Boo! (हॅपी हॅलोवीन)

Submitted by लालू on 31 October, 2009 - 14:34

Pumpkin Carving

साहित्य: एक मोठा भोपळा. (मोठा तेवढा चांगला, आतून पोकळ असतो. जरा वाजवून बघून घ्यावा.)
कार्व्हिन्ग किट. (यात छोट्या करवतीसारख्या २ सुर्‍या, स्क्रेपर, एक जाड सुईसारखे ज्याच्या छिद्र पाडायला उपयोग होतो. त्यावर १ इन्चाची खूण असते त्यावरुन भोपळ्याची जाडी मोजता येते.

भोपळा धुवून किंवा ओल्या फडक्याने/ओल्या पेपर नॅपकिनने स्वच्छ करुन घ्यायचा. कार्व्हिन्ग किटबरोबर कार्व्ह करण्यासाठी काही डिझाईन्स येतात. त्यातले एक सिलेक्ट केले. ते भोपळ्यावर चिकटवता येते, पण आमच्या भोपळ्याच्या मानाने ते लहान होते म्हणून पेनाने भोपळ्यावर चित्र काढून घेतले. त्या चित्रावर कोणता भाग आधी कापावा यासाठी नंबर दिलेले असतात, ते भोपळ्यावर ज्या त्या भागांत लिहून ठेवले.

pic1.jpgpump2.jpg

देठाभोवती गोल कापून तो भाग देठाला धरुन उचलला. (देठाचा भाग टाकून देऊ नये, शेवटी तो पुन्हा वापरायचा आहे.)

pumpTop.jpgtopoff.jpg

आतमध्ये पोकळीत बिया, धागे असतात. आतून भोपळा साफ करुन घेतला.

pumpin.jpginclean.jpg

मग सुईने डिझाईनच्या टोकांना छिद्र पाडून त्यातून सुरी खुपसून करवतीने कापतात तसेच कापत डिझाईन तयार केले. कापताना आतपर्यंत व्यवस्थित कापावे. समोरुन पाहताना आतपर्यंत एकच आकार दिसला पाहिजे. मध्येच आतल्या भोपळ्याचा गर दिसत असेल तर तो कापावा. या सुर्‍या कधीकधी आतमध्ये तिरक्या कापतात. कापलेला भाग बाहेर काढताना आतून दाब देऊन किंवा समोरुन ढकलून काढावा.

carve1.jpgcarve3.jpg

सर्व डिझाईन कापून झाल्यावर कडा स्मूथ करुन घाव्यात. आत पडलेला गर साफ करावा.
आत दिवा किंवा मेणबत्ती लावावी. वरुन देठाचे झाकण पुन्हा ठेवावे. Happy
candlelight.jpgBoo!

boo1.jpg

अंधारात बसून आत मेणबत्ती लावून फोटो काढून घेतला. आता संध्याकाळ व्हायची वाट पहात बसतो..

गुलमोहर: 

छान Happy

छान..

सही !

Pages