खरेसाहेब…माफ़ करा : ४ : दिवस असे की …

Submitted by विशाल कुलकर्णी on 7 January, 2010 - 07:10

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!

सावकारांच्या कर्जाखाली बुडतो…
आयुष्याला तारण ठेवूनी देतो,
या जगण्याचे कारण उमगत नाही..,
या जगणे म्हणवत नाही…..

व्याजाचे हे एकसंधसे तुकडे…
मम छाताडावर नाचे त्याचे घोडे,
या घोड्याला लगाम शोधत आहे,
परि मजला गवसत नाही…..

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!

मी गरीब की मी दुर्दैवी कमनशिबी…
परि जगावयाला शोधू पाहे सबबी,
दुर्दैवाला हजार टाळू बघतो…
परि ते पिच्छा सोडत नाही…

येतो म्हणताना ओठ कापती थोडे…
तू मिटून घे पिल्लांचे माझ्या डोळे,
देहाचे अन मम, पदराला तुझीया
हे ओझे पेलवत नाही …. !

ऋण इतुके की कोणी माझा नाही
अन मी कोणाचा नाही …!

त्या दुर्दैवी जिवांसाठी काहीही करु न शकणारा एक असहाय सामान्य माणुस !

ईशल्या देणेकरी

गुलमोहर: 

या विडंबनामूळे खरेसाहेबपण माफ करतील>>>>

विशाल, एव्हढं खतरनाक विडंबन मी वाचलेलं नाही !
फ़ोटोजसहीत प्रेंझेटेशेनची कल्पना उत्तमच !

-अजुन एक देणेकरी! Sad

विशल्या खासच रे. रडवलस सकाळी सकाळी

कर्ज चुकवण्या शोधतो शेकडो सबबी,>>>>इथे बघ ना एखादा सह्ब्द वगैरे बदलता आला तर, जरा लयीला खटकतय

विश्ल्या
कालंच तुझ्याकडून आलेल्या मेल मध्ये वाचलं होतं हे विडंबन. चांगलं तरी कसं म्हणू? Sad
काळजाला घरं पडली विडंबन वाचून...