मोल जगण्याचं

Submitted by भाऊ नमसकर on 13 March, 2010 - 20:39

जगण्यावरतीच ओढून कवच मरणाचं
रणरणत्या त्या राखेच्या वाळवंटात
निपचीत पडून राहिलेली जीवसॄष्टी सारी
थरारून उठते, न्हाते,फुलते अन बहरते
साधून निमित्त चुकल्या-माकल्या एखाद्या सरीचं
आणि, हंसत मोजते मोल मरणप्राय यातनांच
वर्षाकांठीं केवळ कांही क्षण खरंखुरं जगण्याचं

अन रखरखत्या अगदीं त्याच रेजिस्तानात
रसरसलेल्या अविरत जगण्याचं वरदान लाभलेला
अभागी स्वतःला समजणारा एक जीव केविलवाणा
भटकतोय अनवाणी, आक्रंदून मरणच कवटाळायला
जगणंच ठरवून मातीमोल, कुठल्याशा म्हणे लैलाविना !

गुलमोहर: 

निपचीत पडून राहिलेली जीवसॄष्टी सारी
थरारून उठते, न्हाते,फुलते अन बहरते
साधून निमित्त चुकल्या-माकल्या एखाद्या सरीचं

छान.

दुसर्‍या कडव्यातील कलाटणी छान आहे.
'रसरसलेल्या अविरत जगण्याचं वरदान लाभलेला' - मजनूच्या संदर्भात याचा अर्थ कळला नाही.
अन रखरखत्या अगदीं त्याच 'रेजिस्तानात'- हे रेगिस्तानात हवंय का?

मयेकरानुं,वाळवंटातील जीवसॄष्टीचं जगणं सुप्तावस्थेमुळे [dormant state] खूपच खंडीत असतं त्या संदर्भात मजनूच जगणं अविरत होतं व तो तरूण असल्याने रसरसलेलं होतं. काय चुकलां तर सांगा.
सर्वांस धन्यवाद.