Submitted by कौतुक शिरोडकर on 27 November, 2009 - 01:15
काल एक सुखी माणूस मेला.
त्याच्या त्या पांढर्याशुभ्र, पारदर्शी, झुळझुळीत सदर्यासाठी
लोकांची झुंबड उडाली.
ज्याला जेवढं जमेल तेवढं त्याने ओरबाडण्याचा प्रयत्न केला,
हाताला लागेल ती चिंधी घेऊन जमाव पळाला.
.
..
...
त्याच्या त्वचेला बिलगलेल्या
सदर्याच्या तलम अस्तराने
त्याची अब्रु झाकली.
....
.....
......
दु:खांचं एक बरं असतं.
एकदा त्यांच्याशी एकरुप झालो की
प्रतारणा होण्याचा संभवच नसतो.
गुलमोहर:
शेअर करा
उफ्फ... अप्रतिम !!
उफ्फ... अप्रतिम !!
जबरी रेर ! प्रचंड आवडली !
जबरी रेर ! प्रचंड आवडली !
सुंदर
सुंदर
बेदम!
बेदम!
>>दु:खाचं एक बरं असतं. एकदा
>>दु:खाचं एक बरं असतं.
असा चेहरा करतेय.
एकदा त्यांच्याशी एकरुप झालो की
प्रतारणा होण्याचा संभवच नसतो. >> य वेळा बरोबर आहे.
कविता आवडली.... करूणभाव असल्याने
आवडली.
आवडली.
काय झालंय तुला ?. अप्रतीम !!
काय झालंय तुला ?. अप्रतीम !!
क्या बात है,कौतुक साहेब.
क्या बात है,कौतुक साहेब. जबदस्त. अगदी मुद्द्यावरच घाव.
कमाल!
कमाल!
हॅट्स ऑफ!
हॅट्स ऑफ!
नाही रे बाबा, आपणच आपल्याशी
नाही रे बाबा, आपणच आपल्याशी प्रामाणिक राहिलो कि सुख काय आणि दु:ख काय कोणाच्याच प्रतारणेने काही फरक पडत नाही.
प्रतारणा होण्याचा संभवच
प्रतारणा होण्याचा संभवच नसतो.
----- अगदी खरं!सच्ची कविता.
जयन्ता५२
कौतुक करण्यासारखी कविता
कौतुक करण्यासारखी कविता लिहीतोस बघ तू.....
keep it up...
हम्म्म, वेगळी आहे. तुझ्या
हम्म्म, वेगळी आहे. तुझ्या नेहमीच्या स्टाइल पेक्षा.
जबरी रे भो !
जबरी रे भो !
क्या बात है!
क्या बात है!
कौतुक..... अप्रतिम! दु:खा चं
कौतुक..... अप्रतिम!
दु:खा चं एक बरं असतं.
एकदा त्यांच्याशी एकरुप झालो की
प्रतारणा होण्याचा संभवच नसतो.
मी हे दु:खांचं (अनेकवचनी) वाचलं (टायपो समजून)... आणि कविता नक्की कळली. इथे तुला दु:ख एकवचनी म्हणायचं असेल तर... दुसर्या ओळीतले "ते" कोण असा प्रश्नं पडतो.. म्हणून म्हणतेय...
कविता (मला कळलेल्या अर्थाची) आवडलीच
मोजके शब्द्..सुंदर कविता..
मोजके शब्द्..सुंदर कविता..
दाद, अनेकवचनीच. एकटं दु:ख
दाद, अनेकवचनीच. एकटं दु:ख ज्याच्या भाळी तो भाग्यवानच. टायपोबद्दल कितीदा क्षमा मागणार ? व्याकरणात घोळच आहे. असो. समजून घेताय हे आमचं भाग्य. बदल करतो आता.
सगळ्यांना धन्यवाद !
तुमच्या इतर रचनाही चांगल्या
तुमच्या इतर रचनाही चांगल्या पण ही पुन्हा पुन्हा वाचायला आवडली.
आवडली .. सुरेख कविता
आवडली .. सुरेख कविता
एकदम आठ्वलं, मुगले-आझम
एकदम आठ्वलं, मुगले-आझम मधलं..
काटोंको मुर्झानेका खॉफ नही होता है..
सुरेख.