’येते हं’

अजुनही ह्रुदयात गोंदली आहे तुझी नी माझी पहीली भेट
बावरलेली नजर तुझी ह्रुदयात शिरली होती थेट
मनात दाटल्या भावनांच ओठी येता झाल गाणं
ह्रुदयानी छेडल्या सुरांच मनात असच तरळत रहाणं
वाटल होत तेंव्हा तुझे हात हाती घ्यावेत
वाटल होत तेंव्हा तुझे हात मुठीत घट्ट धरावेत
मग म्हंटल जाउ दे! नाहीच भरल हातानी मन
तर ह्रुदयानी काय करावे?
माझं ह्रुदय म्हणता म्हणता उनाड पाखरु झाल
तुला भाळी आट्या बघताच पुन्हा भानावर आल
आता तुझी नजरही जरा सावरली
मीही माझी स्वप्न आवरली
तु 'येते हं' म्हणताच माझी स्वप्न बावरली!
’येते हं’ या शब्दांनी सारं आकाश भरुन गेलं
’येते हं’ या शब्दांना आज उभं तप सरुन गेलं
तु ’येते हं’ म्हणुन पुन्हा कधीच आली नाहीस
तुझी नी माझी राहीली भेट पुन्हा कधीच झाली नाही
आजुनही मनात सल आहे तुझी मला साथ नाही
मीही खुळ्या मनाला समजवतो
एकदा गोंदलं कधी जात नाही..

-सत्यजित


सत्यजित, खूप आवडली कविता.... कविता सही आहे... काहीच्या काही मुळीच नाही



तु म्हणतेस काहीच्या काही नाही... तर नसेल. पण कवितेत सहज लय नाही आली, एक विषिष्ठ लयीत वाचली तरच ठीक वाटते. म्हणुन काहिच्या काहित पोस्ट केली. आता पुन्हा थोडी दुरुस्तली आहे.

पण तुला आवडली ना बस.. मग वसुल आहे!



छान कविता रे सत्या स्मित)



छान कविता रे सत्या स्मित)