जुने हिन्दी चित्रपट व गाणी ही आपल्या मर्मबंधातील ठेव आहे. एकेक गाणी एकेक शॉट्स व फ्रेमस आपले रोजचे जीवन अगदी रौशन करून टाकतात. ( वरना था क्या इस जिन्दगी में? संदर्भ फारुख शेख बाजार ) रफी, लता, मुकेश किशोर नौशाद व साहिर यांची गाणी तर अगदी देवगड हापूस. मधुबालेचा नखरा व सौन्दर्य मोहविणारे.
काळाच्या पड्द्याआड गेले तरी हे गुणी कलावंत आपल्या मानसिक जीवनाचा एक भाग आहेतच. आज एक मन अतिशय उद्विग्न करणारी बातमी वाचली. रोजचे २.५ बॉम्ब स्फोट, १० घोटाळे अपहरण अपघात वगैरे वाचून नजरेआड करायची सवय झाली आहे तरी पण हे वाचताच दिल से एक आह निकली.
हिन्दी सिनेमातील दिग्गज कलावंत रफीसाब, नौशाद, साहिर लुधियानवी व मधुबाला यांना मुम्बईत जिथे दफन केले गेले होते तेथून त्यांच्या अस्थी व अवशेष काढून टाकून त्यांची रीतसर विल्हेवाट लावण्यात आली आहे.
त्यांच्या कबरी नष्ट करून वर माती पसरली आहे व नवीन प्रेतांना पुरण्यासाठी जागा करण्यात आली आहे. हे कबरस्तात जुहू येथे आहे.
यावर विचारणा केल्यास जागा कमी आहे व धर्मात हे बसत आहे त्यामुळे असे केले आहे असे उत्तर मिळाले. जुहू गार्डन समोरील या कबरस्तानात नसीम बानू, अलि सरदार जाफरी, के ए अब्बास, परवीन बाबी, जान निसार अख्तर यांच्या कबरी इथे आहेत. गेल्या पाच वर्षांपासून चाललेल्या प्रक्रीयेत ही जागा मॅनेज करणार्या ट्रस्ट ने
या जागेवरील २१ कबरी हलवायला सुरुवात केली आहे त्यांच्या कुटुम्बीयांना न कळविता रिमेन्सची विल्हेवाट लावली आहे. त्या नंतर तीन फूट माती पसरून नवीन कबरींसाठी जागा केली आहे. नुकतेच आमिर खान यांचे
वडिल वारले ते इथेच दफन केले गेले आहेत. साहजिकच आहे नातेवाइकांना धक्का बसला आहेच.
मला या विषयाच्या धार्मिक बाबी बद्दल अजिबात देणे घेणे नाही पण एक सांस्क्रुतिक व कलेचा वारसा असा
नाहीसा होताना बघणे जड जाते. हे रीमेन्स फिल्म् सिटि किंवा पनवेल सारख्या ठिकाणी नव्याने जपता आले असते. अशी किती जागा लागली असती. त्या भोवती एक् साधी बाग करून शेजारी रसिकांना बसायला व आपल्या भावना व्यक्त करायला दगडी बाके टाकता आली असती. एक छोटे कॅफे. कल्चरल सेन्टर बनवून त्यात
गाणी कायम झुळझुळत राहिली असती. सिनेमा स्क्रीनीन्ग्स ठेवता आली असती. आपला वारसा आपणच जपत नाही म्हणून हळहळ वाट्ली. अमेरिकेत तो हॉलिवूड मध्ये स्टार मिळतो तसे यांच्या नशीबी नाही पण इतकी दुर्गत पदरी यावी का? काळाचा महिमा अगाध आहे हेच खरे.
पेपर मध्ये त्यांचे फोटो आलेत ते माझ्या गाण्याच्या वहीत चिकट्वले आहेत. अजून आपण काय करू शकतो?
(No subject)
खरंच ह्याहून मोठी त्या
तुमच्या भावना पोचल्या मामी पण
तुमच्या भावना पोचल्या मामी पण अशी कलाकारांची स्मारकं किंवा कल्चरल सेन्टर्स उभारायला, त्याला लोकांचा प्रतिसाद मिळायला, शासनाची सर्वतोपरी मदत व्हायला त्या त्या समाजाची, शहराची कला-संस्कृती, कला जाणीवा विकसित झालेल्या असाव्या लागतात. जसे युरोपमधे होते. दुर्दैवाने आपल्याइथे ही जाणीवच विकसित झालेली नाही हे खेदाने म्हणावे लागते. नुसते पुतळे उभारणे, रस्त्यांना नावे देणे म्हणजे कलाकाराची स्मृती जपणे नसते. आर्ट आर्काईव्ह, कलादालने त्याऐवजी उभारली तर लोकांपर्यन्त ते कलाकार चिरंतन कालासाठी जिवंत रहातात ही जाणिवच इथे ना सरकारला ना समाजाला. आणि म्हणूनच तर कोल्हापूरचे स्टुडिओज पाडून तिथे मॉल उभारले जातात. राजा रविवर्माचा ऐतिहासिक स्टुडिओ आणि प्रेस (मळवली आणि मुंबई दोन्ही ठिकाणचा) जमिनदोस्त करुन ती जागा कमर्शियल कॉम्प्लेक्ससाठी सरकारकडूनच वापरली जाते आणि लोकही त्याला विरोध करत नाहीत.
रविवर्मा प्रेसमधले लिथो तर बागेत दगड म्हणून वापरले गेले. जेव्हा त्याला जागतिक लिलावात लाखोंचे मूल्य आले तेव्हा तिथून उपसून आपापल्या खाजगी संग्रहात नेण्यात राजकारणी आणि इतर समाजातले मोठे लोक सारखेच आघाडीवर होते. पण एकाच्याही मनात तिथे कला संग्रहालय बनवून त्यात रविवर्माचे लिथोग्राफ्स, ओलिओग्राम्स जपून ठेवण्याचे मनात आले नाही. इटालीचा एक कलाकार तिथे आला तेव्हा हे बघून तो हादरला. अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने जमेल तेव्हढे उचलून परदेशात नेले. आता याला काही जण लुट म्हणू शकतात पण निदान तिथे ते सुरक्षित तरी राहिल. उंदीर कुरतडून टाकणार नाहीत आणि वाळवी लागणार नाही. ( मी सविस्तर लिहिन रविवर्माच्या मळवली प्रेसच्या दुर्दशेबद्दल. सॉरी या बीबीची जागा घेतली मी मामी).
साहिर, मधुबाला, नौशाद आणि इतर अनेकांना फक्त त्यांच्या गाण्यांमधून आणि कलेमधून आपण जिवंत ठेवायचे. बाकी काही केले जाण्याइतके त्यांचे भाग्य नाही इथे. व्यवहार जास्त महत्वाचा असतो. मुंबईला तर तो परवडणाराच नाही. आंदोलने उभारण्याची या शहराची आणि एकंदरच आपल्या समाजाची कारणे वेगळी असतात. कला त्यात बसत नाही.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Rafi-Madhubala-dont-rest-...>> मूळ बातमी इथे वाचता येइल.
शर्मिलाजी प्रतिक्रिया मोलाची की. जागा योग्य आहे का ते लोक बघून घेतील. पण मॉल वगैरे साठी जागा मिळते व अशी घट्ना होते तेव्हा वाइट वाट्ते.
खूप हळहळलो. रफीच्या
खूप हळहळलो. रफीच्या आवाजातल्या साहिरच्या ओळी आठवल्या.
न तू ज़मीं के लिए है, न आसमाँ के लिए
तेरा वुजूद है अब सिर्फ़, दास्ताँ के लिए
संगीत अर्थातच नौशादचे.
शर्मिलाशी सहमत. "रोटी, कपडा और मकान" ह्यांच्या झगड्यात दररोज जायबंदी होणाऱ्या समाजात कसल्या जाणिवा विकसित होणार? मूठभर लोकांनी, नव्हे माफियाने, राज्य करायचं. मूठभर लोकांनी हळहळायचं.
(No subject)
मामी , वाचुन वाईट वाट्लं...
मामी , वाचुन वाईट वाट्लं...
सुखाने जगु देत नाहीत, मरू देत
(No subject)
कलेचा वारसा आणि वर उल्लेखलेले
कलेचा वारसा आणि वर उल्लेखलेले अवशेष यांचा संबंध काही झेपला नाही.
किशोर कुमार चा पण वर उल्लेख आला आहे. त्याचे अवशेष कोठे आहेत ? नाहीयेत, आणि तरीही तो अजरामरच आहे. मधुबाला चे अवशेष तिच्या कुटुंबियांना न कळवता नाहीसे केले यात त्यांना वाईट वाटणे हे वेगळे आणि आपण कलेचा वारसा / संस्कृती जतन इत्यादी म्हणून कंठशोष करणे वेगळे. मला पण वाईट वाटले पण त्याने आपला सांस्कृतिक वारसा हरवला असे तर अजिबात वाटत नाही.
मॉर्टल रीमेन्स जपून कोणत्या प्रकारचा वारसा राहतो ?
हा लेख बादरायण संबंध लावून लिहिलेला वाटला.
>> कलेचा वारसा आणि वर
>> कलेचा वारसा आणि वर उल्लेखलेले अवशेष यांचा संबंध काही झेपला नाही.
मलापण. जुन्या कबरी काढुन नवीन कबरिंसाठी जागा करणं हे नवीन नाही... its routine.
हे कलाकार तर त्यांच्या कलेतुन अमर झाले आहेतच!
मामी- तुमच्या भावना पोचल्या
मामी- तुमच्या भावना पोचल्या मात्र. तुमच्या मनात, कानात ते कलाकार आहेत ना? मग ते अमर आहेत खरंच.
शर्मिलाफडकेंशी सहमत. सकाळीच तसं लिहीणार होते पण इतक्या सौम्यपणे लिहीता आलं नसतं.
वाइट वाटले वाचुन.
वाइट वाटले वाचुन.
आपण सर्वांना कोणत्याही
आपण सर्वांना कोणत्याही प्रकारे दु:ख व्हावे या हेतूने मी हे लिहिलेले नाही. किंवा कंठ्शोष नाही. काळाच्या रेट्यात भावना प्रधानतेची हीच गत होणार याचा एक अॅक्सेप्ट्न्स आहे एवढेच.
http://www.pere-lachaise.com/perelachaise.php?lang=en
पॅरिस मधील ह्या कलाकार, नट वगैरे लोकांना पुरलेल्या जागी उभारलेली ही सिमेट्री, त्याची वेबसाइट वर्च्युअल टूर व माहिती असे करणे शक्य नाही का? पण ....... well its not so important, I guess in the greater scheme of things. Why bother?
मामी भावना पोहोचल्या मिलिंदा
मामी भावना पोहोचल्या
मिलिंदा तुझे argument तर्कसंगत असले तरी धोकादायक आहे. काही गोष्टींना हात न घातलेलाच चांगला
तुमच्या मनात, कानात ते कलाकार
तुमच्या मनात, कानात ते कलाकार आहेत ना? मग ते अमर आहेत खरंच
पण त्याने आपला सांस्कृतिक वारसा हरवला असे तर अजिबात वाटत नाही.
मॉर्टल रीमेन्स जपून कोणत्या प्रकारचा वारसा राहतो ?
>> मामींच्या भावनांचा आदर करूनही ह्या प्रतिक्रियांना अनुमोदन!
अहो मला अनुमोदन मिळावे अशी
अहो मला अनुमोदन मिळावे अशी माझी आजिबातच अपेक्षा नाही. फिकर नॉट. फक्त एक घट्ना नजरेसमोर आणली. मध्ये चांगल्या गाण्यांच्या बीबीवर या कलाकारांवर चर्चा झाली होती. त्या सभासदांना हे कोण कळवेल या हेतूने. वाचक काही टेन्शन घेऊ नका. प्रतिक्रियांमुळे एक प्रकारचे शिक्षण होतेच की.
मामी तुमच्या भावना
मामी तुमच्या भावना पोचल्या
तसेच मिलिंदा यान्चे argument पण तर्कसंगत आहे
<<मला पण वाईट वाटले पण त्याने आपला सांस्कृतिक वारसा हरवला असे तर अजिबात वाटत नाही.>>
अगदि बरोबर.
मामी , आपण हॉलीवूड स्टार
मामी , आपण हॉलीवूड स्टार संबंधी जे लिहिले आहे त्याचे थोडे स्पष्टी करण : जिथे हे स्टार असतात ती त्यांची दहनभूमी नसते. ती वेगळीच असते आणि ती त्यांना विकत घ्यावी लागते. ही दहनभूमी विकत घेण्याची सोय जिवंतपणी सुद्धा करता येते. नव्हे खुप लोक तशी सोय करतात . तस म्रूत्यु पत्रात लिहुन ठेवतात. मुंबई सारख्या ठिकाणी जागा हा मोठाच प्रश्न आहे. तेव्हा आपण वर्णन केल्याप्रमाणे दहनभूमीची 'हालत' झाली यात नवल ते काय ? झाल्या गोष्टी बद्दल वाईट जरूर वाटते, पण त्यानी कलाकाराचे जनमानसातले स्थान थोडेच कमी होते ?
>>>>हे कलाकार तर त्यांच्या
>>>>हे कलाकार तर त्यांच्या कलेतुन अमर झाले आहेतच!>>>>अगदि अगदि
मिलींदा आणि नानबाला
मिलींदा आणि नानबाला अनुमोदन...
मिलिंदाला अनुमोदन.
मिलिंदाला अनुमोदन.
मलाही पटलं मिलिंदाचं म्हणणं.
मलाही पटलं मिलिंदाचं म्हणणं. त्याचबरोबर वर शुगोच्या म्हणण्यातही तथ्य आहे.
मी काल हे वाचल्यापासून विचार
मी काल हे वाचल्यापासून विचार करत होते, प्रतिक्रिया द्यावी की न द्यावी याचा.
मी ही मिलिंदा व सॅमच्या पोस्टशी सहमत. आपण काल ही बातमी वाचेपर्यंत आपल्याला त्यांच्या थडग्यांबद्दल काय व किती माहिती होती? (निदान मला तरी नव्हती) पण त्यामुळे त्यांच्या आवाजाबद्दलचं प्रेम तसूभरही कमी नव्हतं झालेलं.
साहिर, रफी, नौशाद अजरामर आहेत
साहिर, रफी, नौशाद अजरामर आहेत हे ऍन आर्ग्युमंट फोर आर्ग्युमंट्स सेक ठीक वाटतं. ह्याच आर्ग्युमंटने अनेक समाधीस्थळे, कबरी, थडगी, इमारती सोयीस्करपणे जमीनदोस्त करता येतील. उद्या अगदी ताजमहाल भुईसपाट केला तरी म्हणता येईल- हे शेवटी थडगंच. तसेही मुमताज शहाजहानचं प्रेम अजरामर. त्यामुळे ताजमहालाच्या असण्याने नसण्याने काय फरक पडतो.
उपयोगितावादी (युटिलिटेरियन) समाज हा हळूहळू सांस्कृतिकदृष्ट्या मृत होत असतो की काय?
त्यामुळे ताजमहालाच्या
त्यामुळे ताजमहालाच्या असण्याने नसण्याने काय फरक पडतो.
>> उपयोगितावादी दृष्टीकोनातून तिकीटाचं उत्पन्न बुडतं!
खरं उत्तरः
वर शर्मिला फडक्यांनी दिलेली उदाहरणं हळहळ वाटवून गेली मला (आणि मला खात्री आहे इथल्या इतर अनेकांना)
कलाकाराची ओळख त्याच्या कलेवरून असते. जर उद्या रफीच्या गाण्याच्या कॅसेट्स/सीडीज नष्ट केल्या तर नक्कीच मनापासून वाईट वाटेल.
ताजमहाल ही एक कलाकृती आहे.. तिचं नाहिसं होणं - म्हणजे नक्कीच वाईट वाटेल! (frankly speaking - I dont care abt that "love story" behind Tajmahal! ती १६ वर्षात १३-१४ बाळंतपण झाल्यानं बाळंतरोग होऊन गेली म्हणतात! बिचारी! हे प्रेम!!)
म्हणजे ह्यातून ज्याला कुणाला दु:ख वाटलं त्याची भूमिका त्याच्या दृष्टीकोणातून बरोबर असेल - आणि त्याला कमी लेखायचा ही हेतू नाही.
पण आम्हाला दु:ख नाही वाटलं - आणि त्याची कारणमिमांसा वर आलेली आहे!
मामी , आपण हॉलीवूड स्टार
मामी , आपण हॉलीवूड स्टार संबंधी जे लिहिले आहे त्याचे थोडे स्पष्टी करण : जिथे हे स्टार असतात ती त्यांची दहनभूमी नसते. ती वेगळीच असते आणि ती त्यांना विकत घ्यावी लागते.>> मला माहित आहे पण सांगितल्या बद्दल धन्यवाद!
मिलिंदाचं म्हणणं तर्कसंगत आहे
मिलिंदाचं म्हणणं तर्कसंगत आहे खरं. पटलं. पण खरं तर टेक्निकली थडगी जपून ठेवण्यापेक्षाही एखाद्या भूतकाळात होऊन गेलेल्या कलाकाराचा वारसा कृतज्ञापूर्वक जपून ठेवला गेला पाहिजे अशी कळकळ वाटण्यासाठी जी मानसिकता किंवा जाणीव असायला पाहिजे ती नसल्याचा खेद आहे. मला अॅक्चुअली त्याबद्दलच लिहायचं होतं.
कलाकारांची घरं, स्टुडिओज वगैरेही जसेच्या तसे जपून ठेवण्याइतकी मुभा आपल्याला हे शहर देत नाही यामागे खरोखरच जेन्यूईन कारणे असतात (मुंबईव्यतिरिक्तही हे घडतेच ते वेगळे) पण तरी तिथे एखादे कलासंग्रहालय, स्मृतीदालन, फोटो एक्झिबिशन अशा स्वरुपात एखदा कोपरा तरी सहज राखता येऊ शकतो. आपल्या मृत्यूनंतरही हे कलाकार आपले मन रिझवत रहातात त्याची इतकी किंचित जाणीव तरी अशा स्मृतीदालनांमधून आपण ठेवू शकलो असतो. किती मोठमोठे गायक, चित्रकार, चित्रपट-नाट्य कलाकार या शहराने दिले, ते इथे मोठे झाले, त्यांची कला विकसित झाली पण हे सगळं कुठे घडलं हे दाखवायला आज जर मला माझ्या मुलीला घेऊन जावसं वाटत असेल तर एकही जागा अस्तित्त्वात नाही. सत्यजित रेंच्या घरात आणि स्टुडिओत गेल्यावर जे मानसिक समाधान मिळते, त्यांच्या पाथेर पांचालीची डिव्हिडी तिथेच त्यांचं स्केचबूक पाहून झाल्यावर जेव्हा आपण पहातो तेव्हां अंगावर शहारा येतो.
मुंबईत किंवा महाराष्ट्रात अशी एखादीही जागा कां असू नये ही हळहळ व्यक्त केली गेली यास्वरुपात इतकंच.
शर्मिलाशी संपूर्ण सहमत.
शर्मिलाशी संपूर्ण सहमत.
जब तक ... जब तक लोग उनको याद
जब तक ...
जब तक लोग उनको याद करेंगे ...
तब तक ...
तब तक वो लोगों के दिलों में जिंदा रहेंगे ...
Pages