Submitted by अज्ञात on 5 November, 2009 - 23:03
पेलवे न जड जवाहीर अंगावर-
झाले कुपीबंद नजराणे,..
स्मृतीत उरले साजसखे
शब्दांविण राग तराणे
अधांतरी घुटमळे मारवा
समेविना हे गाणे,
खुळी रिकामी आवर्तने
सोबतीस ताल अडाणे
गुणगुणे कधीतरि रोम
तयातुन उमले कोंब नव्याने,
आणि आठवे देठदंवाचे
हुंदक्यासवे हसणे
.............अज्ञात
गुलमोहर:
शेअर करा
अधांतरी घुटमळे मारवा समेविना
अधांतरी घुटमळे मारवा
समेविना हे गाणे
खुळी रिकामी आवर्तने
सोबतीस ताल अडाणे >>> अहाहा !
गुणगुणे कधीतरि रोम
तयातुन उमले कोंब नव्याने
आणि आठवे देठदंवाचे
हुंदक्यासवे हसणे
>> क्या बात है !
निव्वळ वेड.... खूप सुंदर
निव्वळ वेड.... खूप सुंदर
प्रकाश आणि दाद, आपल्या उत्कट
प्रकाश आणि दाद,
आपल्या उत्कट अभिप्रयाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
तुमची कविता म्हणजे अस्सल
तुमची कविता म्हणजे अस्सल दागिना आहे. जबरी.
शेवटच्या कडव्याने रोमांच उभे
शेवटच्या कडव्याने रोमांच उभे राहिले! मा बो वर असे कवी, असल्या कविता असणे हीच मा बोची खरी श्रीमंती आहे.
चिंगु आणि सत्यवादी, आपल्या
चिंगु आणि सत्यवादी,
आपल्या श्रीमंत अभिप्रायाने आनंद वाटला. आभारी आहे.
खुपच सुंदर
खुपच सुंदर
एव्हढे जडजवाहीर वागवता मनात?
एव्हढे जडजवाहीर वागवता मनात? कमाल आहे!
गुरुवर्य, अफाट आहात.
गुरुवर्य, अफाट आहात.
सारंगी, उमेश,
सारंगी, उमेश, कौतुक,
मनःपूर्वक आभार !!
ताल अडाणे, हुंदक्याशिवाय हसणे
ताल अडाणे, हुंदक्याशिवाय हसणे छानच!
पेलवे ना जड जवाहीर.. आठवणींना हिरे म्हणणारे तुम्हीच.. तुमच्या बर्याच कवितांमधून असा आठवांचा दरवळ असतो. छान वाटतं.
चिन्नु, आपल्या नेमक्या,पेलवे
चिन्नु,
आपल्या नेमक्या,पेलवे ना जड जवाहीर.. आठवणींना हिरे म्हणणारे तुम्हीच.. ह्या माझ्या मनातल्या मूळ कल्पनेला जाणणार्या, मनस्वी अभिप्रायाबद्दल विशेष आभार !!
अज्ञातजी, मला एवढे जडजवाहीर
अज्ञातजी, मला एवढे जडजवाहीर पेलवण्यातले नाहीत, हे आपल्याला माहीत असेलच !!
अलकाजी, अज्ञातजी, मला एवढे
अलकाजी,
अज्ञातजी, मला एवढे जडजवाहीर पेलवण्यातले नाहीत, हे आपल्याला माहीत असेलच !!
असं आपण का म्हणालात माहित नाही. कुठलीही एखादी गोष्ट, मग ती, "कविता- कथा- कादंबरी- प्रसंग -ठिकाण-", जेंव्हा आपल्याला न समजूनही ओळखीचं वाटतं, तेंव्हा ते समजलं नाही असं म्हणता येत नाही. फार तर उमजलं नाही असं होऊ शकतं. लहानपणी न कळता पाठ केलेला परवचा मोठेपणी अनुभवाशी संलग्न होतो तेंव्हाच संदर्भार्थासहित कळतो ना ?? असो.
आता किमान आतली ओळख कुठेतरी जागलीशी वाटली हेही नसे थोडके !! काय ??????
...............अज्ञात
!!!! प्रणाम !
!!!!
प्रणाम !
खुप सुंदर.. जवाहीर.. !!
खुप सुंदर.. जवाहीर.. !! तुमच्या मुळे आम्हाला पण थोडीफार ओळख पटली तर कित्ती छान.. !!
रत्नजडीत!गहिरी... जयन्ता५२
रत्नजडीत!गहिरी...
जयन्ता५२
अलका, चेतना, जयंता५२,
अलका, चेतना, जयंता५२,
वा! क्या बात है!
वा! क्या बात है!
आभारी आहे चाऊ
आभारी आहे चाऊ
तशी सगळी कविताच अदाकारीन
तशी सगळी कविताच अदाकारीन व्यापलीय पण हे फारच जीवघेण झालय...
अधांतरी घुटमळे मारवा
समेविना हे गाणे,
खुळी रिकामी आवर्तने
सोबतीस ताल अडाणे --------- जियो बॉस...!!!
आभारी आहे गिरिश
आभारी आहे गिरिश
जबरदस्त.... आवडली ! <<गुणगुणे
जबरदस्त.... आवडली !
<<गुणगुणे कधीतरि रोम
तयातुन उमले कोंब नव्याने
आणि आठवे देठदंवाचे
हुंदक्यासवे हसणे >>>> हे जास्त आवडले !
विशाल,
विशाल,
सीएल माझी एक विनंती, एकदा
सीएल माझी एक विनंती, एकदा कविता शब्दां वेगळी करुन सांगा... मला फार मजा येते.. थोडक्यात चालणार नाही...
खुपच सुंदर
खुपच सुंदर
धन्यवाद श्री. सत्यजीत, मी काय
धन्यवाद श्री.
सत्यजीत, मी काय करावे अशी आपली अपेक्षा आहे ?? शब्दांवेगळी म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे ?? सविस्तर साठी खूप विचार करावा लागेल कदाचित मलाही आणि त्याचं ललित होईल ..! म्हणून तर भेटींची गरज भासते !!!!
नाही ????
कधी भेटू या ?? की हवंच सविस्तर ?? 