मांसाहार जिंदाबाद ...!!
सोने गं सोने, रांधल्या का तुने
बेडूकाच्या खुला
खेकड्याची आमटी
अन गांडूळाच्या शेवया...!!
गोचीडाची खिचडी
टमगिर्याचं भरीतं
डासाचा अर्क घे
घुबडाच्या तर्रीतं
जरासा सुरवंट, थोडेसे ढेकून
घे पुरणात भराया .....!!
गोमाश्याचा लाडू कर
त्याला सरड्याचा रंग दे
ऊंवा-टोळ पिळूनी
सापा-विंचवाचा पाक घे
उंदराची चटणी, पालीची सलाद
घे तोंडास लावाया ....!!
कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जीभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
गरीबाला सूळी, शत्रूला अभय
का करीशी अन्याया?....!!
गंगाधर मुटे
............................................
ही कविता प्रकाशीत करतांना मला खुप मानसिक त्रास झालाच.
आपल्या मनातील दुविधेपोटी कवितेची मुस्कटदाबी करायची नाही असे ठरवून प्रकाशीत केली.
मुख्य मुद्दा असा की पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान/शक्तीमान मनुष्यप्राणी असा का वागतो?
नेमका दुर्बळाच्या/सात्विकाच्या जीवावरच का उठतो?
पुर्वीच्या काळातही शिकार करणारेही नेमके हरिणाच्याच मागे लागायचे. का? तो निरुपद्रवी आणि स्वभावाने गरीब म्हणुनच ना? वाघसिंहावर मर्दुमकी गाजवायची इच्छाशक्ती मानवात नाहीच असा अर्थ घ्यायचा का?
या कवितेत "शाकाहार की मांसाहार" हा मुद्दा नाहीच. मुद्दा आहे मानवी वृत्तीचा.
अर्थात तसा कवितेत व्यक्त झाला की नाही हे महत्वाचे.
..............................................
कोरियात राहते का हो सोनी?
कोरियात राहते का हो सोनी? नशीब, मी कविता जेवण झाल्यावर वाचली! नाहीतर काही खरे नव्हते!!
कोंबडी नी बकरी निरुपद्रवी
कोंबडी नी बकरी
निरुपद्रवी जनावर
तुझ्या जीभेचे चोचले
उठती त्यांच्या जीवावर
अरेरे , कविता आधी वाचून मग जेवायला जायला हवे होते.. एका अंड्याचा जीव वाचला असता..
कोरियात राहते का हो सोनी?..
कोरियात राहते का हो सोनी?..
अरुंधती!!!!
ते चिनी, कोरियन, जपानी परवडले
ते चिनी, कोरियन, जपानी परवडले असे प्राणी आहेत कवितेत.
मुटे तुम्ही चांगल्या कविता
मुटे तुम्ही चांगल्या कविता करत असताना , ह्या कवितेची काहीच गरज नव्हती , पुर्ण वाचुच शकलो नाही .
श्रीजी, ही कविता प्रकाशीत
श्रीजी,
ही कविता प्रकाशीत करतांना मलाही खुप मानसिक त्रास झालाच.
आपल्या मनातील दुविधेपोटी कवितेची मुस्कटदाबी करायची नाही असे ठरवून प्रकाशीत केली.
मुख्य मुद्दा असा की पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान/शक्तीमान मनुष्यप्राणी असा का वागतो?
नेमका दुर्बळाच्या/सात्विकाच्या जीवावरच का उठतो?
पुर्वीच्या काळातही शिकार करणारेही नेमके हरिणाच्याच मागे लागायचे. का? तो निरुपद्रवी आणि स्वभावाने गरीब म्हणुनच ना? वाघसिंहावर मर्दुमकी गाजवायची इच्छाशक्ती मानवात नाहीच असा अर्थ घ्यायचा का?
या कवितेत "शाकाहार की मांसाहार" हा मुद्दा नाहीच. मुद्दा आहे मानवी वृत्तीचा.
अर्थात तसा कवितेत व्यक्त झाला की नाही हे महत्वाचे.
लोकरी मावा राहिलाच की ....
लोकरी मावा राहिलाच की ....
वाघ सिंहांची शिकार पण केलीच
वाघ सिंहांची शिकार पण केलीच की माणसाने.फक्त खायला नसेल, चवीला बरे लागत नसणार..
उंदराची चटणी, पालीची सलाद
उंदराची चटणी, पालीची सलाद >>> जल्ला ऐकायला लै शॉलिड वाटतय !!!!
कोरियन फूड छान चविष्ट असते हो
कोरियन फूड छान चविष्ट असते हो
चायनीज पेक्षा 
कित्ती भयानक आहे ........
कित्ती भयानक आहे ........
मांसाहारी लोकांना शाकाहारी
मांसाहारी लोकांना शाकाहारी बनवण्यासाठी छान युक्ती आहे ही
मुटे मास्तर , एकदा आपल्या
मुटे मास्तर , एकदा आपल्या मळ्यात या .
पाली , झुरळं , उंदरं आपल्यासारख्या गरीब शेतकर्यास्नी परवडायचं न्हाय , त्यापरीस ,मस्त पैकी कोंबडी कापुन कोंबडी जिंदाबाद करु .
चायनीज लोक जे झुरळ किंवा इतर
चायनीज लोक जे झुरळ किंवा इतर गोष्टी खातात त्याबद्दल विचारलं होतं..
तिथे दुर्गम भागात प्रोटीन्स वगैरे मिळण्याची साधनं नाहीत म्हणुन खातात म्हणे...
"मंगोल देश एकुणच काहीही खातात" असं थोडंफार जनरलाइज करुन म्हणता येईल कदाचित.
...पण असं म्हटलं तर आपल्या देशातही शाकाहारी एक्स्ट्रीमिस्ट आहेतच की
..... ते म्हणजे पेटले तर "बाभळीच्या काट्यांची चटणी" देखील करतील....
......किंवा "झेंडुच्या फुलाची भाजी... " भरवसा नाही.
कविता आवडली !!!! मी तसा
कविता आवडली !!!! मी तसा शाकाहारीच ;
पण कधी कधी विचार येतो कि गव्हाचा एक दाणा नि अंडा मध्ये तसा फरक तरी किती ? दोधांमध्ये एक इवलासा जीव लपलेला आहे
एक गव्हाचे झाड नि कोंबडी सुद्धा सारखेच ?
शेवटी हे सगळे निसर्गाचेच नियम
मुटे, शेवटी दुनिया
मुटे, शेवटी दुनिया एक-दुसर्यावर अवलंबुन आहे म्हणुनच निसर्गाचा समतोल राखला जातो. कविता वाचताना कसतरीच वाटल.
मुटेंचा
मुटेंचा "कत्तलखाना".........
इतक्या प्राण्यांची कत्तल फक्त एका कवितेत...
वेगळी कविता! छान!!
वेगळी कविता!
छान!!
स्वामी विवेकानंद्,अमिताभ
स्वामी विवेकानंद्,अमिताभ बच्चन,स्टेफी ग्राफ,लिओ टोलस्टोय,Rabindranath Tagore, महात्मा गांधी, कबीर,मोरारजी देसाई ,शाहिद कपुर,करिना कपुर,केट विन्स्लेट ही आणि असे शेकडो लोक हे शाकाहारीच होते आणि आहेत !
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च
अजापुत्रो बलिं दद्यात दैवो दुर्बलघातकः
घोडा नाही, हत्ती नाही... वाघ तर अजिबात नाही... बळी नेहमी बकर्याचा देतात.. कारण दैवदेखील दुर्बलांचाच घात करतं....
दैवो दुर्बलघातकः<< दैवो नाही.
दैवो दुर्बलघातकः<<
दैवो नाही. ते देवो आहे.
देव: असं पुल्लिंगी एकवचन वाक्यात कुठेही आलं की देवो असं होतं. दैवो असं असणार नाही.
देवदेखील दुर्बलांचाच घात करणारा असा अर्थ आहे.
* * * दोनदा पोस्ट झालं * * *
* * * दोनदा पोस्ट झालं * * *
इथे मिळालं हे सुभाषितः
इथे मिळालं हे सुभाषितः -
(थोडीफार माहितीही आहे म्हणुन लिंक दिली..)
http://mr.upakram.org/node/1456
स्वामी विवेकानंद्,अमिताभ
स्वामी विवेकानंद्,अमिताभ बच्चन,स्टेफी ग्राफ,लिओ टोलस्टोय,Rabindranath Tagore, महात्मा गांधी, कबीर,मोरारजी देसाई ,शाहिद कपुर,करिना कपुर,केट विन्स्लेट ही आणि असे शेकडो लोक हे शाकाहारीच होते आणि आहेत ! >>> पण हे शेकडो लोक सोडले तरी थोडे (?) तरी ग्रेट लोक मान्साहारि असतिल ना !!
आणि मुळात या लोन्काच्या ग्रेट असण्याचा आणी शाकाहारी असण्याचा काय सम्बन्ध ?
आपण शाकाहारी असा , ते चान्गलच आहे , कदाचित ते आरोग्यासाठी जास्ती चान्गल असेलही , पण म्हणून इतराना नाव ठेवू नका एवढिच अपेक्षा !!!!
मुटेजीचा रोख असा नव्हता पण आय_पियेल यान्च्या प्रतिसादानन्तर आता इथे नविन वाद नको म्हणून ही पोस्ट .
स्वामी विवेकानंद >> स्वामी
स्वामी विवेकानंद >> स्वामी विवेकानंद मासे खायचे.. ह्याबाबत तुम्हाला आंतर्जालावर सुद्धा बरीच माहिती मिळेल..
ग्रेट असण्याचा शाकाहारी वा
ग्रेट असण्याचा शाकाहारी वा मांसाहारी असण्याशी काहीच संबंध नाही.
बाकी वाघ-सिंह इत्यादींचे मांस खाण्यालायक किंवा पचण्यालायक नसणार त्यांची लाइफसायकल बघता म्हणून तर ते खाण्यास अयोग्य ठरवले गेले असणार याबद्दल मला तरी काही शंका वाटत नाही.
आणि देव, यज्ञ पण मानवानेच निर्मिलेला तेव्हा त्यातला हवी हा मानवाच्या आवडीचाच असणार यातही काही शंका नाही...
असो..
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं
अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च |
अजापुत्रो बलिं दद्यात् देवो दुर्बलघातक: || ४||
ऋयाम यानी दिलेल्या लिंकमध्येही देवो असेच आहे....
इतके दिवस मी दैवो असेच म्हणत होतो...
चूक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद....
टॉलस्टॉय एकदा कत्तलखाना पाहून
टॉलस्टॉय एकदा कत्तलखाना पाहून आला व मग शाकाहारी बनला असं बहुधा त्याच्या चरित्रातच वाचल्याचं निश्चितपणे आठवतं. अशा तर्हेने शाकाहारी झालेल्याना मी मनापासून मानतो .पण जे मूळातच शाकाहारी आहेत व जे जन्मतःच मांसाहारी आहेत याच्यात नैतिकतेच्या दॄष्टीने फारसा फरक नसावा; कारण ते दोघेही सर्वसाधारणपणे संवयीने किंवा परिस्थितीमुळे तसे असतात, जाणीवपूर्वक नव्हे.
<<मांसाहारी लोकांना शाकाहारी बनवण्यासाठी छान युक्ती आहे ही >> कुणी सांगावं, नवीन रेसिपीज
दिल्याबद्दल मुटेजींचे मनातून आभारही मानतील कांही अस्सल मांसाहारी मंडळी !! [ मी पक्का व फक्त 'मच्छी"हारी आहे !]. मुटेजींच्या मुख्य मुद्द्याशी मात्र मी सहमत आहे.
मला मागे एकदा लो बीपी चा
मला मागे एकदा लो बीपी चा त्रास झाला. अनेक दिवस अनेक पाथ्यांचे औषध घेऊन फायदा झाला नाही तो समुद्र्फळाने झाला. यात व्हीटॅमिन ई असत जे शाकाहारींना फारस मिळत नाही. हे सर्व स्नायुंना बल देत. ह्रदय हा सुध्दा स्नायुच आहे. हा माझा शोध डॉक्टरसाहेबांनी मान्य केला. तेव्हापासुन बारा वर्षांचा उपास सोडुन मी समुद्र्फळ प्रेमी झालो.
शाकाहार करणे हे एखाद्याला
शाकाहार करणे हे एखाद्याला आपोआप 'हाय मॉरल ग्राऊंड'वर कसे नेते हे मला कळत नाही.
रच्याकने,'ज्याला सर्वसाधारणपणे अभक्ष्य म्हणतात ते मी आज खाउन आलो आहे' अशी कबूली विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांनाच दिली होती. अर्थात त्यामुळे ते कमी ग्रेट ठरत नाहीत.
मुख्य मुद्दा असा की पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान/शक्तीमान मनुष्यप्राणी असा का वागतो? नेमका दुर्बळाच्या/सात्विकाच्या जीवावरच का उठतो?>>> ही मांडणी अशास्त्रीय,भावनिक व बालीश आहे.दुर्बळ,सात्विक इ.इ. माणसांनी प्राण्यांना चिकटवलेले गुण आहेत.प्राण्यांचे वागणे असे एकाच प्रकारात बसणारे नसते,त्यांचा पवित्रा परिस्थितीजन्य असतो. माणूस सर्वात बुद्धीमान/शक्तीमान आहे हा देखील आपला भ्रमच आहे.वेळ आली की 'साधा' विषाणूही आपल्यावर मात करतो.
Pages