय. त्यामध्ये कुणालाही 'टारगेट' करायचा हेतू मुळीच नाही. इथे दुसरी कोणतीही पाच नावं असती तरी प्रतिसादात फरक पडला नसता.
यावर जर तूम्ही त्या कविची पात्रता ठरवणार असाल तर ते मात्र मान्य नाही. आणि एखाद्याने एका वर्षात २ कविता लिहील्या म्हणून तो चांगला कवि आणि एखाद्याने २०० लिहील्या म्हणून तो कविता पाडतो >> असं कुणीच कुठेही म्हटलेलं नाहीये विशाल. इथे पात्रता कशी काय ठरवली गेली? एक कवी आणि एक उत्तम कवी यातला जो काय फरक आहे तो कशावरुन ठरतो असं तुम्हाला वाटतं? एखाद्या कवीच्या १० पैकी २ कविता उत्कृष्ट असतील आणि एखाद्या कवीच्या २ पैकी १ कविता उत्कृष्ट असेल तर कोणाला आपण उत्तम कवी म्हणू? दोघंही लिहीतात, पण दुसरा जे काही लिहितो ते सगळंच (क्वाटिंटी कमी झाली की आपोआप पर्सेंटेज वाढणारच!) छान असतं असा समज व्हायला किती वेळ लागेल? आणि मग वाचक १० पैकी कोणत्या २ चांगल्या असतील हे निवडण्यात वेळ घालवेल की ज्याच्या लेखनाबद्दल खात्री झालीये त्याच्याच दोन कवितांचा आस्वाद घेईल? या स्पष्टीकरणातून पुन्हा एकदा अरभाटाचंच विधान अधोरेखित होतंय की 'आता आहे त्यापेक्षा कमी, संयत वेगाने कवींनी कविता टाकल्या असत्या, तर आता घेतले आहे, त्याच्या कित्येक पटीने गांभीर्याने त्या कवींना घेतले असते'!
पण प्रत्येकाकडून ही अपेक्षा नाही करू शकत तूम्ही. तुम्हाला तो अधिकारच नाहीये >> चांगलं साहित्य वाचायला मिळावं एवढी तर अपेक्षा एक वाचक करु शकतो ना? अधिकार तर इथे कुणालाच कशाचाही नाहीये. 'कुणाला तो नाहीये' हे सांगायचाही अधिकार नाहीये इथे.
त्यामुळे वर बरेच जण म्हणतायत त्याप्रमाणे ज्याला जो हवा तो बोध घ्यावा, नसेल घ्यायचा सोडून द्यावा. Happy

अरे विशाल, नीट वाचतोस का पोस्ट? कविता टाकायचा वेग कमी करा, असं सांगण्याचा किंवा लिहायला हरकत घेण्याचा अधिकार इतरांना आहे- असं मी कुठे म्हटलं?

कवींचा 'चांगला दर्जा' गृहित धरून; शिवाय खुले व्यासपीठ, लोकशाही, हक्क, मायबोली प्रशासनाचे धोरण या सार्‍या गोष्टी मनात ठेऊनच ती पोस्ट लिहिली आहे. हे मुद्दे इथे तिन्हीत्रिकाळ कानावर आदळत असतात. (वरती लालूने दिलेल्या आकड्यांतही तेच दळण आहे) पुन्हा पुन्हा तेच ते काय?!

असो. (पण हेमाशेपो नाही)

कविता टाकायचा वेग कमी करा, असं सांगण्याचा किंवा लिहायला हरकत घेण्याचा अधिकार इतरांना आहे- असं मी कुठे म्हटलं? <<<<<

तू माझी पोस्ट नीट वाचलीस तर तुझ्या लक्षात येइल की तुला वैयक्तिकरित्या म्हटलेले नाहीये साजीरा... पण ही प्रवृत्ती माबोवर आहे हे नक्की. इथे जरी कुणी बोलत नसले तरी खाजगीत हे कबूल करणारे शेकड्यानी निघतील.

अज्ञात, कौतुक किंवा तुझ्या कविता इथे लोकांना कळत नाहीत (तरीही का टाकाव्यात इथे, हाही एक प्रश्न आहेच) >>>>
अज्ञातांच्या कविता एकवेळ अवघड असतात, कळत नाहीत हे समजु शकते, पण कौतूक किंवा माझी कुठली कविता आणि त्यातलं नेमकं काय अवघड वाटलं? कुणाला? याबद्दल काही सांगू शकशील?

>>अज्ञात, कौतुक किंवा तुझ्या कविता इथे लोकांना कळत नाहीत (तरीही का टाकाव्यात इथे, हाही एक प्रश्न आहेच) >> कविता कळणं न कळणं हे ज्याच्या
त्याच्या आकलनशक्तीवर अवलंबून आहे, एखादी दुसरी कविता समजत नाही म्हणून
सगळ्याच समजणार नाहीत असं मला नाही वाटत. प्रामाणिकपणे सांगतेय इथे एक
ग्रेट (सर्वानुमते) कवी आहे (कृपया नाव विचारू नये.) त्याच्या कविता मला अज्जिबात झेपत नाहीत, म्हणून मी लगेच असं म्हणू का की तो इथे कविता का टाकतो म्हणून? Uhoh

लालूनं लिहिलेल्या लिंक्स बघितल्या.. डोकं गरगरतय...
पटणार्‍या गोष्टींकरता वाद घालू शकते हा माझा दुराभिमान पार धुळीला मिळालाय..
मी टिकूच शकणार नाही - इतके वर्षानुवर्ष वाद घालत (असं आत्ता तरी वाटतय!)

बापरे, मानलं वर्षानुवर्ष टिकलेल्या सगळ्याच माबोकरांना!

जाता जाता गाणं आठवलं... "व्हील्स ऑफ द बस गोज राऊंड & राऊंड.. राऊंड & राऊंड ऑल थ्रु द टाऊन...."
गुड नाईट मंडळी! Happy

>> अज्ञात, कौतुक किंवा तुझ्या कविता इथे लोकांना कळत नाहीत (तरीही का टाकाव्यात इथे, हाही एक प्रश्न आहेच)

Biggrin

साजिरा साहेब, तुम्हाला मराठी भाषा पुन्हा शिकण्याची गरज आहे.

तुमच्या कवितांचा दर्जा (खरे तर पोस्टचा देखील) तुम्ही कोणत्या टोळीचे सदस्य आहात त्यावरही अवलम्बून असतो.... >>>>>>>
एकदम अनुमोदन.

Pages