Submitted by vedangandhaa on 5 November, 2009 - 07:33
असता वास्तव्य येथे
तोवरी सुखदु:ख सारे
अंती जायचे एकदा
त्याज्यूनी सारे पसारे.
अन्न खाता ते पचेना
प्रशीती ईनो-सोडा वरी
पोट हे पाठीकडे अन्
कुणा भूक मारी
माज हा सत्ता पदांचा
संपत्तीची भूक रे
ना कळे कश्यास्तव
नश्वराची हाव रे.
देह जाळीता तयांचे
शेवटी रक्षा ऊरे
लाख होती नष्ट तेव्हा
फूलती येथ निखारे.
गगनचुंबी बंगले अन्
आस हाव्यासाची
अत्रुप्तता नाची सरे
नवकोट या नरयणांची...
(प्रकाशीत द़क्षता दिवाळीअंक-२००५)
राधा कुलकर्णी..लातूर...
गुलमोहर:
शेअर करा