नसेल जमत कधी.......

Submitted by wachprasad on 5 November, 2009 - 07:18

नसेल जमत कधी.......
नभी ता-याना सांगाया
चंद्र वेडे होऊन जाऊ नका
शितलता असे रातीची मात्र
दिवसा उन्हात तळपु नका.

नसेल जमत कधी.......
निसर्गाला सांगाया
हरिताची गोडी लावू नका
वसंतात वनराई चोहीकडे मात्र
पानझडीस ही नावे कधी ठेऊ नका

नसेल जमत कधी.......
नदीला सांगाया
वाहताना भान ठेव जरा
तृप्ती करतेस निर देऊन जिवाना
पुराने तडाखा नका देऊ बरा.

नसेल जमत कधी.......
तुला मनातल सांगाया
तू राहावी आनंदी असे वाटत बर
नयनाश्रु मला तुझा नकोसा वाटतो
प्रेम आहे तुझ्यावर खूप प्रेम आहे खर.

कवी - प्रसाद वाचकवडे.

गुलमोहर: