ऑफिस मधे आल्या आल्या पहिले काम
मेल चेक केल्याशिवाय नाही मनाला आराम
चहा घेत घेत मग गप्पा हानायच्या
वेळच मिळत नाही अशा बोंबा मारायच्या
अजून कशी इनक्रिमेंटची मेल नाही बुवा
काम केले नाही तरी पगार मात्र हवा
काम सुरु करण्यापूर्वी होते मिटींगची वेळ
निश्कर्ष काही न काढता संपून जाते वेळ
मिटींग मधे ठरले आता कामाला सगळ्यांनी लागायचे
डेड्लाईन पुर्वीच प्रोजेक्ट कंप्लिट मात्र करायचे
फोन करुण बायकोला सांगू उशिर आज होईल
तूझ्या वाढदिवसाला मात्र रजा नक्की घेईल
वेळ झाली जेवायची सांगायला मित्र आला
चला काहीतरी देउ या गरीब बिचार्र्या पोटाला
जेवताना गप्पा काय तर शेडुल टाईट आहे
या महिण्यात मला बाबा खूप काम आहे
कामाला सुरुवात करता यांना आठवते शेअर मार्केट
आज हा काढला तर होइल भरपूर प्रोफिट नेट
हा का तो करत तास निघून गेला
काय करु विचारायला मित्राला फोन केला
निर्नय घेता घेता मार्केट बंद झाले
उद्या पाहु करत ते विचारच बंद केले
आता मात्र चार वाजले करु कामाला सुरुवात
पण काय करावे खूप आळस आहे अंगात
चला पहिले गरम गरम चहा घेउ
आणि फ्रेश होउन कमाला सुरुवात करु
कामाला सुरुवात करता करता वाजतात सहा
बॉस सांगतो सगळे आधी रिपोर्ट लिहा
रिपोर्ट मधे काय लिहायचे पडला मोठा प्रश्न
काम न करता पगार घेताना नाही पडत का प्रश्न
छान आहे. तुम्ही तर सगळ्या
तुम्ही तर सगळ्या संगणक अभियंत्यांचं पितळ उघडं पाडलंत की...
अश्या अभियंत्याची चांगलीच खबर
अश्या अभियंत्याची चांगलीच खबर घेतली आहेस...
.....छान.
शिर्षक बिनकामाचे संगणक
शिर्षक बिनकामाचे संगणक अभियंते हव होतं .

ह्या कवितेवरुन केदारने लिहिलेली म्हण आठ्वली.
रिकामा सुतार .........
मस्तच... शीर्षकपण अचूक आहे...
मस्तच... शीर्षकपण अचूक आहे...
हाहा, लयीच भारी कविता! सत्य
हाहा, लयीच भारी कविता!
सत्य नेहमीच कटु असते
धन्यवाद
धन्यवाद
सही!!!!!!!!
सही!!!!!!!!:स्मित:
ही कविता आहे होय?.... अस्स
ही कविता आहे होय?.... अस्स अस्स... मला वाटल की तुमच्या डायरीतल एक पान आहे!
व्वा ... बरोबर ओळखलेकी ... पण
व्वा ... बरोबर ओळखलेकी ... पण माझ्या डायरीतील एक नाही... सगळीच पाने अशी असतात ..
मस्तचं अगदी पटतयं पण माझ्या
मस्तचं

अगदी पटतयं
पण माझ्या डायरीतील एक नाही... सगळीच पाने अशी असतात ..>>>>>>>>
>>सगळीच पाने अशी असतात ..
>>सगळीच पाने अशी असतात ..
शनिवार्-रविवारी पण हेच करता काय?
शनिवार्-रविवारी पण हेच करता
शनिवार्-रविवारी पण हेच करता काय? >>>
खरच की ... शनीवार रविवार ...... जरा वेगळी असतात .. लिहीन कधी सवडीने
लिहा सवडीने... अगदि निवांत
लिहा सवडीने... अगदि निवांत लिहा....
असे ही कोणी वाट पहात नाहिये
असे सुखाचे प्रोजेक्टस फक्त
असे सुखाचे प्रोजेक्टस फक्त नशिबानच मिळतात!
नाहीतर आहेचे - रात्री २-३ पर्यंतच काम.. शनीवार रविवारीही!
माहीत नाही development project मधे कधी टाकतील.. वेळ आहे तोवर मजा करून घ्या!
वर्षम छान जमलंय अगदी .. तंत त
वर्षम छान जमलंय अगदी .. तंत त त .. तंतोतंत ..
सुंदर निरिक्षण आहे ..
अजून कशी इनक्रिमेंटची मेल नाही बुवा
काम केले नाही तरी पगार मात्र हवा >>
रिलीज आला रिलीज आला म्हणता हवा झाली टाईट,
ओवरटाईम करा आता बसेल नाहीतर फाईट,,
रिलीज आला रिलीज आला म्हणता
रिलीज आला रिलीज आला म्हणता हवा झाली टाईट,
ओवरटाईम करा आता बसेल नाहीतर फाईट,,
आवडले .. धन्यवाद सुहास
वर्षे, आधी वाचली नव्हती ही
वर्षा, सही ...अगदी मर्मावर
वर्षा, सही ...अगदी मर्मावर बोट ठेवलंस ..

कामाला सुरुवात करता करता वाजतात सहा
बॉस सांगतो सगळे आधी रिपोर्ट लिहा....
एका दिवसाच्या कामाची सात भाग करणे .....आणि रिपोर्ट भरणे !
मस्त!
मस्त!
नशीबवान आहात..माझ्या नशिबाने
नशीबवान आहात..माझ्या नशिबाने मला कधीही असे सुखाचे प्रोजेक्ट मिळाले नाही

इन्टर्नेट ही बंद्..समोर च मॅनेजर बसलेला..रिपोर्ट मध्ये लिहायला इअतकं काही असायचं पण लिहायलाही वेळ नसायचा.
अशा वेळी testing/maintenance project मिळावा असं फार वाटायचं
एक फुल चं कॉपी पेस्ट.
एक फुल चं कॉपी पेस्ट.
ऋयाम, अरे मी ही जपानी क्लाएंट
ऋयाम,

अरे मी ही जपानी क्लाएंट साठी काम करायचे..त्यामुळे सेम्-सेम असणारच
वैताग आणतात जपानी
जरा धूर यायला लागलाय वर्षा
जरा धूर यायला लागलाय वर्षा ...काही जळतेय का?
एका तासाचे काम करूनही काहीजण कंपनीला प्रॉफिट मिळवून देतात ...
शेवटी संगणक क्षेत्रातल्या
शेवटी संगणक क्षेत्रातल्या कंपन्या या आमच्या सारख्यांनी केलेल्या या एका तासाच्या कामातुनच दर वर्षी लाखो-करोडो डॉलर कमावतात ना !

कमावायचे डॉलरमध्ये आणि वाटायचे रुपयांनी, या मिळणरया काही रुपयात आमचं मात्र आज सार सुख सामावलेल आहे ....
मस्त
मस्त
मस्तच. हापिस हापिस मातीच्या
मस्तच.
हापिस हापिस मातीच्या चुली
छानच लीहीले फोन करुण बायकोला
छानच लीहीले
फोन करुण बायकोला सांगू उशिर आज होईल
तूझ्या वाढदिवसाला मात्र रजा नक्की घेईल
ईथे तुही सुटली नाही गं
फोन करुण नवर्याला सांगू उशिर आज होईल
तूझ्या वाढदिवसाला मात्र रजा नक्की घेईल
अतिचशय पोटतिडकीने लिहिलीय
अतिचशय पोटतिडकीने लिहिलीय कविता. जाम आवड्ली
हेहे
हेहे