लोच्या झाला रे...

Submitted by सत्यजित on 28 January, 2008 - 04:18

पेरूच्या फ़ांदीवर बसुन देखील
पोपट उपाशी
सारे पेरू खाउन गेले
कावळे मघाशी

पोपट म्हणतो. . .

आह हा हा ! पेरूच खरा
पेरूच्या पानालादेखील काय स्वाद आहे
हे साले कावळे म्हणजे
जन्माची ब्याद आहेत !

कावळे म्हणतात. . .

पोपट पेरू पेरू काय खातो
म्हणून आम्ही सुद्धा मारल्या टोचा
आता बिया अडकल्या आहेत बुडाशी
आणि झालाय सगळाच लोचा.

सत्यजित.

http://satyajit-m.blogspot.com/

तरिच कावळे करतात काव काव ............

बिया अडकल्या आहेत बुडाशी....
मजा आली

मराटी कविता फार दिवस अशा कविच्या प्रतिक्षेत होती.

तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद... Happy

छान

कावळा झाला होता बावळा......
खाऊन पोपटाचा पेरू.......
झाले बूडाचे विकार सूरू.....

कायच्याकाय्यै!
(माझ्या लेकाला आवडली, रे... वाचून दाखवली तर म्हणाला 'कायतरीच...' म्हटलं... बरोब्बर! 'कायच्या काय'च आहे ही कविता.... मग अर्थ विचारून विचारून... हसलाही पोटभर Happy )
मी ही हसले मग... Happy

हा हा... काय अर्थ सांगीतलास कवितेचा?

खर तर बर्‍याच वेळा एखादी गोष्ट लोक चांगले म्हणाले म्हणुन घेतो, पण आपल्याला ती अजिबात आवडत नाही, पण त्या गोष्टीच्या चहात्यांना ती फार जिवापाड आवडिची असते.
अस आपल्या बाबतीत बरेचदा घडत विषेशता खाण्याच्या बाबतीत. मी Ireland मला बरेच दिवसानी सुपारी आणि बडिशेप मिळली, माझ्या आयरीश मित्रला मी मस्त लगते म्हणुन खायला दिली तर तो तोंड वाकडि करत चक्क थूंकला... एक तर थोडीशी बडिशेप ती याला दिली तर तो थुंकला... माझी त्यावेळीची मनस्थीती मी मांडली आहे. असच सुचल म्हणुन बायकोला ऐकवल तर म्हणाली काहीच्या काही आहे Happy तस पण मला कायच्या काही जस्त सुचतं...

आणि अशा कविता लहान मुलांना फार आवडतात आणि ती हसली मला फार मज्जा येते... Happy
आता बघ लिंबोणिच्या झाडा मागे ही अंगाई त्याला ऐकव फक्त झोपलाच्या ऐवजी पादला म्हणायच आणि झोप ऐवजी वास म्हणायच.. मग तो किती हसतो ते सांग... Happy

आता बघ लिंबोणिच्या झाडा मागे ही अंगाई त्याला ऐकव फक्त झोपलाच्या ऐवजी पादला म्हणायच आणि झोप ऐवजी वास म्हणायच.. मग तो किती हसतो ते सांग...

च्यायला हसून हसून पुरेवाट झाली राव . काहिच्या काहीच खरंच !!