मिसळपाव करता करता

Submitted by जागोमोहनप्यारे on 29 December, 2009 - 00:59

मिसळपाव करता करता सांडलवंड झाली
अरे पुन्हा चायनीज खाण्या बायको निघाली.

आम्ही चार पावांचीही आस का धरावी
जी मिसळ सांडे त्याची वाट का पहावी?
कसा गॅस उसळकटाच्या सांडतो पखाली..

कपाटात केले कुणी बंद घुशी साती
मीठतिखट सांडून झाले पहा धूळमाती
उरे चायनीज, उडपी एकमेव वाली

उभा किचनकट्टा झाला एक कार्यशाळा
इथे फरसाण्याचा चुरा पायाने लवंडला
कशी प्लेट दुर्दैवी अन घूस भाग्यशाली

धुमसतात अजुनी विझल्या जिर्‍याचे धुपारे
नवे खाद्य मागत उठते 'अर्धांग' हे सारे
हॉटेलची बिले ही आता पहा खिसा जाळी

गुलमोहर: 

उभे स्वयंपाकघर हे झाले एक कार्यशाळा
इथे फरसाण्याचा चुरा पायाने लवंडला>>>>>>>>> या ओळी जरा सुधारता येतात का पहा..... बाकी सगळे अंतरे चपखल बसले आहेत

उदा: स्वयंपाकघर हे झाले पाक कार्यशाळा
होता नव्हता फरसाण सारा धुळीला मिळला
असं काही होत असेल तर बघा..... बाकी निर्ण्य तुमचा आहे Happy

स्वयंपाकघर हे झाले पाक कार्यशाळा
होता नव्हता फरसाण सारा धुळीला मिळाला
कशी प्लेट दुर्दैवी अन घूस भाग्यशाली...

धन्यवाद वैभव.. :).

( उभे स्वैपाकघर हे झाले एक कार्यशाळा
होता नव्हता फरसाण सारा धुळीला मिळाला
कशी प्लेट दुर्दैवी अन घूस भाग्यशाली...

हेदेखील चालू शकेल... )

आधी मी काहीतरी पाककृती असेल म्हणून वाटेला गेले नाही , म्हणजे काही टीप्स वगरे असतील मि पा करतानाच्या अस वाटल Proud
पण ही मिसळपाव खर्‍या मिपा पेक्षा भारी निघाली मस्तच Rofl

उभा किचनकट्टा झाला एक कार्यशाळा.

हेदेखील मिटरमध्ये फिट होते. आकारांत शब्द मात्रेत व्यवस्थीत बसतात. ( 'उभा देश झाला आता एक बंदिशाळा...' )

जामोप्या...आणखी एक खतरनाक विडंबन...ऑर्कुट वरच्या कम्युनिटी वरची पोस्ट आहे....

उषा काल न्हाता न्हाता...
शॅंपुवरुन पडली...
आज तरी उचला तीला...
सरकवुन बादली...

मोरीभर साबणाचा या
वास कोंडलेला...
ना कधीच धुतला असा
फेस सांडलेला...
सभोवती... 'सनसिल्काची' ...........
पाकीटे ही खाली
आज तरी उचला तीला...
सरकवुन बादली...

मिरवतात भिंती इथल्या...
सेंटचे फवारे
अर्धमेल्या दारांवरती...
सडलेले पत्रे
आरशावर...टिकल्यांची..............
नक्षी ही मिळाली
आज तरी उचला तीला...
सरकवुन बादली...

नवा ड्रेस होता ओला
तिचा टांगलेला
छतावरी कोळ्यांनी ही
संसार मांडलेला
लाकडांचे कोळसे अन्.................
तपेली ही काळी
आज तरी उचला तीला...
सरकवुन बादली...

उषा काल न्हाता न्हाता...
शॅंपुवरुन पडली...
आज तरी उचला तीला...
सरकवुन बादली...
-----------------------------------------------------------------------
मंदार चोळकर

मेरे प्यारे जागोमोहन भाय,
बहुतच्य खाश लिख्खा...!!
आता रुकायच नाही.... पुन्हा लिहा...!!
पुलेशु.
-------------------------------------------------
प्रतिसाद लिवता लिवता, दमछाक झाली,
अरे कोणी ओता पाणी,विझवा या मशाली...!!
-------------------------------------------------
का अग्निशामक बोलवायचं ?

Happy

धुमसतात अजुनी विझल्या जिर्‍याचे धुपारे
नवे खाद्य मागत उठते 'अर्धांग' हे सारे
हॉटेलची बिले ही आता पहा खिसा जाळी

वा...व्वा...व्व्वा...व्व्व्वा,
जागो मोहन प्यारे...छानच आहे.

मात्र विडंबनाची साथ-बिथ काही नाही ;याचे खरे कारण http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=826350&tid=5419712299193382636
इथे आहे.

मेंबर कसे व्हायचे याचे? मला ओर्कुट रिप्लाय विंडो येत नाही... मला ओर्कुटवर इन्वायट कराल का? सर्च मध्ये gajanan kagalkar टाइप करा... माझा प्रोफाय्ल मिळेल.

सहीच Biggrin

'पाव' दिसला म्हणून आलो, तर आमच्याआधीच इथे घुशींचा उपद्रव. Uhoh जिकडे बघावे तिकडे मेल्या मढ्याच्या हाडकांसारखी विडंबने विखरून पडलीहेत. आवडत नाही लोणचे, नाहीतर घातले असते. पण मग काय करावे? Sad

Pages