स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"सेवा करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी कोल्हापूर", वाचा प्रतिलिपि वर :,

https://pratilipi.page.link/atD62ixG4XQte9fk8

भारतीय भाषेतील अमर्याद साहित्य वाचा, लिहा आणि ऐका अगदी विनाशुल्क!

श्री गणेश करुणाश्लोक १ Happy
घोर हा नको फार कष्टलो |
निजहितास मी व्यर्थ गुंतलो |
वारि शीघ्र संसार यातना |
दे दयानिधे श्री गजानना || १ ||

विषय गोड हे लागले मला |
यामुळे असे घात आपुला |
कळूनीया असें भ्रांति जाईना |
हे दयानिधे श्री गजानना || २ ||

त्रिविध ताप हा जाळितो अती |
काम क्रोध हे जाण पीडती |
चित्त सर्वथा स्वस्थ राहिना |
हे दयानिधे श्री गजानना || ३ ||

स्त्री धनादि हे आठवे मनी |
छंद हाच रे दिवसयामिनी |
विसरलो तुला दिनपालना |
हे दयानिधे श्री गजानना || ४ ||

माउली पिता बंधू सोयरा |
तूंचि आमुचा निश्चये खरा |
शरण तुंज मी विघ्नभंजना |
हे दयानिधे श्री गजानना || ५ ||

म्हणवितो तुझा दास या जनी |
सकळ व्यापका जाणशी मनी |
भुक्ती मुक्ती दे भक्तपालना |
हे दयानिधे श्री गजानना || ६ ||

काय काय रे साधनें करू |
मी असे तुझे मुर्ख लेकरु |
विटंबिती मला द्वेत्तभावना |
हे दयानिधे श्री गजानना || ७ ||

विषयचिंतनें शोक पावलों |
देह बुध्दीने व्यर्थ नाडलों |
भालचंद्रजी तोड़ी बंधना |
हे दयानिधे श्री गजानना || ८ ||

गजमुखा तुझी वाट पहातां |
नेत्र शीणले जाण तत्वतां |
भेटसी कधी भ्रमनिवारणा |
हे दयानिधे श्री गजानन || ९ ||

प्रभु समर्थे तू आमुचे शिरी |
वेष्टिलों असे विषयपामरीं |
नवल हेंचि रे वाटते मना |
हे दयानिधे श्री गजानना || १० ||

अगुण अद्वया तू परात्परा |
पार नेणवे विधि हरीहरां |
अचल निर्मला नित्य निर्गुणा |
हे दयानिधे श्री गजानना || ११ ||

जिवन व्यर्थ हे तुज वेगळे |
स्वहित आपुले काम साधिले |
सुख नसे सदा मोहयातना |
हे दयानिधे श्री गजानना || १२ ||

फारसे मला बोलता न ये |
पाउले तुझे देखिलीं स्वये |
मांडिली असे बहुत वल्गना |
हे दयानिधे श्री गजानना || १३ ||

दीनबंधू हे ब्रीद आपुले |
साच तूं करीं दाविं पाउले |
मंगलालया विश्वजीवना |
हे दयानिधे श्री गजानना || १४ ||

नाशिवंत रे सर्व संपदा |
हे नको मला पाव एकदा |
क्षेम देउनी चित्तरंजना |
हे दयानिधे श्री गजानना || १५ ||

जातसे घडी पल युगापरी |
लागली तुझी खंती अंतरी |
स्वामी आपुला विरह साहिना |
हे दयानिधे श्री गजानना || १६ ||

कळेल तें करी विनविणे किती |
तारी अथवा मारीं गणपती |
सकलदोष अन संकष्टनाशना |
हे दयानिधे श्री गजानना || १७ ||

आवडे मला त्रिभुवनाकृती |
पूजुनी बरी करीन आरती |
धांव पांव रे मोदकाशना |
हे दयानिधे श्री गजानना || १८ ||

हृदय कठीण तूं न करि सर्वथा |
अंत आमुचा बघसी पुरता |
सिध्दी वल्लभा मूषकवाहना |
हे दयानिधे श्री गजानना || १९ ||

कल्पवृक्ष तू कामधेनु वा |
लाविजे स्तनीं जिविंच्या जिवा |
हाचि हेत रे शेष भुषणा |
हे दयानिधे श्री गजानना || २० ||

गणपति तुझे नाम चांगले |
आवड़ी बहू चित्त रंगले |
प्राथना तुझी गौरीनंदना |
हे दयानिधि श्री गजानना || २१ ||

तारिं मोरया दुःखसागरीं |
गोसावीनंदन प्रार्थना करी |
आत्मया मनी जाण चिदघना |
हे दयानिधे श्री गजानना || २२ ||

मध्यंतरी एक साईट सापडली ज्याच्यावर वेगवेगळ्या स्तोत्रांचे संधी विग्रह, व्याकरणदृष्ट्या केलेले अनुवाद आणि मग गोळाबेरीज अर्थ सांगते. प्रत्येक शब्दावर क्लिक केले कि विभक्ती प्रत्ययासहित मूळ शब्दाचा अर्थ दिला आहे.

ज्यांनी संस्कृत/संस्कृत व्याकरण शिकले नाही किंवा ज्यांना वाचताना आपसूक संधी विग्रह होत नसल्यामुळे उच्चारायला किंवा अर्थ समजायला कठीण जात असेल त्यांच्यासाठी ही फार उपयुक्त साईट आहे. लहान मुलांना शिकवायलाही उपयोगी ठरेल.

https://www.greenmesg.org/stotras/

हे आधी येऊन गेले आहे का माहीत नाही. पण यातील पदलालित्य मला फार आवडते. शिवाय नरसिंहाच्या उग्र रूपाची कल्पना पुरेपूर येईल अशी शब्दरचना आहे

॥ श्रीषोडशबाहुनृसिंहाष्टकम् ॥

भूखण्डं वारणाण्डं परवरविरटं डंपडंपोरुडंपं,
डिं डिं डिं डिं डिडिम्बं दहमपि दहमैः झम्पझम्पैश्चझम्पैः ।
तुल्यास्तुल्यास्तु तुल्याः धुमधुमधुमकैः कुङ्कुमाङ्कैः कुमाङ्कैः,
एतत्ते पूर्णयुक्तमहरहकरहः पातु मां नारसिंहः ॥ १॥

भूभृद्भूभृद्भुजङ्गं प्रलयरववरं प्रज्वलद्ज्वालमालं,
खर्जर्जं खर्जदुर्जं खिखचखचखचित्खर्जदुर्जर्जयन्तं ।
भूभागं भोगभागं गगगगगगनं गर्दमर्त्युग्रगण्डं,
स्वच्छं पुच्छं स्वगच्छं स्वजनजननुतः पातु मां नारसिंहः ॥ २॥

एनाभ्रं गर्जमानं लघुलघुमकरो बालचन्द्रार्कदंष्ट्रो,
हेमाम्भोजं सरोजं जटजटजटिलो जाड्यमानस्तुभीतिः ।
दन्तानां बाधमानां खगटखगटवो भोजजानुस्सुरेन्द्रो,
निष्प्रत्यूहं सराजा गहगहगहतः पातु मां नारसिंहः ॥ ३॥

शङ्खं चक्रं च चापं परशुमशमिषुं शूलपाशाङ्कुशास्त्रं,
बिभ्रन्तं वज्रखेटं हलमुसलगदाकुन्तमत्युग्रदंष्ट्रं ।
ज्वालाकेशं त्रिनेत्रं ज्वलदनलनिभं हारकेयूरभूषं,
वन्दे प्रत्येकरूपं परपदनिवसः पातु मां नारसिंहः ॥ ४॥

पादद्वन्द्वं धरित्रीकटिविपुलतरो मेरुमध्यूढ्वमूरुं,
नाभिं ब्रह्माण्डसिन्धुः हृदयमपि भवो भूतविद्वत्समेतः ।
दुश्चक्राङ्कं स्वबाहुं कुलिशनखमुखं चन्द्रसूर्याग्निनेत्रं,
वक्त्रं वह्निस्सुविद्युत्सुरगणविजयः पातु मां नारसिंहः ॥ ५॥

नासाग्रं पीनगण्डं परबलमथनं बद्धकेयूरहारं,
रौद्रं दंष्ट्राकरालं अमितगुणगणं कोटिसूर्याग्निनेत्रं ।
गाम्भीर्यं पिङ्गलाक्षं भ्रुकुटितविमुखं षोडशाधार्धबाहुं,
वन्दे भीमाट्टहासं त्रिभुवनविजयः पातु मां नारसिंहः ॥ ६॥

के के नृसिंहाष्टके नरवरसदृशं देवभीत्वं गृहीत्वा,
देवन्द्यो विप्रदण्डं प्रतिवचन पयायाम्यनप्रत्यनैषीः ।
शापं चापं च खड्गं प्रहसितवदनं चक्रचक्रीचकेन,
ओमित्ये दैत्यनादं प्रकचविविदुषा पातु मां नारसिंहः ॥ ७॥

झं झं झं झं झकारं झषझषझषितं जानुदेशं झकारं,
हुं हुं हुं हुं हकारं हरित कहहसा यं दिशे वं वकारं ।
वं वं वं वं वकारं वदनदलिततं वामपक्षं सुपक्षं,
लं लं लं लं लकारं लघुवणविजयः पातु मां नारसिंहः ॥ ८॥

भूतप्रेतपिशाचयक्षगणशः देशान्तरोच्चाटना,
चोरव्याधिमहज्ज्वरं भयहरं शत्रुक्षयं निश्चयं ।
सन्ध्याकाले जपतमष्टकमिदं सद्भक्तिपूर्वादिभिः,
प्रह्लादेव वरो वरस्तु जयिता सत्पूजितां भूतये ॥ ९॥

॥ इति श्रीविजयीन्द्रयतिकृतं श्रीषोडशबाहुनृसिंहाष्टकं सम्पूर्णम् ॥

नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन |
(ह्याचा अनुप्रास अतिशयच उत्तम आहे)

|| गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||
श्रीगुरु दत्तराजमूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती |
श्रीगुरु दत्तराजमूर्ती ओवाळितो प्रेमे आरती |
ब्रह्मा-विष्णु-शंकराचा असे अवतार श्रीगुरुचा,
कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्रि-ऋषिचा,
धरिला वेष असे यतिचा, मस्तकी मुकुट शोभे जटीचा |
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी, हातामध्ये आयुध बहुत वरूनी
तेणे भक्तांचे क्लेश हरूनी
तयासी करुनी नमन , अघशमन होतसे रीपुदमन गमन त्रैलोक्यावरती
||१||
ओवाळितो प्रेमे आरती ||
गाणगापुरी वसति ज्याची, प्रीति अवदुंबर छायेची,
भीमा-अमरसंगमाची भक्ति असे बहुत सुशिष्यांची,
वाट दावुनिया योगाची, ठेव देतसे निजमुक्तीची,
काशीक्षेत्री स्नान करितो, करविरि भिक्षेला जातो
माहुरि निद्रेला वरितो -
देह तरतरित, छाटि झरझरित , नेत्र गरगरित
शोभतो त्रिशुळ जया हाती ॥२॥
अवधुत स्वामि सुखानंदा ओवाळितो सौखकंदा
तारि हा दास हृदयकंदा सोडवी विषयमोहछंदा
आलो शरण अत्रिनंदा, दावि सद्गुरु ब्रह्मानंदा,
चुकवी चौर्‍याएंशीचा फेरा, घालिति षड्रिपु मज घेरा,
गांजिति पुत्र-पौत्र दारा-
वदवी भजन मुखी तव पुजन
करितसे
सृजन जयाचे बलवंतावरती ||३||
ओवाळितो प्रेमे आरती ||

||सद्गुरुनाथार्पणमस्तु||

ही आरती श्री चैतन्य दीक्षित यांचे प्रतिसादात थोडा बदल करून प्रतिसाद दिला आहे
पृष्ठ क्रमांक १२

पार्वतीवल्लभनीलकण्ठाष्टकम्

नमो भूतनाथं नमो देवदेवं
नमः कालकालं नमो दिव्यतेजम् ।
नमः कामभस्मं नमश्शान्तशीलं
भजे पार्वतीवल्लभं नीलकण्ठम् ॥ १॥

सदा तीर्थसिद्धं सदा भक्तरक्षं
सदा शैवपूज्यं सदा शुभ्रभस्मम् ।
सदा ध्यानयुक्तं सदा ज्ञानतल्पं
भजे पार्वतीवल्लभं नीलकण्ठम् ॥ २॥

श्मशाने शयानं महास्थानवासं
शरीरं गजानं सदा चर्मवेष्टम् ।
पिशाचं निशोचं पशूनां प्रतिष्ठं
भजे पार्वतीवल्लभं नीलकण्ठम् ॥ ३॥

फणीनाग कण्ठे भुजङ्गाद्यनेकं
गले रुण्डमालं महावीर शूरम् ।
कटिं व्याघ्रचर्मं चिताभस्मलेपं
भजे पार्वतीवल्लभं नीलकण्ठम् ॥ ४॥

शिरश्शुद्धगङ्गा शिवा वामभागं
बृहद्दिव्यकेशं सदा मां त्रिनेत्रम् । var बहूदीर्घ मां?
फणी नागकर्णं सदा भालचन्द्रं var बालचन्द्रं
भजे पार्वतीवल्लभं नीलकण्ठम् ॥ ५॥

करे शूलधारं महाकष्टनाशं
सुरेशं वरेशं महेशं जनेशम् ।
धनेशस्तुतेशं ध्वजेशं गिरीशं var धने चारु ईशं
भजे पार्वतीवल्लभं नीलकण्ठम् ॥ ६॥

उदानं सुदासं सुकैलासवासं var उदासं
धरा निर्धरं संस्थितं ह्यादिदेवम् ।
अजा हेमकल्पद्रुमं कल्पसेव्यं
भजे पार्वतीवल्लभं नीलकण्ठम् ॥ ७॥

मुनीनां वरेण्यं गुणं रूपवर्णं
द्विजानं पठन्तं शिवं वेदशास्त्रम् ।
अहो दीनवत्सं कृपालुं शिवं हि
भजे पार्वतीवल्लभं नीलकण्ठम् ॥ ८॥

सदा भावनाथं सदा सेव्यमानं
सदा भक्तिदेवं सदा पूज्यमानम् ।
मया तीर्थवासं सदा सेव्यमेकं
भजे पार्वतीवल्लभं नीलकण्ठम् ॥ ९॥

इति पार्वतीवल्लभ नीलकण्ठाष्टकं सम्पूर्णम् ।

https://youtu.be/ehd2G7x3EwU?si=i-E_gB1C18fTzADC

हो , छान आहे .

ऑडिओच्या बाबतीत गायिकेचं कौशल्य आहे आणि ज्या कोणी संगीतबद्ध केलं त्यांचं . पांडुरंगाष्टकमही गायलं आहे , वरच्या स्तोत्राएवढी कॅची ट्यून नाही पण 2 - 4 वेळा शांतपणे ऐकलं तर आवडेल आणखी असं वाटलं . या चॅनेलवरची चंद्रशेखर अष्टक आणि उमा महेश्वर स्तोत्र ही पण कालच ऐकली , छान आहेत .. सोबतच अर्थ लिहिला असल्यामुळे जास्त बरं वाटतं ऐकायला ..

उठा उठा साधू जन साधा आपुले स्वहित | जाईल जाईल हा नरदेह मग कैंचा भगवंत ||

कुंडलिनीचा वेढा काढुनि काकडा केला । सत्रावीचें धृत घेउनी पूर्ण भिजवीला

सद्‌गुरु वाक्याचा चिन्मय प्रकाश पडला । निश्चय काकडा नेऊनि तेथें पेटविला

निरंजन ओवाळूं जातां तद्रूप झाला । सद्‌गुरुप्रसादें अहंभाव निमाला

माया अविद्या एकत्र वळुनी काकडा केला । स्वरुपानुस्मरणें स्नेहामाजी भिजवीला ॥१॥

विवेकज्ञानाग्नि ज्वाळेवरि सहसा पाजळिला । पेटुनियां झगझगीत उजेड हा पडला ॥२॥

हे ज्या कोणी लिहिलं आहे , अशक्य सुंदर लिहिलं आहे .. काहीतरी अनुभव आलेल्या व्यक्तीनेच लिहिल्यासारखं वाटतं . पहाटे सहज गायल्या जाणाऱ्या आरतीत एवढ्या खोल अनुभवाचं वर्णन करून कवी मोकळा झाला आहे .

चांगलं संगीत देऊन कोणीतरी यांचं ऑडिओ मुद्रण करायला हवं , चांगल्या गायकांनी ... संस्कृत स्तोत्रं खूप लोकप्रिय होत आहेत , त्यामानाने मराठी अभंग , गवळणी आणि विपुल साहित्य दुर्लक्षित राहतं आहे , संगीतक्षेत्रातल्या लोकांना त्यातलं पोटेन्शल दिसत नाहीये . काही आहेत आणि त्यांना लोकांनी पसंती दिलेलीही दिसून येते , उदा . सांगावे कवण्या ठाया जावे , जुनं गीत आहे , त्याचं नवीन रेकॉर्डिंग खूप लोकप्रिय झालं .. बाकी मोठ्या प्रमाणात पोटेन्शल आहे पण मराठी संगीतक्षेत्रातील मान्यवर सध्या लाखात व्यूज मिळवण्याचं एकमेव ध्येय समोर ठेवून बोअर गाणी बनवत आहेत की काय असं वाटतं , जी एकदा ऐकून झाल्यावर पुन्हा 2 - 3 वेळा ऐकावी अशीही वाटू नयेत .. की लोकांना खरोखर तशीच गाणी आवडत आहेत , परमेश्वर जाणे ।

छान काकडारती आहे. शेजारती, काकडारती खूप काव्यमय, उपमांच्या लडी लडींनी लिहीलेल्या असतात.

आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता ।
चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥

वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥ १ ॥

पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती ।
ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥ आतां ॥ २ ॥

आशातृष्णा कल्पनांचा सांडुनि गलबला, स्वामी सांडुनि गलबला ।
दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥ आतां. ॥ ३॥

दैत्याचें कपाट लाउनी एकत्र केलें, स्वामी एकत्र केलें ।
दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडीले ॥ आतां. ॥ ४ ॥

भावार्थाचा मंचक ह्रुदयाकाशीं टांगीला, ह्रुदयाकाशी टांगीला ।
मनाची सुमनें जोडुनी केलें शेजेला ॥ आतां. ॥ ५ ॥

अलक्ष्य उन्मनि नाजूक दूशेला, स्वामी नाजुक दूशेला ।
निरंजनी सद्‌गुरू माझा निजी निजेला ॥ आतां. ॥ ६ ॥

जालावर फिरता फिरता अनेक सद्गुरुस्तोत्रे वाचनात येतात. काही कळतात बरीचशी कळत नाहीत. काही संस्कृत स्तोत्रांची गोडी भाषांतरात हरवते. पण बरेचदा योग जुळून येतो आणि एखादं अप्रतिम, अनवट स्तोत्र समोर येतं जे की जे मन उजळून टाकतं, एक दिव्य आनंदानुभव देऊन जातं. असं स्तोत्र वाचून वाटतं - अरे हेच वाचण्यासाठी आपण मराठी मातीत जन्माला आलो. हेच ते सर्वोच्च, सर्वांगसुंदर स्तोत्र. आता याहून अधिक पाहणे उरले नाही. हा अनुभव मला "विसरू कसा मी गुरुपादुकाला" वाचताना आला. हाच देजा वू अनुभव "गुरु।गुणालया।परापराधिनाथ सुंदरा।" हे स्तोत्र वाचताना आला. पण दर वेळेस परत दैवी कृपा होते आणि मी परत एखाद्या दिव्य स्तोत्रापाशी येऊन अडखळते.

यावेळेसही तेच झालं. जालावर फिरता फिरता हे अनवट सद्गुरू स्तोत्र वाचनात आलं. थोडसं मानसपूजा या प्रकारात हे स्तोत्र मोडतं. गुरुस भक्तीभावे अर्पण करावयाच्या त्रयोदशगुणी विड्याचे अत्यंत रसाळ वर्णन करणारे, सात्त्विक असे हे स्तोत्र आहे. त्रयोदशगुणीविड्यामध्ये पुढील १३ जिनसा वापरल्या जातात - चुना, कात, सुपारी, वेलदोडा, लवंग, बडीशोप, खोबरे, जायपत्री, ज्येष्ठमध, कापूर, कंकोळ, केशर, खसखस. साक्षात आपल्या सद्गुरुला विडा भक्तीभावाने अर्पण करायचा तर तो कशा प्रकारच्या अष्टसात्विक गुणांनी युक्त असावा याचे अत्यंत काव्यात्मक दर्शन या स्तोत्रामधून घडते.

शिष्याचा स्वतःचा देह हेच जणू विड्याचे पान आहे. या पानामध्ये विवेकाची सुगंधी केशर-कस्तुरी, वैराग्याची कात, भक्तीरूपी चुना-सुपारी, भूतदयेची पत्री, शांतीरूपी वेलदोडा, आणि सत्क्रिया-क्षमारूपी बदाम, खोबरं, कंकोळ आदी जिनसा घालून मोठ्या प्रेमाने अर्पण करण्यात येणार आहे.राजस पदार्थ हे सात्त्विक गुणांबरोबर कल्पिल्याने अतिशय आगळंवेगळं सौंदर्य लेवून हा विडा आपल्या समोर येतो.

विडा घ्या हो स्वामी गुरुराया| तूची विश्रांतीची छाया||
अर्पितसे स्वीकार कराया|समर्थ तू योगीराया||धृ||
देह हे पिकले पान|त्यात घालोनी सामान||
त्रयोदशगुणीपूर्ण|विडा झाला प्रेमळ भजन||१||
केशर कस्तुरी विवेक|वैराग्याचा त्यात कात||
चुना भक्ती ही सुपारी|पत्री ही भूतदया||२||
शांती ही वेलदोडा|समाधान जायफळा||
बदाम खोबरे कंकोळ|क्षमा लवंग सत्क्रिया||३||
बालक दासाचा हा दास|प्रसादाची करी आस||४॥

विडासेवन झाल्यानंतर सद्गुरुंच्या विश्रांतीचा समय भक्त कल्पितो. त्यांची शेज निगुतीने, अष्टसात्विक भावाने आणि अत्यंत प्रेमाने तो तयार करतो. सर्वात प्रथम वैराग्याचा कुंचा घेऊन चौक झाडून काढतो. त्यावर सत्प्रेमाचा शिडकाव करून नवविध भक्तीच्या पायघड्या घालतो. मंद अशा ज्ञानज्योतीच्या समया लावून, शेजेवर सुमनांची (श्लेष) पखरण करतो. कुठे दुर्बुद्धीच्या गाठींचे पडदे सोडून देतो तर कुठे साक्षात दया, क्षमा, शांती सामींची सेवा करण्यास तत्पर आहेत असे कल्पीतो. अशा रीतीने उन्मनी असे त्याचे स्वामी त्याने विणलेला अलक्ष भक्तीरूपी नाजूक शेला घेऊन निजले आहेत असे तो चिंततो.

Parvati Vallabh Ashtakam मस्तच वाटले . शंकरस्तोत्रांना एक मस्त लय असते.

शंकरस्तोत्रांना एक मस्त लय असते >> +१. साहित्यात ज्याला पदलालित्य म्हणतात, ते भन्नाट आहे शंकराचार्यांचं.

अरे हेच वाचण्यासाठी आपण मराठी मातीत जन्माला आलो. हेच ते सर्वोच्च, सर्वांगसुंदर स्तोत्र. आता याहून अधिक पाहणे उरले नाही >> same here .
सुरेख लिहिलं आहे .

गोंदवलेकर महाराजांची ऑडिओ स्वरुपातील प्रवचन - https://archive.org/details/lksjdoirukjbq3b230897512/apr01.mp3
स्पष्ट, योग्य वेगात आणि खूप छान, अस्खलित वाचन.
जिममध्ये रोज ऐकते आहे. फार फार आवडतायत. 'व्लॅल्युएबल ट्रेजर' - खजिना आहे.

सामो , या बाईंचे व्हिडिओ आधी पाहिले नसतील तर ट्राय द्या .. सेम खजिना फिलिंग झालं आहे माझं .. 10 - 20 च ऐकले आहेत अजुन ..

https://youtu.be/1AyPiG9P0jQ?si=TYHHkve-olO1LYdW

ही मनाच्या श्लोकांची प्ले लिस्ट

https://youtube.com/playlist?list=PLVzYNIuz0yQQJDaA0LtHCkLurAWZZTtMg&si=...

हे महाशय पण सुरेख बोलतात - अलीकडेच चालू केलं आहे वर्षभरापूर्वी वाटतं . 30 - 35 व्हिडीओ असतील , ऐकले सगळे .. खरं तर डोक्यात आत काही पोचायला अजून प्रत्येक व्हिडीओ किमान 15 - 20 वेळा ऐकावा लागेल , नाहीतर सगळं विसरून जात राहतं .. पण बोलण्याची शैली खुसखुशीत आणि गोड आहे , त्यामुळे ऐकले ...

https://youtube.com/playlist?list=PLMnWsWlpPZLMXnTVZdCEa7PppAhNOCp3M&si=...

>>>>>>सामो , या बाईंचे व्हिडिओ आधी पाहिले नसतील तर ट्राय द्या .. सेम खजिना फिलिंग झालं आहे माझं .. 10 - 20 च ऐकले आहेत अजुन ..

अगं काय सुरेख बोलतायत. मी ऐकते आहे.

ओहो.
वाटवे ताई
मस्तच.
अनेक वर्षांपूर्वीचे आहेत ते.
_/\_

https://samarthramdas400.in/content-type/?cat=145&sub_cat=110
इथेही आहेत, सुषमाताईंचे ऑडीओ. कल्याणी नामजोशी यांचे सुद्धा आहेत.

गोंदवलेकर महाराजांच्या गोड गोष्टी ऐकायच्या असतील तर इथे आहेत.
https://shrimaharajstories.blogspot.com/
आमची एक मैत्रीणच सांगते ते

गोंदवलेकर महाराजांची ऑडिओ स्वरुपातील प्रवचन >> मायबोलीकर किरू च पण चॅनल आहे युट्यूब. मस्त वाचतो तो ही..
अस वाटत महाराज असच बोलत असतील

खालील स्तोत्र मला कुठेही मिळालेले नाहीय जालावर आणि या वरच्या लिस्टीतही. कुणाला माहीती असल्यास संपूर्ण स्तोत्र इथे डकवाल का प्लीज? युट्यूब वर असेल तरीही चालेल, मी घेइन ते उतरवून.
माझी आजी हे म्हणायची आणि मला अंधूक अंधूक असं आठवतंय.

पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी, दयाळा अर्जी ऐकावी
म्हणोनी पायापाशी दत्ता अर्जी म्या केली
म्लेंच्छ राजा हीन जातीचा, नामे उद्धरीला, दयाळा नामे उद्धरीला इ. इ.

Pages