Submitted by sanika11 on 6 November, 2009 - 03:08
छेडीत धुंद तारा,
गेला कुण्या गावचा वारा.
उधळीत गंध,
गंधात छंद,
फुलवित मनी फुलोरा,
गेला कुण्या गावचा वारा.
केसात स्पर्श,
स्पर्शात हर्ष,
बहरीत देही शहारा,
गेला कुण्या गावचा वारा.
रानात वणवा,
वणव्यात विसावा,
बरसत आवेग धारा,
गेला कुण्या गावचा वारा.
तृप्तीत बहर,
बहरात कहर,
फेसाळीत अनावर झरा,
गेला कुण्या गावचा वारा.
छेडीत धुंद तारा,
गेला कुण्या गावचा वारा.
गुलमोहर:
शेअर करा
छान!
छान!
धन्यवाद
धन्यवाद