उकाळ्याची (चहाचा एक प्रकार) किंमत किती? ६१२ रू!!!

Submitted by आयडू on 26 February, 2010 - 10:13

अट्टल चहा बाजांना उकाळा हा प्रकार माहित असेल. Proud चहाच्या स्टॉलवर चहा ( च पाणी!! ;)) उकळवून कडक केलेला चहा म्हणजे उकाळा. तर अश्या ह्या उकाळ्याची किंमत किती असावी साधारण इराणी हॉटेलात ६ रू स्टॉलवर ४ रू. हॉटेलात १०/१५ रू (उकाळा नसतो! इथं बरंका) मोठ्या पंचतारांकित हॉटेलात १००/२०० च्या आसपास असावी. (मला अनुभव नाही!)

पण जर एके दिवशी स्टॉलवरचा ६ रू.चा उकाळा जर तुम्हाला कुणी ६१२ रू. ना पडला तर???

तुम्ही प्याल का? नाही ना? पण आम्ही प्यायला. Proud त्याच झालं असं अगदी परवा परवाची गोष्ट आहे ही...

चहा प्यायला म्हणून आम्ही दोघं बाहेर पडलो.. कधी नव्हे ती गाडी काढली शनवार (शनिवार ?) होता मग ठरवलं की चहा पिऊन बाहेर जेवायला जाऊ. मित्राने गाडी सुस्साट काढली सिग्नल यलो होत होता तेवढ्यात सटकू असा विचार... गाडी उजवीकडे वळवली अन् सिग्नल लाल!! भर चौकात आमची गाडी मधोमध उभी फार स्पीड नव्हता.. झालं!! मामा आले.

मामा: गाडी साईडला लावा अन् बाहेर या.

मी::मामा जाऊ द्या ना हो प्लीज जरा घाईत आहे...

मामा: जा की पण जरा लायसन दाखवा, पेपर, पीयूसी बघू.

मित्र : गाडी साईडला लावत अन् मी लायसन दाखवत बोललो साहेब जाऊद्या ना हो प्लीज..

मामा: हं पेपर द्या

मी: दहा मिनिटं पेपर शोधत होतो गाडीत... (बरोबर घेतलेच नव्हते!)

मामा: नाहीयेत का? बरं पीयूसी?

मी: हे घ्या पीयूसी..

मामा: हे एक्स्पायर झालय की हो परवाच

मी: हो झालंय खरं Sad

मामा: इन्श्यूरन्स?

मी: ...

मामा: तो ही रिन्यू करायचाय

मी: हो राहिला खरा (अरे देवा Sad )

मामा: फाईन भरा... एकंदर ६०० रू.

मी एटीममधून ६०० रू. काढून फाईन भरून निघालो तेवढ्यात मित्र म्हणाला अरे चहा प्यायचाय ना?

मी: एवढं सगळं झाल्यवर तुला चहा प्यायचाय का?

मित्र: हो तुला नकोय का?

मी: चला.

चहाच्या स्टॉलवर...

मी: म्हाराज दो उकाला देना

मनात( एक उकाळा ६१२ रुपयांना)

मित्र: अरे तुझ्या गाडीचे ब्रेक्स नीट लागत नसावेत जरा चेक करून घे ना.

मी: प्रकट हो का> साल्या तुला काय घाई होती???? !@#$%^ #$%#^ #!$!$%

मी ह्यावरनं एकच धडा शिकलो!

चहा फार पिऊ नये!! तल्लफ आलीच आणि आवरता आली नाहीच तर गाडीतन न जाता पायी जावं अथवा पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. गाडीत कायम पेपर्सची निदान फोटोकॉपी तरी ठेवावी!

गुलमोहर: 

"Its one of those days" म्हणायचं आणि सोडून द्यायचं.. पण चा नाय सोडायचा!

< उकळवून कडक केलेला चहा म्हणजे उकाळा. >

कश्शाला उग्गाच निरनिराळी नावे ठेवायची? सरळ चहा म्हणा ना! चहा नाहीतरी उकळलेलाच असतो. नको असेल तर लाईट चहा म्हणायचे म्हणजे फार उकळत नाहीत.

मागे एकदा 'चहा कटिंग' म्हणून एक प्रकार ऐकला. मला वाटले, दुकानात आपण चहा पीत असता न्हावी कटिंग करून देतो. म्हणून एकदा चहाच्या दुकानात गेलो नि म्हंटले एक चहा द्या, नि कटिंगहि करायची आहे. तर तो म्हणतो, हे न्हाव्याचे दुकान नाही!! मग कशाला उगीच चहा कटिंग म्हणायचे?
गोंधळ वाढवायचा नुसता, कमी नाही करायचा!! आजकालची मुले!!

झक्की, आता तुम्ही (बाकीची) म्हातारी मंडळी तक्रार करतात तसं न करता आजकालच्या मुलांची भाषा शिकून घ्या बरं. Wink

गाडी रस्त्यावर काढून चालायला सुरुवात करण्यापूर्वी त्याचे म्हणजे गाडीच्या संदर्भातील व वाहतुकीचे बेसिक्स माहित करुन घ्यावेत. जसं की, सिग्नल पिवळा झाला की, शक्यतो गाडी पुढे रेमटवू नये. गाडीच्या पेपर्सच्या सगळ्या झेरॉक्स कॉपीज कायमच गाडीत असाव्यात. आणि वेळ सांगून येत नसल्यामुळे महत्वाच्या कामात चालढकल करू नये. पीयुसी, इन्शुरन्स इ. चालढकल झाल्यास खिशाला कात्री लागल्याचं वाईट वाटून घेऊ नये.

बायदवे, तू चारचाकी केव्हा घेतलीस? Wink

Lol

असंच पाहीजे तुम्हाला.... स्वत:च्या हातानं न करून घेता तुम्हाला आयता चहा हवा होता ना.. आणि तो ही जेवणाच्या आधी ... Light 1

Lol
डुआय, मार्च एंड पर्यंत मामा मंडळी बॅकलॉग भरुन काढण्याच्या मागे असतात. थोडक्यात वाटमारीला उत आलेला असतो. Proud
आता कुठेही बाहेर चहा प्यायला चालतच जा Lol

सगळ्यात सोपा उपाय - मामानी कितीही शिट्टी मारली तरी तशीच गाडी दामटायची.(हलके घ्या .) किंवा घरीच चहा करून प्यायचा.

Happy

नशीब हो. दुसरं काय?

र.च्या.क. : माझी एक मैत्रीण "मला नेहेमी उखळलेला चहा लागतो" म्हणाली तेव्हा सगळे चक्कीत झालो होतो Happy

सर्वांच्या बहुमूल्य सल्ल्यांबद्दल धन्यवाद. Happy

सायो अगं "सिग्नल्स" सिरियसली घेतले असते ना (सगळेच) तर इट कुड हॅव बीन अ डिफरन्ट स्टोरी Proud

चा नाय सोडलेला अजिबात. उलट स्टॉलवाल्याचा चहाचा १५% धंदा आमच्याकडूनच होतो Wink

< उकळवून कडक केलेला चहा म्हणजे उकाळा. >कश्शाला उग्गाच निरनिराळी नावे ठेवायची? सरळ चहा म्हणा ना>>> अहो झक्की, चहावाला आपल्याकडचा एकच चहा विविध नावाने / प्रकाराने खपवित असतो त्यातलाच उकाळा हा एक प्रकार. अन् कटींग हा ही Happy

जसं हॉटेलात गेलात आणि बिर्याणी पुलाव मागवलात आणि घरी आईच्या हातचा फोडणीचा भात खाल्लात तर त्यात फार फरक नसतो तसंच चहाच आहे Wink फार फरक नसतो पण नावं वेगवेगळी Happy

>>मागे एकदा 'चहा कटिंग' म्हणून एक प्रकार ऐकला. मला वाटले, दुकानात आपण चहा पीत असता न्हावी कटिंग करून देतो>>> अहो ते तुम्ही कुठल्या शहरातल्या दुकानात गेलात त्यावर अवलंबून.

आमच्या इकडेही असंच झालं मी हा ज्योक ऐकला तेंव्हा चावाला म्हणाला साहब रुकीये नाई आता ही होगा| मग त्या नाईने केस कापले अन् तेवढ्या वेळात तिथंच मी दोन कटींग चा ढोसला नाईचे २५रू आणि चावाल्याच्या दुकानात बसलो म्हणून १५ रू. जास्त असे पैसे दिले खरे. पण केस कापलेच Proud तेंव्हाचा हा रेट आहे सध्याचा माहित नाही Wink तुम्ही याल ना इकडे तेंव्हा मी घेऊन जाईन हं तुम्हाला Wink

बाकी सायोच ऐका (ल च) Wink

आडो, ह्म्म्म्म करेक्टेस. बायदवे, तू चारचाकी केव्हा घेतलीस? >>> चार नव्हे पाचचाकी Proud चेतकला साईडकार लावली की झाली की पाचचाकी Proud

स्वत:च्या हातानं न करून घेता तुम्हाला आयता चहा हवा होता ना>> नाही नाही तसं नाही गं घरात ऑलरेडी चारदा चहा करून दुध संपवल्यामुळे नाईलाजास्तव रात्रीच्या जेवणाआधी चा घ्यायला बाहेर पडावं लागलं Biggrin

तोषा, अरे मामा म्हणाले की फाईनच भरा अन् रिसीट घ्या.

सगळ्यात सोपा उपाय - मामानी कितीही शिट्टी मारली तरी तशीच गाडी दामटायची.>> ह्म्म्म्म ही ट्रिक करायला ना मुलगी बरोबर असली की मामालोकांशी डील करणं जरा सोप्प जातं असा माझा अनुभव आहे Wink

चिंटुचा जोक आठवला..

बाबा सिग्नल्स बद्दल माहिती देत असतात.
बाबा: चिंटु लाल सिग्नल म्हणजे....
चिंटु: थांबा
बाबा: हिरवा सिग्नल म्हणजे....
चिंटु: जा
बाबा: आणि पिवळा सिग्नल म्हणजे....
चिंटु: जोरात जा.....

कुल्दिपका Happy
उकाळा म्हणजे \चहा नव्हे रे ...
उकाळा म्हणजे मसाला दुधासारखा प्रकार.... उकाळ्याचा मसाला मिळतो
आता \चहा च्या बेसिक्स ची पण उजळणी करायला पाहिजे ... Happy

करून घे रे बेसिक्सच उपयोगी पडतं पुढं असं म्हणतात. Proud एनीवे स्वारी बरंका Happy
आम्ही इथं चा प्रचंड उकळवल्यानंतर त्याला उकाला म्हणतो! अन् तू म्हणतोस तो उकाळा म्हणजे म.दू.हल्दीवाला रे.

मित्र बदालावे. १५ रुपये वाचले असते. >>> नाही कसं शक्य आहे??? आय मीन १५ रू. वाचवणं Wink

हॅ येवढ्या तेवढ्यासाठी मित्र बदललेत काय उपयोग हो? मित्र वापरावे लागतात कधीतरी (लिहिन ह्यावरही)

हसा हसा तुमचं काय जातं हसायला? मी काय विनोदी लिहिलंय का? ललित आहे हे खरं तर करूण ललित असा काही प्रकार नसतो साहित्यात नाही तर तसं टॅगलं असतं. Happy