Submitted by shashank pratapwar on 6 November, 2009 - 09:46
काढत उन्हाचा माग
सावलीचा पाठलाग
सखे छळते मला ग
तुझ्या आठवांची आग
धावने ते सैर वैर
खोडी मी काढता तुझी
सांजवेळी हातावर
ओली ती पापणी तुझी
खुडुनी ते पाकळ्यांना
जपलेले नाम तुझे
रंगुनी ते स्वप्नात
हरवलेले श्वास माझे
हृदयाचा ठोका चुके
भास तुझ्या चेहर्याचा
मन फिरे दाहीदिशा
शोध तुझ्या चाहुलीचा
सुन्या खडकाळ वाटा
चालतो आता एकटा
मागतो वेडया वार्याला
तुझ्या सुगंधाची छटा
पिला मी सागर जरी
तृषा कुठे शमणार
रुचेना हे सत्य मला
तु आता ना भेटणार
- शशांक प्रतापवार
गुलमोहर:
शेअर करा
सुन्या खडकाळ वाटा चालतो आता
सुन्या खडकाळ वाटा
चालतो आता एकटा
मागतो वेडया वार्याला
तुझ्या सुगंधाची छटा
पिला मी सागर जरी
तृषा कुठे शमणार
रुचेना हे सत्य मला
तु आता ना भेटणार>>
सुन्दर भाउ. पण असे नाही. भेटणार ना. बस कुछ सांसों की देरी है.
आभारी आहे मामी...
आभारी आहे मामी...
सुंदर रचना
सुंदर रचना
अप्रतीम ! -हरीश
अप्रतीम !
-हरीश