याला "साहित्यचोरी" म्हणायचे काय?

Submitted by कमलाकर on 23 February, 2010 - 19:48

मला
http://mangeshbochare.blogspot.com
या संकेतस्थळावर खालील साहित्य आढळले. ते साहित्य "मायबोली" वरून कॉपी/पेस्ट केले असावे. पण मायबोली किंवा कवींच्या नावाचा उल्लेख नाही.
याला साहित्यचोरी म्हणायची काय?
कृपया मार्गदर्शन करावे.

  1. कळावे कसे
  2. वाढदिवस
  3. एकमेका पाहणे माझे तुझे
  4. पादुका
  5. नकोसे वाटते
  6. स्पर्श
  7. कठीण नाही
  8. नकार गर्भरेशमी!
  9. ते जीवच वेडे होते
  10. उरात आता नवा भाव आहे
  11. उरात आता नवा भाव आहे
  12. कधीतरी
  13. ...विरह...
  14. या देशाची वेळोवेळी अशी फाळणी केली!
  15. एवढीशी काच आहे आरसा
  16. गमक
  17. रिती पोकळी
  18. रस्ते दुरून गेले
  19. मुद्दाम
  20. बरेच झाले
  21. बाजार
  22. बदला
  23. वेडे
  24. वर्ज्य
  25. होकार
  26. आता नको
  27. गझलेचा श्रीगणेशा..!!
  28. पुढे चला रे....
  29. वाघास दात नाही
  30. भावस्थंडिल
  31. कल्लोळ
  32. चंद्रवदना ...
  33. रुतावे कुठे
  34. गोपाळ जो स्मरे तो
  35. हे रान निर्भय अता...
  36. आत्महत्या..
  37. निधडी छाती हिमालयाची ....
  38. धोका
  39. तुला पाहुनी बाग म्हणाली..
  40. नको आणखी
  41. कविता म्हणू प्रियेला...
  42. सूर आता लागले
  43. आभास मीलनाचा..
गुलमोहर: 

तेवढे लिहिले, तरी मूळ उगमस्त्रोताचे/लेखकाचा काहिच नामोनिशाण न ठेवणे हे "कृतघ्न" पणाचेच लक्षण होय!

निश्चितच उचलेगिरी आहे , त्याने मुळ लेखकाच / कवीचं नाव लिहायलाच हवं , नाही तर ही चोरीच ठरेल .
त्याच्या ब्लॉगवर त्याने कबुल केलय की हे लिखाण त्याचं नाही , पण तरीही परवानगी घेण वा ते शक्य नसल्यास कमीतकमी मुळ लेखकाच नाव तरी लिहायलाच हवं
♥♥♥ ♥♥ मंगेश बोचरे ♥♥♥ ♥♥

* Age: 23
* Gender: Male
* Astrological Sign: Libra
* Zodiac Year: Tiger
* Industry: Technology
* Occupation: IT Professional
* Location: आमची मुंबई : महाराष्ट्र : India

About Me

मला मराठी,हिंदी साहित्य वाचायला फार आवडते मला कविता लिहिता येत नाहित पण वाचायला फार आवडतात.ह्या ब्लॉग वरील सर्व कविता मी लीहीलेल्य़ा नाहीत.हे फक्त मला आवडलेलं कलेक्षन आहे. जे फक्त मनोरंजनासाठी ब्लॉग वर पोस्ट्स केलेले आहे.

आपण सगळ्यांनी त्याच्या ब्लॉगवर जाऊन निषेध व्यक्त करणार्‍या कमेंट्स लिहील्या तर? त्यासाठी त्या ब्लॉगधारकाने ती कमेंट अप्रुव्ह करावी लागते नां?

आणि ह्या चोराने सगळ्या कविताच टाकल्यात त्याच्या ब्लॉगवर आणि कवितेवर कमेंट्स ही नाहीत कोणाच्या. सायो म्हणते तसं हा कोणता ब्लॉग लिहायचा प्रकार आहे?

अ‍ॅडमिन, ह्या व्यक्तिचा माबोवावर ही रोजचाच असेल. ही व्यक्ति शोधून काढता येईल कां?

आवडल्ये म्हणून कविता जशी टाकली तसंच कवयित्री / कवीचे नावही टाकायला हवं खरं तर!

हा त्याचा मेल आयडी आहे - maddy42085@gmail.com मी ह्यावर मेल केल्ये.

मला वाटते ही उचलेगिरी आहे; पण चोरी नाही. कदाचित त्याने आवडलेल्या कविता पोस्ट केल्या असाव्यात. Wink पण तरीही प्रत्येक कवितेच्या शीर्षकाजवळ कुठेतरी कवी / कवयित्रीच्या नावाचा उल्लेख असलाच पाहिजे. Light 1

आपल्यापैकी प्रत्येकाने हे त्याला सांगितले पाहिजे!! डुआय ने दिलेल्या मेल आय्.डी. वर मी मेल केली आहे.

शरद

याला चोरीच Angry म्हणावी... खाली कुठेतरी कोपर्‍यात 'या सर्व कविता माझ्या नाहीत' हा उल्लेख पुरेसा नाही आहे. प्रत्येक कवितेच्या खाली, कविचा उल्लेख करायलाच हवा.

मी कविता वाचल्यावर खाली दिलेली तळ तळटिप दिसते....
Sunday, February 21, 2010 | Posted by ♥♥♥ ♥♥ मंगेश बोचरे ♥♥♥ ♥♥ at 9:24:00 PM

वाचणार्‍याचा काय समज होणार?

याला चोरीच म्हणावी... >

बरोबर ... तसेहि नाव न देता मेल्स वर मायबोली वरचे लेख फिरत असतातच . आता हा नवा Trend सुरु व्हायचा ....

बर झाल, ज्ञानेश्वर तुकारामान्च्या काळी असली लोक नव्हती!
नैतर आख्खी ज्ञानेश्वरी अन गाथा देखिल या लोकान्नी स्वतःच्या नावावर खपवली अस्ती! Proud

मी मंगेश यांच्या खालील पत्त्यवर मेल केली आहे. तसेच त्यांना या बाजुला डोकावण्याचे निमंत्रण पण दिले आहे...

maddy42085@gmail.com

अन-अवधानाने चुक झाली असल्यास साहेब सुधरतील अशी अपेक्षा...

ह्म्म्म अपेक्षा रास्त आहे. चूक सुधारायची संधी आपण दिली.

उदय,
या बाजुला डोकावण्याचे निमंत्रण पण दिले >> हे भारी केलेत.

<< वय २३ आहे.
कदाचित क ळ ले नसेल.>>

.
अहो मंडळी हा प्रकार जिमी यांनी मला फोन करून ४ दिवसापुर्वी कळवला तेव्हाच मी त्याला ई-मेल केलीय.
पठ्ठ्याने मला अजुनपर्यंत रीप्लाय पण दीला नाही. म्हणुन जिमी यांनी हा विषय सार्वजनिक केला. अजून त्याला कीती संधी द्यायच्या?.
बहाद्दराचे वय २३ आहे पण गुणवान किती? बघा.
१) रिप्लाय द्यावासा वाटत नाही.
२) कविचे/लेखकाचे नाव टाकायचे सोडून बाकी सर्व समजते.
३) कॉमेंटस ब्लॉक केल्यात.कॉमेंट लिहीताच येत नाही.
४) त्याला खरच काही रचना आवडल्या असतील तर तेथे मुळ स्थानी (मायबोलीवर किंवा ब्लॉगवर) आवडल्याची प्रतिक्रीया लिहायला काय हरकत होती?

व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् |
झक्कीजी..जरा अर्थ पण सांगाना.
"जगात जे जे दिसते (अर्थात आम्ही जे लिहितो) ते ते सर्व व्यासांनी चावून,चोखून,उष्ठे करून फेकलेलं आहे" हा अर्थ बरोबर का? Happy

"जमेल तेवढ्या लवकर source आणि कवी / कवयित्रिची नावे नमूद करतो" असा प्रतिसाद मला मिळाला आहे... थोडा धिर धरायला हवा.

http://nagpur1st.blogspot.com/

या संकेतस्थळावर "नागपुरी तडका : बिपाशाले लुगडं" कविता आढळली.
त्यांनी असा उल्लेख केला.
Thursday, February 11, 2010
Nagpuri Tadka
Hello Nagpuris, I am sharing a nice Nagpuri Tadka, which I received as a forward from a Mumbaikar.
... नामोल्लेख न करण्यामागची भुमिका प्रामाणिक वाटते.:स्मित:

उदयजी, त्याने ४-५ कवितांवर नाव नमुद केले आहे.

आता प्रत्येक लिखानावर "मक्ता" लिहिणे हा
साहित्यचोरीवर परिणामकारक पर्याय ठरू शकतो असे मला वाटते. Happy

<< त्याने माझी मक्त्यासह एक ग़ज़ल टाकली आहे.>>

म्हणजे
-तुमची आणि गझलेची ताटातूट नाही केलीय ना त्याने.
-त्याने गझलेला तुमच्यासहीत पळवले.
-हे प्रेयसीला तिच्या प्रियकरासहीत पळवल्यासारखेच झाले ना?

......मग तेवढी काळ्जी करण्याचे कारण नाही. Happy

Dear jimi,

The posts which was i copied from myboli.com i had deleted so please deleted this public post.

सगळीच क्रियापदं भूतकाळात असलेल्या या विंग्रजी पोस्टचा अर्थ कोणी सांगेल काय मला?
ही पब्लिक पोस्ट deleted असेल तर दिसतेय कशी काय मला?

तर्खडकर मदत करा हो!!

Pages