तू जाता

Submitted by अलका_काटदरे on 2 September, 2009 - 13:04

जन क्षणभर खातील हाय हाय
तू जाता होईल काय काय..

तुझी घरे-जी देवळे-उध्वस्त होतील
भटजी संस्कृताची पाठशाळा चालवतील
फुले सारी निर्माल्यावत झाडावरच राहतील
चोरांना ना भिती, ना धाक राहील
जन क्षणभर तुझ्यामागे धावतील
तू जाता, उरशील तू- पोथीतील ..

मुले कुणाला हात जोडतील
परिक्षा सार्‍या कशा पार पडतील
नवस कुणाला करायचे हा प्रश्न
आईवडिलांना नेहमीच पडेल
जन क्षणभर होतील चिंतामग्न
तू जाता, होतील दु:खे नग्न..

मूर्तींच्या तुझ्या होईल लिलाव
तुला त्यातले काही न मिळेल
एकवटून तुझी रुपे तू,
या पृथ्वीवर अवतर
जन क्षणभर होतील स्तंभित चकीत
तुला पाहता माणसाच्याच रुपात..

तू जाता- ये तू असा परतून-

जन क्षणभर खातील हाय हाय
तू जाता होईल हेच हेच..

('जन पळभर' गाण्याच्या चालीवर.. मूर्तीरुपातील देव ही संकल्पनाच नसली तर काय होईल्. हे विचार).

गुलमोहर: