माणूस

Submitted by अज्ञात on 28 November, 2009 - 01:14

भूक माणूस,
चूक माणूस,
भावनांच्या महाली,....
माणूस,......
माणूस !

ऊन पाऊस हिव वारा; जाणिवांचा उरूस,
मन भोळे; जिव्हाळा;.. जिथे हा माणूस
वा़ळलेल्या तणाशीच पुन्हा हिरवळे
गात रुंजी फुलांना,...... रुळे, ....
माणूस !

वेदवेडा माणूस,
वेदनाही माणूस,
सावलीचा भुकेला सदाही,....
माणूस

मायमाया मुळाशी
असा हा,....
माणूस,

मी,....
जरासा तरी,
आहे का ...
माणूस ....??

.................अज्ञात

गुलमोहर: 

भावनांच्या महाली,....
माणूस,...... माणूस !
खरय.

वेदवेडा माणूस,
वेदनाही माणूस,
सावलीचा भुकेला सदाही,....माणूस ...!!!!!!
जियो बॉस्...जियो ....
एक श्रीमंत कविता !!!!!

वेदवेडा माणूस,
वेदनाही माणूस,
सावलीचा भुकेला सदाही,....
माणूस >>>>>>>>.फ्फ्फ्फार आवडलं Happy