मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले

मूळ कविता : मेघ नसता वीज नसता
मूळ कवी : संदीप खरे

मेघ नसता, वीज नसता, रोड बिघडू लागले
जाहले रस्ते नवे तेथे उकरणे चालले!

(रस्ता रोडरोलरला म्हणतो)
जाडसर चाकावरी का काळसरसा लेप हा?
तू मला ’रोलून’ बघताना तुला मी पाहिले!

एवढे नाजूक आहे वय तुझे का डांबरा?
मुंगळेही डांबरावर भार वाटू लागले

लाख रस्ते मारण्याचे, यम तरीही हळहळे
सापळे सारे कसे एकाच शहरी लावले!

चालताना रंग उडुनी होई चेहरा पांढरा
तेच ते ड्रेनेज उघडे बघ सुगंधू लागले...

भर पहाटे मी खडीनी दृष्ट काढुन टाकली
खोदती रात्री तुला जे, भय तयांचे वाटले

- प्रसाद
www.sadha-sopa.com


मस्त प्रसाद! मूळ गाण्यातलेच शब्द खास वापरलेस..

चालताना रंग उडुनी होई चेहरा पांढरा
तेच ते ड्रेनेज उघडे बघ सुगंधू लागले...

भर पहाटे मी खडीनी दृष्ट काढुन टाकली
खोदती रात्री तुला जे, भय तयांचे वाटले

हीहीहीही...



सही झालीय.
>> तू मला रोलून बघताना
फिटं बसलंय एकदम स्मित



झकास!!!
मार्तन्ड.



एवढे नाजूक आहे वय तुझे डांबरा
LOL !!
मस्त जमलिये प्रसाद !



>> भर पहाटे मी खडीनी दृष्ट काढुन टाकली
क्या बात है, प्रसाद स्मित



कविता आवडली. नवीन शब्द सुध्दा आवडले.

प्रा.(इं ) सुरेश खेडकर.(नागपूर)