Submitted by suryakiran on 31 March, 2010 - 10:39
ओढ अनाम श्वासांची,
अन क्षणाचा हा दुरावा,
सांग का आता आपण,
सहन करत रहावा
तु माझ्यासाठी अन मी
फक्त तुझ्याचसाठी
असे असतानाही
का करतो चोरून भेटी गाठी
का आता मिठिसाठी,
हवाय झाडामागचा अडोसा,
हातात हात धरण्यासाठी
कशाला हवाय कोणाचा भरोसा..
विश्वास आता कायम आहे
आपल्या दोघांच्याही श्वासात,
मग कशाला जगायचे आपण
क्षणात विरणार्या गुलाबी आभासात..
आता हवीये तू मला
माझ्या या सहजिवनात,
मळवट कपाळी भरूनी,
जोडवी घाल तुझ्या पायात
धागा आयुष्याचा बांधीन,
मी तुझ्या गोड गुलाबी गळ्यात,
अन होईल मी एकरूप तुझ्याशी,
मधूचंद्र चांदण्याच्या खळ्यात..
-- सुर्यकिरण
गुलमोहर:
शेअर करा
मळवट कपाळी भरूनी >> अरे तुला
मळवट कपाळी भरूनी
>> अरे तुला बायको पाहिजे का अंगात देवी घेऊन घुमनारी भगतीन ? बाकी ते जोडव्यांचं बरुबर बोल्लास. जोडव्यांची अट पाहिजेच पाहिजे. त्याशिवाय चांदण्याच्या खळ्यातला म्धुचंद्र शक्य नथी.
अहो , ती एक जूनी प्रथा आहे
अहो , ती एक जूनी प्रथा आहे आडवं कुंकू लावण्याची त्याला मळवट म्हणतात.. बाकी धन्यावाद.. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.. पण काही दिवसांपुर्वीच सरकारंन या लग्नसंस्काराला टांग मारलीये.. तेव्हा त्या टांगेला काय करायच?
आडव्या कुंकवाला चिरी म्हणतात.
आडव्या कुंकवाला चिरी म्हणतात. मळवट म्हणजे कपाळभर कुंकू फासणे.
बाकी सरकारनं लग्नसंस्काराला टांग मारलेली नाही. लग्न न करणं हे अजिबात कंपलसरी केलेलं नाही. लग्न करणे हे कंपलसरी नाही कायद्याप्रमाणे एवढंच केवळ स्पष्ट केलंय. घटना लिहिली गेली तेव्हापासून कायद्यात हे होतंच.
असो. कविता बकवास...
फोटो तुम्ही काढलेला आहे का ?
फोटो तुम्ही काढलेला आहे का ? नसला तर तुमच्याकडे कॉपीराईट आहे का ? तुम्ही कॉपीराईट नसताना तो फोटो इथे डकवला तर मायबोलीला कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागेल .
फोटो बघुन तर ते दोघं लग्न
फोटो बघुन तर ते दोघं लग्न करुन सहजीवनाच्या तयारीने चालले वाटतयं , मग शिर्षक असं कसं " माझ्याशी लग्न करशील ? " आक्षेप !आक्षेप !तीव्र आक्षेप!!
बाकी कविता लय भारी
मेधा ,चुक भूल माफ असावी....
मेधा ,चुक भूल माफ असावी.... धन्यवाद कवितेला प्रतिसाद दिल्याबद्दल.
मॅरेज प्रपोझल म्हणून ठीक
मॅरेज प्रपोझल म्हणून ठीक आहे.
'तु' माझ्यासाठी अन मी
का आता मि'ठि'साठी,
आता 'हवीये' तू मला
माझ्या या सह'जि'वनात,
अन होई'ल' मी एकरूप तुझ्याशी,
म'धू'चंद्र चांदण्याच्या खळ्यात..
या चुका शुद्धलेखनाच्या की टायपिंगच्या?
लग्नाआधीच सहजीवन?