सदस्य प्रवेश |
आज्जीचा बत्तासा.. (फक्त छोत्या पिल्लांसाठी)आ़जी ने दिला बत्तासा वर आभाळात फेकला वाटत रोज चोरुन बप्पा, माझा बत्तासा खातो हळुहळू करत त्याने एकदा सगळाच गटम केला आजीच नाव घेताच एकदम घेला घाबरुन बप्पा बिच्चारा एकच बत्तासा पुरवुन पुरवुन खातो
आज्जी म्हणाली.. अर्धा पण खात नाहीस पण रोज दोन बत्तासे मागतोस अगं आज्जी.. आज्जी देत नाही म्हणुन हा रोज चंद्र खातो हा.. हा घाबलला... -सत्यजित |
छोत्यांसाठी का मोठ्यांसाठीही चालेल की. छान आहे कविता.
मस्तच कविता रे सत्या.
)
पण काहीच्या काही कविता कशासाठी बर म्हटलय
)
आवडली कविता.. बालगीताला हवी तशी निरागस आहे
सत्या मस्त कल्पना आणि बालगीतही एकदम गोड आहे..
visit http://milindchhatre.blogspot.com
मस्त नाटुकलं होइल रे हे , पिल्लांसाठी
आवडलं
एकदम छान लिहिलंय. लहानपणी शाळेत असताना 'चंद्राच्या बदलत्या कला' ही संज्ञा पक्की व्हावी म्हणून आम्हाला 'चांदोबाचा अंगरखा' ही गोष्ट सांगितलेली बाईंनी, त्याची आठवण झाली ही कविता वाचून.
कित्ती मस्त कल्पना. आणि शब्द पण फार छान आहेत. शेवटचं वाक्य म्हटलं की मग तर छोट्याचा गालगुच्चा नक्की.
सत्यजित, कसलं गोड लिहिलं आहेस रे!! एकदम मस्त!!
सत्यजीत
इतकी गोड निरागस कविता...पिल्लेच नाहीत...आम्ही मोठ्या पिल्लांनी पण खूप मजा घेतली...काहीच्या काही नाही हं...
दीपिका जोशी 'संध्या'
मस्त निरागस कल्पना. माझ्या आजीकडुन एक उखाणा ऐकला होता. सुपभर लाह्या आणि मधे बत्तासा, त्याची आठवण झाली.
तुम्हा सगळ्यांचे खुप आभार !!! आभाळतला चंद्र बघताना निरगस डोल्यातल कुतुहल काही केल्या शब्दात मांडता येत नाही... देवबप्पा ही आपण रुजवलेली कल्पना आणि त्या बद्दलची पिल्लांची अत्मियता मला थक्क करते म्हणुन हा प्रयत्न. अजुन एक जुनी कविता येथे पोस्त करतो. आणि काही जुन्या बालकविता इथे सापडतील,
http://satyajit-m.blogspot.com आवडल्या तर नक्की कळवा...
मोठ्ठा पाउस लागला
धो धो पडायला
आभाळातला देवबप्पा
लागला असेल रडायला
देवबप्पाने हट्टाचा
लावला असेल सपाटा
मग बप्पाच्या आईने
घातला असेल धपाटा
जोरात रडला देवबप्पा
आणि नद्या लागल्या वहायला
बप्पाला हसवायला
वारा लागला गायला
रडताना काढला फ़ोटो
म्हणून देवबप्पा चिडला
धडामकन आवज करून
आभाळातच पडला
पाणीच पाणी चोहीकडॆ
शाळेला दिली सुट्टी
तेव्हा पासून बप्पाशी
माझी जमली आहे गट्टी . . .
-सत्यजित
पाउस... मला फार आवडतो.
अगदी गोड आहे बडबडगीत.
सत्यजित फारच गोड आणि निरागस झालीये कविता..... !
पावसाचं गाणं पण खूप सही आहे......छान बालगीत होईल
आज सगळे जुने थ्रेड्स वाचतेय... खुप्पच गोड लिहितात तुम्ही. छोट्यांना नक्कीच आवडेल असे
-प्रिन्सेस...