निघताना घरातुन तु
तुझे डोळे पाणवतात
लपवले तू जरी ते
इतरांना जाणवतात.
गाडी वर बसल्यावर
तुझा घट्ट होतो बंध
त्याक्षणी दरवळे फक्त
श्वासाचाच सुगंध.
बोलत नाही तु
चीडीचुप बसतेस
" तुम्ही शांत का ?"
असे मलाच विचारतेस.
कळतात मला पण
तुझ्या अंतरीच्या जखमा खोल
मी मात्र ढळून नाही देत
माझ्यामनावरचा तोल.
असच असताना मग
अचानक स्टेशन येते
क्षणिक माझ्यामनी ते
काहूर माजवते.
गाडी असते फलाटावर
पण तुला बसण नाही होत
काळजावरच्या ओझ्याने
भरल मन ओत-प्रोत.
बसल्यावर खिडकी पाशी
काळजी घ्या म्हणतेस
हसलो तुझ्यासमोर तरी
मनीच्या वेदना तु जाणतेस.
गाडी निघताना तु
सहजच हळवी होते
नयनीच्या रेशीमधारा
मनोमिलन आपले घडविते.
तु होतेस हळुहळू दुर
नजरेपासुन लांब जाते
तु अदृश्य झाल्यावर पाऊल
परतिच्या प्रवासा निघते.
परतिच्या प्रवासा निघते.
प्रवास...
Submitted by wachprasad on 5 November, 2009 - 07:19
गुलमोहर:
शेअर करा