बहावा.....

Submitted by स्मिता द on 2 November, 2009 - 04:29

आता एक कवितेत बहावा शब्द आला.. बहावा म्हणजे काय? मी तिथेही सांगितललेय बहावा म्हणजे एक झाड आहे . गुलमोहरा सारखेच जरा से पण पिवळी धमक फुले येणारे..असे घोसच्या घोस लटकतात त्या पिवळ्या फुलाम्चे की बघतच रहावे.

वि.द. घाट्यांचा एक धडा होता माझ्या मोठ्या बहिणीच्या पुस्तकात्..अन कॅशीया भरारला..तेव्हा ते पुस्तक उतसुकतेने वाचुन मी कॅशीया म्हणजे काय हे अनेक जणांना विचारत असे तेव्हा लागलेला हा अर्थ..बहावा म्हणजे कॅशीयाच..

आह ही हे विचारले कोणीतरी तेव्हा मला त्यावरुन माझी एक जुनी कविता आठवली...ती अशी..बहुदा ही मा बो वर असावी

बहावा.....

मिठीत तुझ्या मला .....
माझ्या जगाचा भास होतो
कवेत तुझ्या गंधीत श्वास होतो
बाहुंच्या तटबंदीत ,विसावते काया
अन मनमोगरा तरारतो
खुळावतात पाकळ्या त्या दंशाने
दवात मग अमृताचा वर्षाव होतो
घट्ट होतो विळखा अजुन ...
छाया ही एक होते
शिडकाव्यात सुखाच्या
रोम रोमी फ़ुलतो
गुलमोहराच्या कुशीत
माझा बहावा बहरतो

गुलमोहर: