बघ मार्केट उतार्‍या गं आला

मार्केटची स्थिती काय वर्णावि.. एक स्वैर विडंबन (मनातील कढ..अरेरे )
मूळ गाणे:
फड सांभाळ तुऱ्याला ग आला
तुझ्या ऊसाला लागल कोल्हा

मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली
पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला

लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा ?
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा
याला कुंपण घालशील किती ?
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भिती
अर्ध्या रात्री घालतील घाला

तुला पदरचे सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
साऱ्या राती राहील कोण जागं ?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन्‌ गेला
=------------------------------------------------=
बघ मार्केट उतार्‍या गं आला
तुझा शेअरही वाचला ना जल्ला

जवळ इसॉप होतं थोडं
त्यात आयपीओचं भेटलं घोडं
तुझा शेअर म्हणजे घबाडं
टप्प्प्या टप्प्याने नफा हा वाढला
तरी शेअर तू मुळी ना काढला
अता बघ हा कसा गडगडला
कुन्या दुष्टानं त्याला हा पाडला

'कसा मार्केटने दिला मला दगा'
नको तू शिव्या ह्या देउ उगा
जास्ती हाव म्हणजे संकट बघा
अता वाट तू पाहशील किती
जरा थोडिशी चालव मति
मार्केटची राहिली ही स्थिती
आपल्या पैशाचा होइल पाला

आपल्या इथले बैलही भारी
त्याच्या हाती अस्वलांची दोरी
शेअर पडल्याविना कोणी टेकर नाही पोरी
आता थोडं माणसासारखं वाग
पकड पडलेले काही समभाग
जरा मोजून फाड आपला ताग
नको रिता करू तुझा गल्ला


देवा चपखल जमलेय स्मित

पन मूळ गाणेच म्हणायला थोडे अवघड आहे त्यामुळे विडंबनही तसेच झालेय...

visit http://milindchhatre.blogspot.com