उत्पात
अवघडल्या पोटावरुन
ती जेंव्हा फिरवायची हात
आईची माया पोरीला
जाणवायची आत
मायेचा धागा ...ती ह्ळुवार नाळ
घट्ट पकडून ठेवी ...ते इवलंसं बाळ
दिवसभर चालायच्या मग
मायलेकींच्या गप्पा
भरून जायचा स्वप्नांनी
ओल्या मनाचा कप्पा
बापाला मात्र, नको होती
ही चिमुकली कळी
’मुलगी होणार आपल्याला’
हे त्याच्या उतरेनाच गळी
तो म्हणाला... हा धागा तोडायचं, नसतं आलं ओठात....
तो म्हणाला... हा धागा तोडायचं
नसतं आलं ओठात
जर ’ती’ ऎवजी ’तो’ असता
वाढत तुझ्या पोटात
शहारलेलं बाळ तिचं
तिला घट्ट घट्ट बिलगलं
अन जगामधल्या प्रत्येक ’ती’चं
अस्तित्वच हदरलं
प्रत्येक ’ती’ मग पेटून उठली
हात त्याचा धरायला
तिचा हा जीवघेणा उन्माद पाहून
लागे प्रत्येक ’तो’ थरथरायला
’ती’ फुलंही बंड करुन उठली
अन ’तो’ गंध क्षणात तडफडून मेला...
सावलीविना एकटा पडलेला
’
तो’ प्रकाश कुजुन सडून गेला...
मग क्रोधिष्ट हवा घेऊन आली
............मुसळधार बरसता झंझावात
दिसेल जो ’तो’, जळून मेला
..........विद्युल्लतेच्या संतापात
ति’च्या अस्तित्वाचा रौद्र तांडव
भीषण उत्पात करत गेला....
अन मायलेकींचा हळूवार कप्पा
नव्या स्वप्नांनी भरत गेला...
--- धुंद रवी
कधीकधी प्रतिक्रिया न
कधीकधी प्रतिक्रिया न देण्यामागचं कारण आपण "apt" प्रतिक्रिया देऊ शकत नाही हे असतं..
तसंच काहीतरी माझं आत्ता होत होतं!
धन्य आहेस तू आणि तुझी कविता. सुंदर!
लिहीत राहा!
खुपच भयंकर , रवी तुझ्या
खुपच भयंकर ,
रवी तुझ्या लिखाणाला दाद द्यावी लागेल . पुलेशु
आपली कविता आपल्यला हवी तशी
आपली कविता आपल्यला हवी तशी समोरच्यापर्यंत पोहचतीये
ह्याचाच आनंद इतका असतो की तीच एक मोठी दाद असते....
अप्रतिम
अप्रतिम
अन मायलेकींचा हळूवार
अन मायलेकींचा हळूवार कप्पा
नव्या स्वप्नांनी भरत गेला...
>> रव्या! कसली उत्तुंग झेप आहे तुझी! मस्त. तुला अव्वल सलाम
सुरेख !!! तुमचा ब्लॉग वाचायला
सुरेख !!!
तुमचा ब्लॉग वाचायला आवडेल, लिन्क देणार का?
छान... खुपच छान लिहीता तुम्ही
छान... खुपच छान लिहीता तुम्ही ...
मस्त रे रवी.............
मस्त रे रवी.............
जरुर का नाही... तुमचं
जरुर का नाही...
तुमचं सगळ्यांच माझ्या Blog वर स्वागत...
http://dhundravi.multiply.com/
रवी धुंदपणे लिहीत रहा, आम्ही
रवी धुंदपणे लिहीत रहा,
आम्ही वाचत राहू.
हाक दिली की साद दे,
कवितेच्या गावी जाऊ.
अतिशय सुरेख कल्पना... छान
अतिशय सुरेख कल्पना... छान उतरलीये, रवी.
खुप छान मांडली आहे...
खुप छान मांडली आहे...
सुरेख
सुरेख
प्रत्येक स्त्री ने वाचावी अशी
प्रत्येक स्त्री ने वाचावी अशी कविता आहे...
स्त्रीनेच का.... पुरुषानेही..... सुरेख.....
आवडलं (परत एकदा)
आवडलं (परत एकदा)
<<शहारलेलं बाळ तिचं तिला घट्ट
<<शहारलेलं बाळ तिचं
तिला घट्ट घट्ट बिलगलं
अन जगामधल्या प्रत्येक ’ती’चं
अस्तित्वच हदरलं>>
दुर्देवान अश्या घटना होतात अजुन देशात या गोष्टीन मन खंतावत खरच.. छान आशय न कविता!
......... .......... shabd
......... .......... shabd naahit.......
छान कविता!!
छान कविता!!