बाहेरचे खाणेपिणे आणि त्यातून विषबाधा!!!!

Submitted by हर्ट on 26 March, 2010 - 13:13

हल्ली see-through kitchen ही एक नवीन पद्धत निर्माण झाली आहे. पण फारचं कमी अशा restaurant/shops मधे ही पद्धत पहायला मिळते. यामागे उद्देश हा की तिथे तयार होणारे पदार्थ हे मुलभूत स्वच्छता पाळतात. मागिल शुक्रवारी माझ्या एका कलीगचा सख्खा भाऊ अन्नातून विषबाधा झाल्यामुळे दगावला. पुण्यात कुठेतरी त्यानी भेळ खाल्ली आणि घरी येऊन पोट जे दुखायला लागले, उलट्या व्हायल्या लागल्यात की काही तासातचं तो गेला. ती बातमी ऐकून मला जरा काळजी वाटते आहे. कारण हल्ली बरेच जण बाहेरच्या चटकमटक पदार्थाकडे पाहून ते चाखून पाहतात आणि त्याची खूप जाहिरात पण करतात. junk food खाणे, चॅट पदार्थावरचं जगणे यांचे प्रमाण वाढते आहे. बाहेरचे पदार्थ खाताना तुम्ही कितीपत ते पदार्थ पाहून खाता? काय हमी की ते आतून चांगले असतील? अशा आणि विषबाधेशी निगडीत मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोजचीच गोष्ट असेल तर बाहेर खाणं पोटाला झेपेलसं नाही, (नीधपची गोष्ट वेगळी आहे, हे आहे लक्षात) तब्येतीला ही वाईटच. पण क्वचित कधी तरी चेंज म्हणून हवं असेल तर काहीच हरकत नाही.इथून भारतात गेल्यावर गाडीवरची पाणीपुरी खुणावतच असते. तिला नाही म्हणून कसं चालणार? तेव्हा रचनाशी सहमत.

नीरजा,
मल्टि ग्रेन सिरिअल्स, सिरिअल बार्स, प्रोटिन बार्स ठेवायचे बरोबर, पोट भरतं आणि सारखी खा खा होत नाही.
दूध सिरिअल्स नी तर जेवणाचं समाधान होतं.

इथे मिळणारे सिरीअल बार्स खाऊन बघितले होते मी एकदा. अति साखर. आणि प्रिझर्वेटिवची चव.. वाईट होते.
मी जनरली सफरचंद, संत्रं असं काही ठेवते. मधे काही दिवस नाचणीची, बिना मैद्याची बिस्किटं मिळत होती ती ठेवली होती. पण ती मिळणं बंद झालं.. Sad
शक्य तेव्हा बाहेरच पटकन गाडीवर २ वेलची केळी किंवा तत्सम काहीतरी घेऊन खाते. पण प्रत्येक भुकेला फळ चालतंच असं नाही.

प्रवासात मी मूग आणि कडधान्य एकत्र करून पिशवी बरोबर ठेवलीये. रात्री हॉटेलच्या रूममधे ते भिजत घालायचे सकाळी नाश्त्याला तेच आणि सिंधुदुर्गात तरी कुठेही चहाच्या दुकानात सांगितल्यावर १५ मिन मधे एक अंड उकडून मिळतं.

गोव्यात असताना म्हापसा बाजारातून भरपूर फळं बरोबर घेऊन ठेवते.

मधे सुकामेवा ठेवला होता बरोबर पण बहुतेक बदाम आणि काजू खूप झाले त्यामुळे तोंड आतून सोलवटलं. आता फक्त मनुका आणि सुके अंजीर ठेवणारे.

सोलापूरमधे एका दुकानात प्रवासासाठी ज्वारीच्या कडक भाकर्‍या करून मिळतात त्या ओल नाही लागली तर १०-१५ दिवस टिकतात. त्याच्याबरोबर ती शेंगदाण्याची चटणी किंवा आयत्यावेळेला जे मिळेल ते. तश्या इथे कोणी करून देतंय का बघायचंय. बिस्किटांना उत्तम पर्याय आणि लागलंच तर नाचणीचं पिठ पण मिसळता येईल. तेवढाच थंडावा मिळेल आणि खुसखुशीतपणाही जास्त.

>>>>> मग त्यापेक्षा आपणच ते सत्कृत्य केलेले काय वाईट असं म्हणून मी सरळ ते झुरळ माझ्या हाताने बाहेर काढून ठेवलं आणि अजून झुरळ तर नाही ना असं बघून बाकी पोहे खाऊन टाकले.<<<< Lol
द्याट्स दि स्पिरीट! हे अस माझ्या बाबतीतही कैक वेळेस झालय! Happy कुणाला कायतरी पडलय अस सान्गायचा देखिल कण्टाळा येतो आताशा Proud
बायदिवे, असला आहार पचवायला लिक्विड "स्पिरीट" हा देखिल उत्कृष्ट उपाय आहे बर! Wink
[मला तो विनोद आठवतोय... गावकर्‍यान्समोर प्रात्यक्षिक... दारुत किडे वगैरे टाकणे अन ते मरणे,... नि:ष्कर्ष विचारणे.... गावकर्‍यान्नी एकमुखाने सान्गणे.... म्हणून तर आम्ही पितो, पोटातील एकजात जीवजन्तू किडेमुन्गी सगळे मरतात Lol ]

टोणग्या, तो किस्सा मी देखिल ऐकलाय रुना लैला चा Happy (खरच गुणी अन देखणी गायिका, [पाकिस्तानी अस्ली म्हणून काय झाले Wink ]

द्याट्स दि स्पिरीट! <<
नाटकवाली आहे मी. दौर्‍याची जेवणं पचवलीयेत.
पण आता ते अति झाल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्याच्या ऐवजी कमी होईल की काय अशी शक्यता वाटू लागलीये.

एज फ्याक्टर विचारात घ्यावाच लागतो ग कधीनाकधी तरी!
पण त्यावरही ते काय अस्त ना आयुर्वेदिक च्यवनप्राश वगैरे, ते का नाही ट्राय करत डॉक्टरच्या सल्ल्याने? एक छोटीशी बाटलि ठेवायची बरोबर, कुठुनका होईना, डायजेस्ट सिस्टीम परफेक्ट चालली की झाल Happy
आमच्यात पण दौरे अस्तात... भिक्षुकीचे! Proud
पण त्या दौर्‍यात जेवायलाच काय? बाहेरचे काहीही खायला परवानगी नस्ते! मिळाला तर चहा, दूध म्हणजे चैन! पहाटेपासून किती तास सलग उपाशी रहाव लागेल सान्गता येत नाही! अर्थात यामुळे बाकी कसलीच भिती नस्ते, पण भुकेला आम्ही काय करतो तर विड्याची पाने नुस्तीच तोन्डात चघळत ठेवतो! भूक बर्‍यापैकी शमते!

नीरजा तुझा अनुभव Sad

आम्ही बॅचलर असताना रुमपार्टनरच्या आमटीच्या वाटीत झुरळ आलेल.
बिचार्‍याने आम्हाला काय वाटेल म्हणून ते बाजुला काढुन ती आमटी सोडुन बाकी जेवण केल होत.
नंतर काउंटरवर पैसे देताना हॉटेल मालकाशी वाद घातल्यावर कळाल होत.
यक्क!!!!
आता आठवल तरी उलटी आल्याच फीलिंग येतय.

एज फ्याक्टर विचारात घ्यावाच लागतो ग कधीनाकधी तरी!>>लिंब्या तुला एव्हढे एज झाले तरी कसे बोलावे कळत नाही अगदी बघ Lol

बी, आता तुम्ही अशी उपाशी राहायची सवय करायची नाही. उलट बलवर्धक चौरस चांगले अन्न खावे. आता तुम्ही ग्रुहस्थाश्रमात प्रवेश करणार. अतिशय चॅलेंजिन्ग फेज असते. घरची, मुलांची जबाबदारी येणार. आपण मजबूत पाहिजे. पाण्यावर राहिले की बॉडी फक्त पाणीच लूज करते व तो पट्कन वेट लॉस दिसतो. रागवू नका फुकट्चा सल्ला दिला म्हणून. Happy

नी: ब्रिटानिया न्युट्रीचॉइस बिस्किट चांगला पर्याय आहे. तीन मोठी बिस्किटे एका प्याक मध्ये. एका वेळी.
कारण केळी/ आंबा/चिकू/ द्राक्षे म्हण्जे शुगर शुगर अँड शुगर. स्प्राउट्स सलाड व ताक बरे त्यापेक्षा.

तीन मोठी बिस्किटे एका प्याक मध्ये. एका वेळी.<<
बघितलं पाहिजे...
>>कारण केळी/ आंबा/चिकू/ द्राक्षे म्हण्जे शुगर शुगर अँड शुगर.<<
नैसर्गिक शुगर गं. वणवण करत फिरताना ती गरजेची असते.

>>स्प्राउट्स सलाड व ताक बरे त्यापेक्षा.<<
सलाड रोजचे रोज मॅनेज करणे हे शक्य नसते प्रवासात आणि इतकी पायी वणवण करताना त्याने भूकही भागत नाही. उन्हात ताक म्हणजे पुढच्या १० मिनिटात ओकायची निश्चिंती... Happy

aapaN shakyato baaher jevayala jato kaahi special asate tyaadivashee. aani asa sagala khato

Pages