बहावा का रुसला स्वत:वर.... निशिगंध का निशब्द आहे ?
अस्वस्थ श्वास मोग-याचा... का पारीजात हदरुन आहे ?
गुलमोहरचा स्वच्छंद फुलोरा मिटुनी का काळोख झाला ?
....................कोणती ही मोहमाया चांदणे पसरुन आहे ?
रातराणीच्या कळ्यांचा माजही उतरुन जावा
...............कोणत्या ह्या गंधलाटा रात्रीसही हलवुन आहे ?
विखुरलेला पाश आपला का सायलीने आवळावा ?
...............कोणत्या ह्या चिंबधारा आसमंत भिजवुन आहे ?
कोण बरसले ?
कोण बहरले ?
कळ्याकळ्यातुन कोण पसरले ?
.....................उत्सुकता फुलाफुलात आहे....
त्या कळ्यांना मी म्हणालो...
.................................लेक माझी येत आहे !


अहाहा ! तरल.
थरथरले सुरात ओठ कुणाचे अन बासरी विरघळली
सतारीच्या उत्सुक अधारांवर कोणता हा राग आहे ?
कोणीही मेहेफीलीत नाही... त्या मेहेफीली ढगांच्या
पौणिमेच्या पापण्यांवर कोणी छेडलेली आग आहे ?
कवितांच्या नाजुक वेलावर उठलाय की हळवा शहारा
पश्चिमेच्या संध्येचीही ह्या सुरांना दाद आहे...
अनोळख्या लयीत बुडाला तो श्वासातला मालकंस
केसातल्या ओल्या वीणेची ह्या तरंगांना साद आहे....
कोणी छेडले ?
कोणी वेढले ?
हे सुर वादळी कोणी काढले ?
...............................हि चर्चा सुरासुरात आहे....
त्या सुरांना मी म्हणालो.....
.....................लेक माझी येत आहे !
स्पर्शत कुणीतरी ह्या सुरवंटाला
फुलपाखरू करते आहे...
चाहुल कोणीछी पाऊल कुणाचे
उरी अधिरता भरते आहे...
कुणितरि बिलगले अलगद रिमझिम
अन पाऊस कुशीतला ओला झाला
प्राजक्त मनाचा कुणीतरी हलवला
सडा चिमुकला गोळा झाला
श्वासावर पसरुन मखमलि हिरवळ
कुणीतरी गारवा फुंकरलेला
गर्भात फुलोरा फुललेला अन
मनी पारवा गहिवरलेला
मी भरुन आहे... गहिवरुन आहे....
मग वाट कशाची पाहतो आहे ?
मी चंचलधारा.... मी वादळवारा....
मग आंतरात का वाहतो आहे ?
हे कोण गुंतले ?
हे कोण गुंफले ?
......................कोणी लपले माझ्या उरात आहे...
मी म्हणालो माझ्या मनाला....
.....................................लेक माझी येत आहे !
धुंद रवी
वाह!
अहा.. क्या बात है.. !!!
कुणितरि बिलगले अलगद रिमझिम
अन पाऊस कुशीतला ओला झाला
प्राजक्त मनाचा कुणीतरी हलवला
सडा चिमुकला गोळा झाला
>> मस्त.. खरतर प्रत्येक कडवं म्हणजे एक स्वतंत्र कविता आहे!
(कोणती ही मोहमाया चांदणे.... --- फार फार मस्त!)
पण तू सगळी कविता एकत्र टाकू शकतोस वरती - तशी टाक ना..
सुंदर तरल रचना .
ही मुलींची नावं नाहीत बरं , तुझ्या कवितेला दिलेली दाद आहे .
अरे तमाम स्त्री जातीला आनंद वाटावा अशी ही कविता.आणि तमाम पुरुशांनाही समाधान वाटावे अशी ही कल्पना . नशिबवान आहे तुझी मुलगी. आमच्या ईकडे डोहाळेजेवणाचा कार्यक्रम आहे.मी तीथे ही कविता म्हण्णार आहे.
मजा आली. तिसरे कडवे अतिसुंदर.
मस्त रे रवी...
सुरेख
छान आहे.
सहीच आहे!! तूफान आवडली...sense of humour सोबत तुम्ही शब्दांचेही फार श्रीमंत आहात
सुंदर !
छान! आली का मग लेक?
आली तर....
पण हि कविता लिहल्यानंतर सुमारे ५ महिन्यांनी....
मारवा !
आता साडेचार वर्षाची आहे.....
क्या बात है !
मस्त आहे कविता.
बहोत खूब !
क्या बात है !