अनंताक्षरी - नेहमीची (मराठी)

अनंत काळ चालणारी अंताक्षरी = अनंताक्षरी.

अंताक्षरीचे नियम

१. गाण्याची सुरूवात ही सुरूवातीपासून केली जावी. फक्त सुरूवातीचे आलाप किंवा गुणगुणणे वगळावे. गाण्याचे धृपद पूर्ण लिहीले जावे. धृपद पूर्ण लिहीले नसेल किंवा गाण्याची सुरूवात सुरूवातीपासून केली नसेल तर गाणे बाद धरले जाईल.
२. गाणं त्या पानावरुन वाहून गेल्याशिवाय त्याची पुनरुक्ती करु नये.
३. दोन किंवा अधिक गाणी एकाच वेळी किंवा काही अंतराने पण एकाच अक्षरापासून लिहीली गेली तर सर्वात आधी आलेलं गाणं ग्राह्य धरुन पुढील गाणे लिहावे.
४. अ, आ, ओ सारखे स्वर स्वतंत्रपणे वापरले जावेत अपवाद इ / ई आणि उ / ऊ चा).
५. नवीन गाण्याची सुरूवात आधीच्या गाण्याच्या शेवटच्या अक्षराने किंवा शेवटच्या एक अथवा अधिक शब्दांनीही करता ये_ईल. शेवटचा शब्द घ्यायचा असेल तर तो आहे तसाच घेतला जावा. त्याची रूपे किंवा समानार्थी शब्द घे_ऊ नयेत.
६. फक्त मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ल\' असल्यास, गाणे लिहिणार्‍याने पर्याय द्यावा. पर्याय दिला नसल्यास पुढचे गाणे एकतर, \'ल\' पासूनच लिहावे, किंवा उपांत्य अक्षरापासून लिहावे. पर्याय दिला असला तरी तो घेणे बंधनकारक नाही. हा नियम हिंदी अंताक्षरीसाठी लागू नाही
७. मराठी अंताक्षरीमध्ये शेवटचे अक्षर ठ' असेल तर ते गाणे लिहीणार्‍याने पर्याय द्यावा अन्यथा पुढील गाणे लिहीणार्‍याने उपांत्य अक्षरापासून पुढचे गाणे लिहावे.
८. मराठी अंताक्षरीमध्ये सहज टाळता येण्यासारख्या काही चुका

८.१. 'पाहुनी रघुनंदन सावळा' ही गाण्याची सुरूवात आहे, 'लाजली सीता स्वयंवराला' नव्हे.
८.२. 'निंबोणीच्या झाडामागे' ही सुरूवात बरोबर आहे लिंबोणीच्या झाडामागे' नव्हे.

Submit to kanokani.com

ही कामीनी.....

नाही मझ्या घरट्यात रास हिर्या मणकान्ची
भावमय किमयाही न्ह्रुदयीच्या दौलतीची

नाही मझ्या घरट्यात , कल्प फुलान्चा सम्भार
पारीजात्काचा गन्ध , दरवळे सभोवार

पारीजात्काचा गन्ध , दरवळे सभोवार...>>>...

रंगुनी रंगात सार्‍या, रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा
रंग माझा वेगळा ||

गोर्‍या गोर्‍या गालावरी चढली लाजंची लाली, गो पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी चौघडा बोलतो दारी, गो पोरी नवरी आली
सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी, चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं, रुणझुण पैजणं, सजली नटली नवरी आली.....

..., सजली नटली नवरी आली.....>>>...

आली हासत पहिली रात,
उधळत तारांची बरसात ||

तुम्हावर केली मी मर्जी बहाल
नका सोडुन जाऊ रंगमहाल..

नका सोडुन जाऊ रंगमहाल...>>>...

लाविली थंड ऊटी वाळ्याची
सखिच्या उच-कलशाची ||

(संगित शाकुंतल... शब्द नीट कळत नाहीयत... दुरुस्त करुन घ्या...)

कलशाची >>>>>>

चाफा बोले ना , चाफा चाले ना
चाफा खन्त करे काही केल्या फुले ना

गेले अम्ब्याच्या वनी म्हटले मैनसवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवुन रे

रंगात रंग तो शामरंग पाहण्या नजर भिरभिरते
एकुन तान विसरुन भान ती वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साद एकुनी होई
राधा ही बावरी हरीची राधाही बावरी

राधाही बावरी >>>>>>>

राहीले ओठातल्या ओठात शब्द माझे
भेट होती आपुली ति खरी , का स्वप्न माझे

भेट होती आपुली ति खरी , का स्वप्न माझे...>>>...

थोडासा बदल करुनः -

माझी न मी राहीले
तुजला नाथा सर्व वाहीले...

लबाड लांडगं रंग करतय्, ढ्वांग करतय
लगिन करायच स्वांग करतय बघा ढ्वांग करतय
लांडगा न्हवरा नि शेळी न्हवरी,
डोईवर बाशिंग ठरं ना आनि न्हवरीला लुगडं पुरं ना
सासूचा शालू, सासर्‍याचा पटका ठिगाळ जोडून लांब करतय
लबाड लांडगं रंग करतय्, ढ्वांग करतय

लबाड लांडगं रंग करतय्, ढ्वांग करतय...>>>...

येथोनी आनंदू रे आनंदू
कृपा-सागर तो गोविंदू रे
आनंदू रे आनंदू ||

दिव्यत्वाची जिथे प्रचिती
तेथे कर माझे जुळती

तेथे कर माझे जुळती...>>>...

तिन्ही सांजा, सखे निराळ्या
देई वचन तुला |
आज पासुण जीवे अधीक
तु माझ्या हृदयाला ||

तु माझ्या हृदयाला >>>>>>.

लाखात लाभले भाग्य तुला ग बाई
वीटे वरच्या विठ्ठला ची झालिस रखुमाई

मेघाहुनी जो हसरा शामल
चन्द्रा हुनी जो अधिकही शीतल
नाम जयाचे मुखात येता
रुप दिसे हो ठाई ठाई

वीटे वरच्या विठ्ठला ची झालिस रखुमाई

सुहास...
वीटे वरच्या विठ्ठला ची झालिस रखुमाई...>>>

पर्याय 'स' घेऊन चालू करतोय...

सर्वस्व तुजला वाहूनी
माझ्या घरी मी पाहूणी |
सांगू कसे सारे तुला?
साहू कसे रे याहूनी? ||...

विवेक ...अरे मस्त झाले तु चालु केलेस ते ...परत अता सुरु करुया ....

साहू कसे रे याहूनी >>>>>>>

नाते जुळले मनाशी मनाचे
फुले गीत ओठी मनाच्यासुराचे

कशी मुर्त केलि खुल्या लोचनानी
तुझ्या अन्तरीची अबोली कहाणी
कसे फुल झाले दिवाण्या कळीचे

नाते जुळले मनाशी मनाचे

चिंब भिजलेले रुप सजलेले
बरसुनी आले रंग प्रीतीचे

प्रीतीचं झुळझुळ पाणी
वार्‍याची मंजूळ गाणी
रोमांच सर्वांगी
गेले मी न्हाऊनी..
प्रीतीचं झुळझूळ पाणी

प्रीतीचं झुळझूळ पाणी...>>>...

पाण्यातले पहाता,
प्रतीबिंब हासणारे...||

प्रतीबिंब हासणारे......( जरा बदलुन ..)

हसायचे नाही तुला, हसु नको
बोलायचे नाही तुला , बोलु नको
मात्र मि तुला आग्रहाने सागतो
बोलके डोळे तुझे झाकु नको

काल रातीला सपान पडल सपनात आलं कुणी न बाई मी घाबरले
आणि गालावरच्या खुणा बघुनी आई विचारी काय घडले
आता बोलु कशी सांगु कशी नाव कुणाच घेऊ कशी

आता बोलु कशी सांगु कशी नाव कुणाच घेऊ कशी...>>>...

काटा रुते कुणाला?, आक्रंदात कुणी...
मज फुल ही रुतावे, हा दैव योग आहे...||

ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा
ही वाट दूर जाते.....

ही वाट दूर जाते.....>>>...

जे वेड मजला लागले
तुज नाही ते लागेल का?
माझ्या मनिची ही व्यथा
कोणी तुला सांगेल का?...||

मी पाहतो स्वप्नी तुला
मी पाहतो गाण्यातुनी |
जे मी मुकेपणी बोलतो,
शब्दांतुनी उमटेल कां?...||

काजल रातीनं ओढुन नेला सये साजन माजा
जीव ये भरुनी भिजते पापनी, कधी रे येशील राजा......

विवेक, शेवटी "जाते" हा शब्द आहे आणि तुम्ही "ज" पासून कसं पुढचं गाणं लिहिलंय?

जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची

ललिता...
'चुक-भुल द्यावि-घ्यावि' .... फिदीफिदी

नमस्कार मायबोलीकरांनो!