कोकोनट सिटी ऑफ चायना-'हाय खौ'

Submitted by वर्षू. on 2 January, 2010 - 22:02

हायनान प्रॉव्हिन्स ची राजधानी असलेलं ,'हाय खौ' चा लिटरल अर्थ आहे,'समुद्राचं मुख'. या शहराला तीन बाजूंनी साऊथ चायना सी आणी पै पु बे नी वेढलेले आहे. लांबच लांब समुद्र किनारा, असंख्य बीचेस लाभलेल्या या शहरात नॅशनल सेलिंग आणी सर्फिंग च्या स्पर्धा होतात.
स्वच्छ हवेसाठी प्रसिद्ध असलेलं हाय खौ च्या मोकळ्या रस्त्यांवर खुशाल सायकली भाड्याने घेऊन मस्त रपेट करावी.किंवा हॉटेल्च्याच प्रायव्हेट बीचवर किन्वा स्वीमिन्ग पूल वर दिवस च्या दिवस स्वस्थ घालवावा. मस्त पुस्तकं वाचायला बरोबर न्यावीत्.दोन दिवसात टोटल रिलॅक्स होण्यासाठी हे एक उत्तम स्थान आहे.. जमलं तर गाणही गुणगुणावं..'बैठे रहे..तसव्वुरे जाना किये हुए..'

इथलं अर्थातच सी फूड फार प्रसिद्ध आहे.उकडलेले जायंट स्नेल्स (गोगल गाय??),हेअरी क्रॅब्स (केसाळ खेकडे Happy ),यांबरोबर कलिंगडाच्या सालीबरोबर एकत्र शिजवलेले लॅम्ब,मस्टर्ड्,जॅम्,लिंबाचा रस लावलेले रोस्टेड ऑईस्टर्स, रोस्टेड डक- (या डक्स ना ते डकलिंग असताना लहान कोळबी,लहान मासे,गेंडूळं खायला देतात. थोडे मोठे झाल्यावर त्यांच्या अ‍ॅक्टीव्हीटीज जरा नियंत्रित करतात आणी भात इ. पदार्थ खायला घालतात्.त्यामुळे वीसेक दिवसात चांगलं फॅट्स नी भरलेलं डक तयार होतं. मग त्याला भाजून खातात.) पण फेमस आहेत. याशिवाय बांबूच्या पोकळीत शिजवलेला इकडला खास ,सुगंधित तांदूळाचा भात फार छान लागतो.बांबूच्या पोकळीत भात भरून ,दोन्ही बाजूंनी केळ्याच्या पानानी बंद करुन कोळश्यावर भाजतात. शिजल्यावर बांबू ला दोन तुकड्यात कापतात्.आणी सर्व करतात.
याशिवाय इकडली फळं आंबे,अननस,शहाळी,फणस ,क्रॅम्बोला, चीकू,लोन्गान्,लीची,सुपारी,पॅशन फ्रूटइ. ही चवीला अनोखी आहेत.
हो..शेवटी थोडसं.. हाय खौ हून साडे तीन तासाच्या ड्राइव्ह वर सान्या आहे..दी फेमस सान्या बीच जिथे आतापर्यन्त २ वेळा मिस युनिव्हर्स ची स्पर्धा योजण्यात आलीये..haikou-1.jpg
ऑन द बीच

haikou-2.jpg
संध्याकाळचा समुद्र

haikou-3.jpg
होउ रु(चायनीज रामशास्त्री प्रभुणे) ची कबर

haikou-4.jpg
दुतर्फा असलेली नारळाच्या झाडे

haikou-5.jpg
पिज्झा आहेच की इकडे

haikou-6.jpg
स्वीमिन्ग पूल

haikou-9.jpg
ऑइस्टर

haikou-8.jpg
मोठाले मासे तोंडात संत्री ठेवलेले..

haikou-11.jpg
अजून सीफूड

haikou-12.jpg
मोकळं बीच

haikou-13.jpg
हेच ते क्षितिज?

haikou-14.jpg
शांत बीच

haikou-15.jpg
रोस्ट करून पाहते.. ऑइस्टर्स

haikou-16.jpg
हाय् खौ सिटी

haikou-17.jpg
एअरपोर्ट हाय खौ

haikou-19.jpg
हॉटेल शेरेटन हाय खौ

गुलमोहर: 

चायना: अनएक्सप्लोरड ब्यूटी अशी लेखमालिका सुरु करा ना. खरच छान वाटेल वाचायला.

नावांना अर्थ असणं हि आशियाई देशांची खासियत (फक्त आशियाई का इतरही ?). तुमच्या लिखाणातून तीही माहिती येत्येय. मस्त लेख..... Happy

अम्या रविवार्च्या सकाळी सकाळी आलास की माबो वर..आजकाल मीपण इकडेच पडिक असते..दिवसभर!! कायतरी सुरु करते चायना बद्दल ..माहितीपूर्ण पण इन्टरेस्टिन्ग.. काही विषय सुचव बरं

विषयच सुचवायच्येत ना, हा.का.ना.का.

१. विविध प्रातांतल्या खाद्यसंस्कृती आणि पाकप्रक्रीया. त्यातला फरक आणि साम्य.
२. तिथली शिक्षणपद्धत.
३. राजकिय इच्छाशक्ती आणि त्याची फळे.
४. सांस्कृतिक बदल आणि समाजाच्या त्यावरिल प्रक्रिया.
५. व्यापार करतानाचे तुमचे अनुभव.

आत्ताच्या आत्ता तिथे जायचे मला (एक भोकाड पसरलेली बाहुली)!

मस्तच गं वर्षू!
रच्याकने, माझ्या ईथल्या एका मैत्रीणीचे (ऑझी) एका इंग्रजी अजिबात न येणार्‍या चिनी माणसाशी लग्न झाले आहे. (तिला मँडरीन येते उत्तमपैकी). ती ४ वर्षे त्याच्याबरोबर त्याच्या गावी कुटुंबाबरोबर रहात होती. अलिकडेच ते लोक कायमचे ईकडे आले आहेत. तिच्याशी अजुन निवांत गप्पा झाल्या नाहीत पण वर्षु दाखवत असलेला चिन बघुन मला असे वाटते आहे की ती मैत्रीण त्याच्या बरोबरच चिनच्याही प्रेमात पडली असणार!

चीन आहेच तसा, प्रेमात पडण्यासारखा. सुस्तावून पडलेला ड्रॅगन, पण जेव्हा आळस झटकून उठतो तेव्हा त्याच्यासारखा धोका नाही दुसरा....

मस्त वर्णन आणि सुंदर फोटो!

येतांना आमच्याकरता बांबुतला भात/ त्याचे साहित्य घेऊन या.

http://nvgole.blogspot.com/2008/11/blog-post.html#links
या दुव्यावर आपल्या भारतातील "समुद्रमुखा"चे वर्णन वाचा.

इथे मी प्रतिक्रिया क्वचितच देते. पण तुमचे लेख नियमित वाचत असते. वर सुचवल्याप्रमाणे वर्षु खरच लेखमाला सुरु करा. तुमच्याकडे खुप काहि आहे सांगण्यासारखे चिनी संस्क्रुतीबद्दल.

खुपचं सुंदर फोटोज आणि वर्णन सुद्धा .
वर्षु नील , खरचं अमित म्हणतोय तशी एक लेखमालिका सुरु करा , आणि हो फोटो पण भरपुर टाका . Happy

सर्व मित्रमंडळी चे खूप खूप आभार. तुम्ही सर्वांनी वेळेवेळी दिलेल्या प्रोत्साहना ने मला लिहायचा अजून हुरुप येत आहे..(कोण म्हणाले रे,' अरे बापरे!!!" Proud )
jokes apart!! मला खरच सर्वांना चीन बद्दल अजून सांगायला आवडेल. या डिसेंबर मधे आम्हाला ९ वर्ष पूर्ण झाली बरं इकडे येऊन.. २०१० मधे १० वर्षं वं वर्ष सुरु झालं आणी तरी अजून या देशाबद्दल पहिल्या दिवशी वाटलेली उत्सुकता आत्तापर्यन्त यत्किंचीत ही कमी झालेली नाही. रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत असतं.
अम्या नी सुचवलेले फक्त पोलिटिकल विषय सोडून बाकीचे विषय हाताळण्यासारखे आहेत..

१७.०६.२००६ चे फोटो वर्णनासहित अत्ता येतायत म्हणजे आम्हाला अजुन चायनाबद्द्ल बरिचशि नविन माहिति फोटोसहित वाचावयास मिळेल.

मस्तच. पहिला बीचचा फोटो पाहून पटाया आठवलं. Happy
बाकी (अजून न चाखलेल्या) सी-फूडबद्दल माहीत नाही, पण का कोण जाणे ऑयस्टर मला नेहमी चाखून पहावेसे वाटतात. (डिस्कवरी, नॅट-जिओ इ. वर जेव्हा जेव्हा रोस्ट वगैरे होताना दिसतात तेव्हा)
प्रकाशने विचारलेला प्रश्न फोटो पाहिल्या पाहिल्या माझ्या पण मनात आला होता Lol
(लेखाच्या शीर्षकावरून सुचलेला एक पीजे : हाय खाऊ नका, हाय-खौला जा, ताजे तवाने होऊन परत या... Proud कै-च्या-कै)

<< पिझ्झाच्या शेजारी कसली बाटली आहे....हां ?? >> आणि मला अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसल्याचा किस्सा खोटा वाटायचा Wink Light 1

लले, खरच खायच्येत का ऑयस्टर्स ?

छान वर्णन... चीन म्हणल्यावर बीच कधी डोळ्यासमोर येत नाही!
तुम्ही काय काय सी-फूड खाल्लं? का पिझ्झा-फ्राइज जिंदाबाद?