आजकाल टिव्ही ने सगळ्या मुलांच जग व्यापलय. टिव्ही वरचे कार्टून, पिक्चर्स , जाहिराती हे जणू त्यांच विश्वच बनलय. आजकालचे पालक ही अगदी तक्रार कम कौतुकाने सांगत असतात, आमचा बाळ्या ना रात्री टॉम अँड जेरी पाहिल्या शिवाय झोपतच / जेवतच नाही .
हल्ली मुल एकेकटीच असतात, चार मुलांबरोबर जमवुन घेऊन खेळताना त्यांना बराच त्रास होतो, कारण घरी सगळे त्याचच ऐकतात, त्यामुळे बाहेर मनाप्रमाणे झाल नाही तर त्यांच लग्गेच बिनसत.
ह्या सगळ्यावर उपाय म्हणून आम्ही एक प्रयोग करायच ठरवल होत.
मुलांच लक्ष जर त्यांच्या आवड्त्या गोष्टी कडे वळवल तर त्यांना टिव्हीची आठवण पण होत नाही. त्यांना भरपूर पसारा करु दे, हवे ते रंग ,कागद,खेळणी भरपूर मनसोक्त वापरु दे ,त्यांना टिव्ही लावायची इच्छा पण होणार नाही.
मुलांना अभ्यासा व्यतिरिक्त एक तरी छंद/ कला/आवड आपल्या मनाप्रमाणे जोपासता यावी हे खूप गरजेच आहे, ही जाणीव सतत अस्वस्थ करत होती. सगळी मुल क्लासला जातात, पेटी, तबला, खेळ ,अभ्यास, नाटक शिबीर, असे अजुन असंख्य क्लासेस. पण ते बहुदा पालकांच्या आवडीचे असतात. त्यांच्या मना प्रमाणे काही करण्यासाठी एक दिवस तरी त्यांना मिळावा ह्या संकल्पनेतुन हे शिबीर करायच ठरवल
ह्या ख्रिसमस च्या सुट्टीत आम्ही एक प्रयोग केला.
बिल्डींग मधल्या १०/११ मुलांना २४ तारखेला संध्याकाळी एकत्र जमवल आयांसकट आणि २५ तारखेला एक कल्पक शिबीर घेणार आहोत ही कल्पना दिली. त्यात काही अटी हे ठेवल्या, मुलांनी काहीही साहित्य बरोबर आणायच नाही, जे उपलब्ध साहित्य असेल त्यातुन सगळ्यांनी शेअर करुन आपापल्या आवडीच्या वस्तु, चित्र ,पेंटींग्स जे हव ते बनवायच आणि कुठल्या ही प्रकारे कोणी ही काही ही तक्रार करायची नाही, मला हा / ही पेन्सिल देत नाही, पट्टी देत नाही इ इ. वयोगट होता ९ ते १२ वर्ष.
बरोब्बर दोन वाजता सगळे जमले, आया आपाप्ल्या घरी, सगळ साहित्य एका कोपर्यात ठेवल होत त्यात भरपुर क्रेयॉन्स, वॉटर कलर्स , पेपर्,पेन्सिल्स, इरेझर ,फेविकॉल, मणी टिकल्या, बीडस , क्रेप पेपर, सिरॅमिक क्ले,पॉटस, ग्लिटर्स, ब्लोपेन्स इ इ सगळ.
सुरवातीला मुलांचा सगळ साहित्य बघण्यात वेळ गेला, मग प्रत्येकाला ह्या वस्तु वापरुन काय काय बनवता येइल / बनवायला आवडेल हे ठरवायला सांगीतल .
थोड्यावेळातच मुलांनी हॉलला मासळी बाजाराच स्वरुप दिल, भांडाभांडी, मारामारी, ओढाओढी, मुलच ती शेवटी. मी सगळ गोळा केल आणि सांगीतल प्रत्येकानी आपाप्ल्या घरी गेल तरी चालेल ही अॅक्टीव्हीटी क्रिएटीव मुलांसाठी आहे, भांडकुदळ मुलांसाठी नाही. जरा त्यातल्या त्यात मोठ्या मुलांना बहुतेक काहीतरी चुकल्याच जाणवल असाव, मग सॉरी मावशी, सॉरी मावशी म्हणत सगळ्यांनी गराडा घातला.
मग पुन्हा सगळ साहित्य लाऊन ठेवल, आणी त्यातुन मुलांनी आणि माझ्यालेकी नी ही काही मस्त वस्तु बनवल्या. विंड्चाईम, ग्लासपेंट नी केलेल फुलपाखरु,ख्रिसमस ट्री, सिरॅमिक माती पासुन बनवलेले काही मॉडेल्स, पॉटरच्या मदतीने बनवलेल्या पॉटवर केलेल रंग काम. एक ही मुल अस नव्हत ज्याला ह्या गोष्टी वर्ज्य होत्या किंवा आवडत नव्हत्या.
हे काही फोटोस
हे सिरॅमिक क्ले वापरुन बनवलेले काही आकार
हे कागदाच ख्रिसमस ट्री
हे पॉटरच्या सहायाने बनवलेल्या पॉट वर केलेल रंग काम
हे रफ कागद वापरुन बनवलेल विंडचाइम
बूक मार्क्स
६ / ७ वाजे पर्यंत मुलांनी एंजॉय केल,मधे मधे ,गाणी, गप्पा,गोष्टी, जोक्स पण होते तोंडी लावायला
मुलांना ही "आर्टटॅटॅक "ची कल्पना खुप आवडली. पुन्हा पुढच्या आठवड्यात त्यांनी अस शिबीर करायच प्रॉमिस घेतल माझ्याकडुन. (आर्टटॅटॅक हा एक टीव्ही वर लागणारा लहान मुलांचाच कार्यक्रम आहे :फिदी:)
मुलांच डोक रिकाम न ठेवता सतत काही तरी खाद्य पुरवल पाहिजे,त्यांना विचार करायला भाग पाडल पाहिजे नंतर ह्याची त्यांना सवय होऊन ते आपसुकच टेव्ही पासुन परावृत्त होऊन नक्कीच काहीतरी क्रिएटीव्ह करतील. त्यांना सांगायची ही गरज लागणार नाही. फक्त गरज आहे त्यांना तुमचा थोडा वेळ देण्याची ,त्यांच ऐकुन घ्यायची, आणि त्यांना मनात येइल ते करु द्यायची .
१५ दिवसातुन एकदा जरी ह्या प्रमाणे वेळ काढला तरी मुल क्रिएटिव्ह बनवायला नक्की हातभार लागेल.
मुलांच्या डोक्यात ही खुप भन्नाट कल्पना असतात त्याला वाव मिळेल.
त्यातुनच आपल्यालाही कितीतरी गोष्टी मुलांकडुन नव्याने माहिती होतील तसच अपल्याकडच्या ही बर्याच गोष्टी आपण मुलांना देऊ/ शिकवु शकतो हे प्रकर्षाने जाणवेल.
हे सगळ इथे लिहायचा उद्धेश म्हणजे, तुम्ही जर करुन बघीतला नसेल हा प्रयोग तर नक्की करुन बघा
२९ तारखेला आम्ही अजुन एक शिबीर घेतल ज्यात मुलांसाठी - क्रिएटीव्ह थिंकिंग आणि त्या अनुषंगाने येणारे गेम्स, पझल्स, स्लाईडस, अस बरच काही होत. ते ही मुलांनी खुप एंजॉय केल, कारण कुठे ही त्यात अभ्यासाच नाव नव्हत, स्पर्धा नव्हती तरी अभ्यासाला उपयुक्त सर्व काही होत.
त्या बद्दल पुन्हा कधी तरी....
एकदम झक्कास उपक्रम, स्मित्स !
एकदम झक्कास उपक्रम, स्मित्स !
खूप मस्त फोटो! अगदी लहान
खूप मस्त फोटो! अगदी लहान मुलांनी त्यात घेतलेला आनंद दिसावा इतके. स्मिता, खूप छान!
त्या मानाने स्मिता तू आणि ती मुलं लवकरच जागी झालात!

आमच्या ऑफिसच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध क्रीडा, कला या स्पर्धांमध्ये अगदी या 'आर्टअॅटॅक' चाही अंतर्भाव होता. पुन्हा एकदा लहान होऊन ते सगळं करताना इतकी मजा आली!असं वाटलं, "याची इतकी गरज होती ; तर आपण या आधी का नाही केलं हे? "
स्मिता, मस्त उपक्रम. माझ्या
स्मिता, मस्त उपक्रम. माझ्या आधीच्या कंपनीत दरवर्षी ख्रिसमसला जिंजर ब्रेड डेकोरेशन असायचे त्याची आठवण झाली. आम्ही सगळे मोठे अक्षरश: मुलांचे असिस्टंट म्हणुन काम करायचो आणि मुलं इतकी सुंदर सुंदर डेकोरेशन करायची
मस्त आयडिया , पुढील उपक्रमाला
मस्त आयडिया , पुढील उपक्रमाला हार्दीक शुभेच्छा.
Pages