अधूरी कहाणी...

Submitted by suryakiran on 31 March, 2010 - 11:13

आहेस तू अजूनही,
मखमली स्मरणात माझ्या,
क्षणाक्षणाला होतात सये,
तुझ्या आठवणीच्या कळ्या ताज्या..

येतो शहारा सांजवेळी,
अन स्पर्श तुझा आठवतो,
रोज रोज सये मी,
मनास आठवणीच्या देशात पाठवतो..

कधी कधी बावरते मन,
अन हूरहूर जीवा लागते,
तुझ्या वाचून ग सये,
पापण्यातून मग सल ओघळते..

तू असेल दुर त्या देशी,
फुलांच्या गर्दितली गं राणी,
पण तुझ्यावाचून ग सये,
अधूरीचं राहली ना माझी कहाणी..

-- सुर्यकिरण...

गुलमोहर: