शोध

Submitted by vedangandhaa on 5 November, 2009 - 07:21

देहरूपावरून
ओघळून गेलय पाऊस
अरूपाच्या दिशेने चालताना
अप्रूप वाटावे अन्
सुखाने सहज भेटावे तसे..
तुच म्हणालास ना?
शोधायच असेल कुणाला
तर आधी हरवायला हवं...
जसे वर्तूळाचे केंद्रबींदू
जागच्या जागी राहून गेल्यासारखे,
"तू" अन् "मी"
बोलत नाही याचा अर्थ्...आपण
कांहीच बोलत नाही ,
असा नाही होत, नाही का?
पावसाने भिजल्यागत
पैलथडीवर आपण दोघेच,
जन्म म्रुत्युला सोडल्यागत...
बघ !हा फेसाळलेला सागर
कसा शांत झालाय.....
हरवलेल्या लाटा .....वाटा....
अन..
भोगवटा...नशीबाचा

सौ.विनीता ल. पाटिल
(राधा कुलकर्णी..लातूर)

गुलमोहर: 

देहरूपावरून
ओघळून गेलय पाऊस
अरूपाच्या दिशेने चालताना
अप्रूप वाटवे अन्
सुखाने सहज भेटावे तसे..

खरेच सुंदर लिहिलेय ! आवडली कविता.

वा सुरेखच्..... पण...
<<<अरूपाच्या दिशेने चालताना
अप्रूप "वाटवे" अन् >>> हे कळले नाही.... ते "वाटावे" आहे का?