आजचा खास मराठी बेत

Picture1.jpg
आजचा खास मराठी बेत.

तांदळाची भाकरी, पालकाची भाजी, शेपूची भाजी, कार्ल्याची भाजी, लसणाची काळी मिरी घालून चटणी, आणि खास पुणेरी आंबा बर्फी

Submit to kanokani.com

फोटो पूर्ण घेतला तर बर होईल .

तोंडाला पाणी सुटले. खरेच चवदार मेनू.

मस्त मेन्यु दिसतो आहे..तान्दळाची भाकरी कशी करतात ? आणि जमले तर चटणीची पन रेसिपी द्या

शेपूची भाजी आणि कार्ल्याची भाजी एका वेळी एके ठिकाणी????? बापरे !!

आर्च, ती आंबा बर्फी सोडली तर बाकी सगळं अगदी झकास! भाकरी तर फारच छान दिसतेय!

वा...मला शेपूची भाजी, पालकाची भाजी नी भाकरी फक्त हवी. स्मित कारल्याची उद्याला खाईन फ्रीजमध्ये ठेवून एकाच वेळी खाण्यापेक्षा.( आपल्याला असे कोणी ताट देतच नाही.. स्वता केल्याशिवाय असे जेवण मिळत नाही शिवाय आईने दिल्याशिवाय)

लंच टाईम..... !

तांदळाची गरम गरम भाकरी मस्त लागते .

भाकरी मस्तच ग आर्च, शेपूची भाजी खूपच वेगळी दिसतेय.

वा. वा. झकास बेत.

हं वाढ पाहु आता, खुप भुक लागलीय. स्मित

भाकरीवर तूप घालयस का? कसलि चमकतेय!!!

व्वा काय बेत आहे..............मस्तच. पण ती लसूण मिरीची चटणी .....कशी केलीस?

वाह! भाकर्‍या एकदम खास. मानुषीचा प्रश्न रीपीट. लसणाची चटणी यो. जा. टा.

वा!!!!!

आर्च, मलाही ती लसून मिरीची कृती हवीये.

आर्च,
तोंपासु, मस्त बेत केलात की एकदम.. स्मित
अगदी इथून उठुन थेट ताटावर बसावसं वाटतंय..

अरे वा! आवडला का बेत. या सगळे. अंगत पंगत करुया. स्मित

ताट खाऊन संपवले काय ? माझ्यासाठी थोडे ठेवायचेत की अरेरे

आर्च, फोटो दिसत नाहीये.

काय मस्त दिस्ताहेत सगळेच पदार्थ! मला भाकरी आणि चटणी पुरे!

ए मलापण काही दिसत नाहीये.ताट-वाटी घासून पुसून ठेवली काय?

सगळ्या खादाडांनी संपवल्. मला पहायला पण नाही मिळाल अरेरे

अरे रे, मल पण दिसत नाहीये अरेरे

आता उघडा बरं डोळे. स्मित

दिसलं की राव, लै बेस ...

वा,वा काय मस्त मेन्यू ! तुझ्याकडे भाकरी शिकायला येऊ मी ? करायला जमली नाही तर खायला तरी मिळेल डोळा मारा

आहाहा.. डोळ्यांच पारण फिटल स्मित

आत्ता कसं...मस्त वाटलं!!

मस्त बेत.

बेत फार मस्त आहे. भाकरी माझी तर फेवरेटच... तोंडाला पाणी आलच,,
पण एक सांगू का.... मस्त ताटाशेजारी जर मस्त गार पाण्याचा तांबा असणे तितकेच जरूरी आहे.. हो की नाही.. त्याशिवाय तर जेवण अपुर्णच...
राग मानू नका ह...

मस्तच बेत आहे