माझं गाव

माझ्या गावतला एक चौकstamford_redlion_square.jpg


चित्र छान वाटलं. स्मित मिश्र माध्यमांचा रेखीव, नीटनेटका वापर जाणवतोय. पण, त्या कोपर्‍यावरच्या घराची डावीकडची अरुंद भिंत अन् त्यावरची कौलं तेवढी त्रिमितीय प्रक्षेपाकरता दुरुस्त करायला हवीत असं वाटतंय.. कारण त्या डावीकडच्या रस्त्याने बांधलेल्या सर्व वस्तूंवरील आडव्या रेषा प्रक्षेपाला धरून किंचित कलत जातील.
बाकी, गावाचं नाव काय?



गावाचे नाव Stamford , त्यातला हा red lion square!!!
(गुरुची पहिली प्रतीक्रिया पाहुन शिष्या धन्य झाली.स्मित thank you )
डावाकडे घरे actual उंच होत गेलेली आहेत. इकडचा कोपरा कलला, ती माझी चित्राचा फोटो काढण्याची चुक आहे.
फोटो त जरा अस्पस्।ट पण दिसतय.



मस्त जमुन आलय.



लोपा,
बर्‍याच दिवसानी तुझी चित्रकला दिसली. छान आहे, चित्र.
फोटोवरुन न काढता प्रत्यक्ष रेखाटन केले असतेस, तर आणखी छान जमले असते.



लोपा, अतीशय देखणं पेंटिन्ग!
पुढल्यावेळी एकच करशील? कितीही वैताग आला तरी पेंटिन्गचे रंगवतानाच्या स्टेजेसचे पण फोटो टाकशील? बघायला आवडेल आणि शिकायला मिळेल.
-मृण्मयी



लोपा मस्त जमलय ग वॉटर कलर मध्ये. शॅडोज पण मस्त जमल्यात. फ ने सांगितल्याप्रमणे थोडे तिथे perspective मधे गोंधळ झालय बाकी उत्तम.स्मित अजून पहायची आहेत.. लवकर काढ नि गुलमोहरात टाक.स्मित
फ, किती जड जड मराठी शब्द वापरलेयतः)))



रंग. चित्र ही सुंदर. निळ्या गाडीच्या ट्पाच्या भागात आय लेव्हल पकडली तर पर्स्पेक्टीव्ह थोडे चुकलेलं वाटते. तिथे चित्र वन पॉईंट पर्स्पेक्टीवने व्हॅनिशिंग पॉइंट धरला तर तीथे ऑर्थोगोनल लाईन्स मिळाल्या पाहिजेत. एकंदरीत चित्र छान झालेय



मला ती गाडी नाही ग आवडली. गाडीशिवाय चित्रं एकदम झकास!
मला ते मितीतलं काय कळत नाय पण मस्तय तुझं गाव आणि तो चौक स्मित



thank you दिनेशदा, दिव्या,चिनु,नीलु, अजय, म्रुणमयी .. खुप छान वाटले तुमचा प्रतीसाद पाहुन ..
माझ्या डोळ्यसमोर तो रस्ता अस्ल्याने कदाचीत पण पर्स्पेक्टीव मध्ये चुक वाटत नाहिये.



इतकं टुमदार आणि शांत गाव आहे लोपा तुझं? स्मित सुरेख चित्र!



लोपमुद्रा, चित्रकला सुंदर जमली आहे.



बघुन खूप छान वाटलं!!

Perspective वगैरे विचार नंतर आले डोक्यात पण इतके खटकत नाहियेत ते..
अर्थात परिपूर्णतेच्या दृष्टीने त्याचा गुरुंच्या सल्ल्यानुसार विचार कर.. म्हणजे आम्हाला अजून काही छान चित्रे बघता येतील फिदीफिदी\



फची प्रतिक्रीया डोक्यावरुन गेली माझ्या स्मित

मिश्र माध्यम म्हणजे ..... ? वॉटर कलरमधलं आहे ना गं हे चित्र?



पूनम,बी, अभी, मीनु thank you very much..!!!
हो मीनु water colour..!!
मृ पुढल्या वेळी टाकेल ग अर्ध चित्र मग पुर्ण चित्र..
हो पूनम हे गाव सकाळी फक्त बीझी असते बाकि दिवसभर इतकेच शांत..
मला माझे गाव खुप खुप आवडते:)