चुना चुना...

Submitted by ऋयाम on 17 March, 2010 - 08:57

..... पुन्हा पुन्हा ! http://maayboli.com/node/14563

ताई, माफ कराल अशी आशा आहे Happy विडंबनाचा एक प्रयत्न करतो आहे... सां. घ्या.

------------------------------------------------------------------------------------

विसरणे जमेलना, होई दिल सुना सुना
प्रेम आपुलेच ते, आठवे पुन्हा पुन्हा

सौख्यमय अतिच ती, प्रथम भेट आपुली
बसमधोनी येई मी, तुझ्याकडे तुझी लुना

लिफ्ट ज्या दिशी गं तु, प्रथम वार मज दिली,
जाहलो गं त्या दिनी, मी तुझ्यावरी फना

बाप पण तुझा असा, आडवाच येतसे,
चुकवले किती जरी, पकडतो पुन्हा पुन्हा...

फार पण हुशार गं, बाप तो तुझाच ना,
चालवी स्वतः नवी, पोरीला जुनी लुना...

आई-भाऊ पटविले, बाप तव पटेल ना
जरी बरा मी वागलो, कोकले पुन्हा पुन्हा...

तुझ्या शिवाय राहणे, असह्य एक कल्पना.
जाहली परि जी सत्य, होती एक वल्गना...

भेटताचि कार वाला, विसरली ऋयाम ना?
विडं बनात रंगतो, तुझ्याबगैर मी सुना...

परि न विसरणे जमे, आठवे पुन्हा पुन्हा
कार वाल्या च्यापरि, लाविलास जो चुना..

विसरणे जमेल ना, आठवे पुन्हा पुन्हा
पुन्हा पुन्हा चुना चुना, पुन्हा पुन्हा चुना चुना...

=== पिंच ऑफ सॉल्ट === Happy

गुलमोहर: 

LOL

क्या बात है रे.........मस्त,मस्त Happy

मी <<बसमधोनी येई मी, तुझ्याकडे जुनी लुना>> अस वचलं.. का कुणास ठाउक :-|