Submitted by स्वप्नाली on 17 January, 2010 - 21:58
रित्या माझ्या आभाळात,
चान्दण तुझ हव असत...
रोजच तुझ हसण सुद्धा,
माझ्यासाठी नव असत...
आठवणीत ढाळलेले रातअश्रु,
पहाटेच दव असत...
श्वासोच्छवासणार शरीर माझ
तूझ्याविना शव असत...
उजाड पसरलेल्या रानामधे,
तुझ-माझ हिरवळेल गाव असत...
प्रीत-जोगवा घाल सखया मजला,
सौख्य तुझ, मम सत्य, सुन्दर आणि शिव असत...
~स्वप्नाली...
गुलमोहर:
शेअर करा
जबरदस्त.......!!
जबरदस्त.......!!
एक्अदम सहि.....
एक्अदम सहि.....
वा व फर मस्त अहे कविता.
वा व फर मस्त अहे कविता.