Submitted by shashank pratapwar on 8 January, 2010 - 11:23
तुझ्या नसण्याने
बदललय काही
अंतरी रुजलेल
उध्वस्त काही.
तुझ्या नसण्याने
उमजतय काही
ओढ़ जिवाची
अस्वस्थ काही.
तुझ्या नसण्याने
हरवलय काही
दिशाहीन झाले
मार्गस्थ काही.
तुझ्या नसण्याने
संपवलय काही
उरलय निष्प्राण
तटस्थ काही.
- शशांक प्रतापवार
गुलमोहर:
शेअर करा
शशांक, अरे आहेस कुठं
शशांक,
अरे आहेस कुठं बाबा?
इतका उदास का झालायस?
एकदम गंभीर कविता केलीस. आवडली, पण विचारात पडलोय.
अरे बरा आहे मित्रा....उदास
अरे बरा आहे मित्रा....उदास वगैरे काही नाही असच सहज कविता केली....:)
छान कविता..!!
छान कविता..!!
छान शशांक.....थोडी रिफाईन
छान शशांक.....थोडी रिफाईन केलीस तर आणखी छान होईल...
उध्वस्त,अस्वस्थ्,मार्गस्थ्,तट
उध्वस्त,अस्वस्थ्,मार्गस्थ्,तटस्थ हे शब्द वापरून मनस्थिती छान प्रकट झालीय.