रेखा आणि मित्र !!!

Submitted by Girish Kulkarni on 10 October, 2009 - 03:50

******************************************
******************************************

आज रेखा पंचावन्नची झाली
अन मला तू आठवलास मित्रा...
होस्टेलच्या सोनेरी दिवसांतला
आपल्या खोलीतल्या ब्रॅडमनच्या पोस्टरला
रेखाच्या पिनअपनी रिप्लेस करणारा
तिच्या प्रत्येक वाढदिवसाला
नव पोस्टर आणणारा ...
अमिताभाच्या नावान चारचौघात खडे फोडणारा
पण एकटाच चोरुन त्याचे सिनेमे पाहाणारा
मला अजुनही आठवतय ....
रेखाच्या लग्नाची बातमी घेऊन येणारी सकाळ अन तू
मग नंतर रेखाच्या रुपेरी वैध्यव्यावरही भाळणारा तू
रेखा सावळी आहे म्हंटल तर गोरा-मोरा होणारा तू...
ती मोठी असली म्हणुन काय वैगरे कायकाय म्हणणारा तू
तिचे सिनेमे अन ती याला आयुष्याचा एक कोपरा देणारा तू
सगळ आज नजरेसमोरुन तरळुन गेल...
आज तसल निरपेक्ष दायीत्व दुर्मीळ झालय रे....
झिरो फिगरला मिरवणारी दैवत अन त्यावर पोसलेले श्रध्दाळू
तुला माहीतही नव्हत रेखाची फिगर म्हणजे काय ते
(मलाही कुठे मधुबालाची माहीती होती..)
पण आज सगळ्याच्या वेगळ्याच तर्‍हा झाल्यायत...
छचोर श्रध्दा अन त्यांच्या असंबध्द चौकटी .................
जाऊ देत.... बरच झाल ...
तूझ रेखाचे सिनेमे पाहाण-पोस्टर्स लावण
अन हे सगळ मनापसुन जपण
या काळातल नाहीय ते.................!!!!

***************************************
***************************************

छान....
आज सगळ्याच्या वेगळ्याच तर्‍हा झाल्यायत...
छचोर श्रध्दा अन त्यांच्या असंबध्द चौकटी ......

मस्त! ´
"आज तसलं निरपेक्ष दायीत्व दुर्मीळ झालय रे....",
"छचोर('छछोर' असावा हा शब्द.. ) श्रध्दा अन त्यांच्या असंबध्द चौकटी .................",
"अन हे सगळ मनापसुन जपण"
या ओळी म्हणजे बॉल हरवून टाकणारे सिक्सर्स आहेत!!!

:)..छान