नमस्कार !
सौ. रेखा सुरेश चित्रे, पूर्वाश्रमीची पद्मा दत्तात्रय प्रधान. वय ७७. दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन १९८५च्या आसपास झाली. अन तेव्हापासून दोन्ही डोळ्यांना + १० नंबर आहे. डोळ्यांची ऑपरेशन्स झाल्या नंतर तिचे वाचन हळूहळू कमी होत गेले. वाचायला त्रास होतो म्हणून तिने मग आपला एक जुना छंद पुन्हा नव्याने सुरू केला.
तसे तर आम्ही मुली ( ४ बहिणी ) लहान असताना आमचे सर्व कपडे तीच शिवत असे. अगदी त्यावेळच्या फॅशनप्रमाणे दि ट्रेन या चित्रपटातील फ्रॉक्स पासून शरारा पर्यंत, अन माझ्या बहिणीच्या कथ्थक आणि भरतनाट्यमच्या ड्रेस पर्यंत सर्व ड्रेस ती स्वतः शिवत होतीच.
अन कुटुंबातील जवळ्जवळ १०० - १२५ लोकांचे स्वेटर्स तिने हाताने विणले होतेच. बाहेरच्या ऑर्डर्स घेउन मशीनवरही अनेक स्वेटर्स तिने विणले.
भरतकामाचे अनेक प्रकार, अगदी साड्याही तिने भरल्या. टॅटिंगच्या लेसेस, अगदी साड्यांच्याही तिने तयार केल्या.
पण आता डोळ्याच्या ऑपरेशन नंतर तिने क्रोशाने दोर्याची बेडशीटस विणायचा नवा उद्योग सुरू केला. खरे तर हे अगदी बारिक काम. पण तिची चिकाटी इतकी की आता तर आम्ही म्हणतो, आई झोपेतही हे काम करू शकेल.
१९९० पासून आजपर्यंत तिने ३२ डबलबेडची बेडशीट्स विणली आहेत, २५ सिंगल बेडशीट्स विणली, १० टेबलक्लॉथ विणले, २ फूटांचे गोल रुमालांची तर गणतीच नाही. कुशन कव्हर्स आणि सोफा बॅग्सची ही गणतीच नाही. मुख्य म्हणजे या सर्व कलाकृतींची डिझाईन्स तिची तीच बसवते. त्याचे करावे लागणारे प्रचंड हिशोब तिच्या मनात पक्के असतात.
याच विणकामाच्या नमुन्यांचे काही फोटो इथे टाकते आहे.
आणि हे सर्व चालू असताना टि. व्ही वरच्या सर्व मराठी सिरियल्स पाहणे अन जोडीने सुडोकू सोडवणे चालू असते. अन ही सुडोकुही साधी नाहीत. नेहमीची सुडोकु १ ते ९ आकड्यांची असतात; ती १ ते १२, १ ते १६, १ ते २५ अशी सुडोकू भराभर सोडवत असते. स्वेटर्स करणे हे चालूच असते.
तिच्यावर एक सी. डी. ही मी तयार केली आहे, मराठी चॅनल्सकडे ती पाठवली होती, परंतु ओळखी नसल्याने त्याचा पाठपुरावा मला घेता आला नाही. येथे कोणाला तिचे काम आवडले तर कृपया मला मदत कराल ? केवळ तिचे हे प्रचंड काम लोकांपुढे यावे हाच दृष्टिकोन आहे. त्यात व्यावसाईक हितसंबंध नाहीत, ना तिचे, ना माझे.
असो.
आता तिच्या कामाचे काही फोटो-
हा गणपती विणलेला दाराचा पडदा
ही काही डबलबेडशीट्स
हा ५ फुटी टेबलासाठीचा गोल रुमाल
अन हा ६ बाय ४ फुटी टेबलासाठीचा टेबलक्लॉथ
माझ्या मुलाला गाड्या अन वाहनांचे फार वेड. म्हणून त्याच्या या आजीने त्याच्या खोलीच्या खिडकीला हा पडदा विणला
अन हा दाराचा पडदा. कमानी खाली नाचणारे मोर
अन ही माझी आई
तळटीप : तिचा ब्लॉगही बघा जमले तर : www.rekhachitre.blogspot.com तिथे नवीन कलाकृती बघायला मिळतील.
याचे मोठे फोटो फ्लिकरवरून इथे टाकते आहे
तळटीप : तिचा ब्लॉगही बघा जमले तर : www.rekhachitre.blogspot.com तिथे नवीन कलाकृती बघायला मिळतील.
तिची ही कला भारतात पुणे,
तिची ही कला भारतात पुणे, मुंबई, कोल्हापूर, बंगलोर इथे तर पोहोचली आहेच पण बाहेर अमेरिका, लंडन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया यादेशांमध्येही ती पोहोचली आहे.
ग्रेट आहे तुझी आई......
ग्रेट आहे तुझी आई......
खुपच सुंदर. खरचं ग्रेट आहे
खुपच सुंदर. खरचं ग्रेट आहे तुझी आई.
सुरेख आहे सगळंच विणकाम!
सुरेख आहे सगळंच विणकाम!
एकदम सही... तो गणपती विणलेला
एकदम सही... तो गणपती विणलेला पडदा तर एक नंबर.
सुंदर!!! क्रोशाचे बारीक
सुंदर!!! क्रोशाचे बारीक विणकाम बघायला छान वाटते पण फारच किचकट काम.
आपल्याला सुईत दोरादेखील ओवता येत नसल्याने अशी किचकट कामे करणार्याना शतशः प्रणाम!!
एकदम सही...
एकदम सही...
अगदी सुरेख. किती वेळ लागत
अगदी सुरेख. किती वेळ लागत असेल हे सगळे करायला! मोर तर अप्रतिम!
वा, अतिशय लक्षवेधी आणि आकर्षक
वा, अतिशय लक्षवेधी आणि आकर्षक ....
अरे मस्त.. ते टेबलक्लॉथ तर
अरे मस्त.. ते टेबलक्लॉथ तर फारच भारी.. आणि मोतीबिंदूची ८५च्या आसपास (जेव्हा आजच्यासारखी बिनटाक्याची वगैरे शस्त्रक्रिया नव्हती) होउन सुद्धा इतके बारीक काम आणि ह्या वयात.. खरेच कौतुकास्पद आहे..
केवळ अप्रतिम, खरोखर
केवळ अप्रतिम, खरोखर कौतुकास्पद त्या अजुन्ही हे करतात म्हण्जे ,
खुप काही शिकण्या सारख , त्यांना आमच्या कडून नमस्कार सांगा नक्की
जबरदस्त!
जबरदस्त!
बापरे. किती सुरेख
बापरे. किती सुरेख कलाकुसर.
आणि आईची कला पोचवण्यामागची तुमची तळमळ खूप आवडली.
तुम्हा दोघींनाही शुभेच्छा.
अतिशय चिकाटीचं, कलाकुसरीचं,
अतिशय चिकाटीचं, कलाकुसरीचं, देखणं काम....!!! कमाल आहे तुझी आई!
ग्रेट!! ग्रेट!! विणकाम आणि
ग्रेट!! ग्रेट!! विणकाम आणि त्याबरोबर स्वतःच तयार केलेलं डिझाइन केवळ अप्रतिम !! तुझ्या आईला साष्टांग नमस्कार माझा. किती वेळा बघुन ही मन भरत नाहिये.
तुझ्या सीडीत तु अर्थातच
तुझ्या सीडीत तु अर्थातच आईबद्दल माहिती दिली असशिल, पण तिने निर्माण केलेल्या डिजाइन्सही टिकणे आवश्यक आहे.. त्यासाठी कोणीतरी आईबरोबर बसुन डिजाईन कसे निर्माण झाले ते लिहुन घेणे गरजेचे आहे. आता हे सगळे डॉकुमेंट कोण करणार?
अतिशय सुंदर कारागिरी. खरे तर
अतिशय सुंदर कारागिरी.
खरे तर हि कला, इतर लोकाना, त्यानी शिकवायला हवी !!!
वा! ग्रेट.
वा! ग्रेट.
धन्यवाद सगळ्यांना. नक्की
धन्यवाद सगळ्यांना. नक्की सर्वांचे नमस्कार पोहचवते त्यांना


दिनेशदा, अहो तिच्याबद्द्ल कितीतरी अजून लिहिता येईल. उदा. तुम्ही म्हणता तसे आजपर्यंत ५०-६० विद्यार्थीनी केवळ विणकामाच्याच ( स्वेटर विणणे ) झाल्या असतील. हे क्रोशाचे विणकाम मात्र बर्यापैकी किचकट असल्याने ६-७ जणीच शिकून गेल्या
अन हो आम्ही मुलींनी ही शिकून घेतलय बर का, थोड थोडं
सुरेख आहे कलाकारी. टेबल्क्लॉथ
सुरेख आहे कलाकारी.
टेबल्क्लॉथ जबरीच जमलाय
ग्रेट! खूप मोठमोठे पीस केलेत
ग्रेट! खूप मोठमोठे पीस केलेत याची जास्त कमाल वाटते केव्हडा पेशन्स लागत असणार त्याला.
एकदम भारी, कसली चिकाटी लागत
एकदम भारी, कसली चिकाटी लागत असेल... wow !
वॉव. एकदम मस्तच. पडदे तर एकदम
वॉव. एकदम मस्तच. पडदे तर एकदम अफलातुन.
तुमची आई तर ग्रेटच आहेत.
तुमची आई तर ग्रेटच आहेत. एवढ्या वयातही अशी सुबकता मानायला पहिजे.
५ फुटी टेबलासाठीचा गोल रुमाल तर फारच छान आहे.
<<खरे तर हि कला, इतर लोकाना, त्यानी शिकवायला हवी !!!>> बरोबर आहे दिनेशदा तुमचे .
अतिशय सुरेख ! ग्रेट आहे तुझी
अतिशय सुरेख ! ग्रेट आहे तुझी आई .तिला आमच्या खूप खूप शुभेच्छा!
सही. एकदम जबरदस्त. खूपच
सही. एकदम जबरदस्त. खूपच कष्टाचे काम आहे हे. मोठे मोठे टेबलक्लॉथ तर एकदम मस्त आहेत. खूप आवडले.
इटलीमध्ये एक अगदी छोटे गाव आहे Burano नावाचे त्या संपूर्ण गावाचा एकच उद्योग म्हणजे हे असे असे क्रोशाच्या (क्रोशासारखाच अजून एक टाका पण होता त्याच्या) लेस, पडदे, टेबलक्लॉथ, टॉप्स, स्कर्ट्स, स्कार्फ इ.इ. करून विकणे. प्रत्येक घराची समोरची खोली म्हणजे दुकान आहे आणि सगळ्या बायका सतत विणकाम करत बसलेल्या असतात दुकानात. तिथे जेव्हा मी या अश्या विणलेल्या वस्तूंच्या किमती बघितल्या तेव्हा माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. अर्थात त्याला कष्टही तेवढेच असतात त्यामुळे तेवढी किंमत देऊनच वस्तू घ्यायला हवी.
व्वाव ! किती सुंदर हस्तकला !
व्वाव ! किती सुंदर हस्तकला ! खरोखर तुमच्या मातोश्री ग्रेट आहेत!
जबरदस्त आहे हे! तुमच्या आईंना
जबरदस्त आहे हे! तुमच्या आईंना शुभेच्छा.
ग्रेट !! _/|\_ कमाल आहे तुझी
ग्रेट !!
_/|\_ कमाल आहे तुझी आई.
अप्रतीम आहे एकदम.
कसल सुरेख आहे हे. ग्रेट!!
कसल सुरेख आहे हे. ग्रेट!!
Pages