फोटोशॉपमधे काढलेली काही चित्रे

Submitted by अवल on 26 March, 2010 - 02:56

ही माझी आजी सौ. गुलाब प्रधान, आईची आई. माझी आई लहान असताना ती गेली. आई तिला खुप अ‍ॅटॅच्ड होती. तिचा फोटो नव्हता. फक्त चेहर्‍याचे एक स्केच होते. आईने केलेले वर्णन आणि ते स्केच यावरून हे चित्र काढ्ले अन आईच्या वाढदिवसाला तिला प्रेझेंट दिले. ते हे चित्र

GULAB1 copy.jpg

हे एक लँडस्केप

Landscape.jpg

अन हा एक काल्पनिक चेहरा
hair9.jpg

गुलमोहर: 

तो काल्पनिक चेहेरा डाव्या डोळ्या मुळे काहिसा optical illusion सारखा दिसतोय का?

लँडस्केप मस्तच आणि आजी पण!

सभा, याला मॅट पेंटिंग म्हणतात, म्हणजे दोन फोटो एकत्र करणे. इथे मी डिजिटल पेंटिंगचा प्रयत्न केला आहे, म्हणजे फोटोशॉपमधे स्वतः चित्र काढणे. तुमचाही प्रयत्न छान आहे. याला अजून छान इफेक्ट येण्यासाठी, येथे मुलीचा फोटो मुळच्या छायाचित्रापासून वेगळा करताना सॉफ्ट ब्रश वापरावा.म्हणजे दोन्ही चित्रे छन मर्ज होतील.
मॅट पेंटिंगचा माझा एक प्रयत्न हा पहा
car in waterfall copy.jpg

आरती,
साष्टांग दंडवत... लँडस्केप निव्वळ अप्रतिम..त्यातील गूढ, तरीही शांत्,तरल रंगसंगती..अगदी स्वप्नवत आहे.. जियो
-मानस६

मानस नाही रे बाबा. worth 1000.com ही साईट पहा म्हणजे कळेल माझी पायरी कोठे ते Happy
धन्यवाद मानस आणि सिंडरेला. बायद वे सिंडरेला तुझा एक बुट माझ्याकडे आहे बरं का. ( माझा मोबाईल ठेवायचा स्टँड Wink फोटो टाकेन एकदा)

आरती जी ,मस्त फोटो आहेत ..
मला प्लीज जरा कधीतरी सांगा हे कस काढायचं ? काय काय लागेल यासाठी ?